english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. शुद्धीकरणाचे तेल
डेली मन्ना

शुद्धीकरणाचे तेल

Friday, 7th of February 2025
23 17 296
Categories : एस्तेरचे रहस्य: मालिका
"प्रियजनहो, आपण आता देवाची मुले आहो; आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही; तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहीत आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. जो कोणी त्यासंबंधाने ही आशा बाळगतो तो, जसा तो शुद्ध आहे, तसे आपणाला शुद्ध करितो." (१ योहान ३:२-३)

एस्तेरसाठी संपूर्ण बारा महिने तयारी ही अनेक प्रकारे महत्वाची होती. त्यापैकी एक ही शुद्धीकरणावर दिलेला भर होता. लक्षात ठेवा की या स्त्रियांना वेगवेगळ्या क्षेत्रातून आणि पार्श्वभूमीमधून आणलेले होते, म्हणून एका उद्देशासाठी त्यांना शुद्ध करण्याची आवश्यकता होती. कोशिंबीर तयारी करणे हे तुम्ही पूर्वी पाहिले आहे काय? भाज्या आणि फळे जे कोशिंबीर बनविते जे वेगवेगळ्या दुकानातून घेतलेले असतात आणि त्यावर धूळमाती असते. तसेच या वस्तूंना शिजविण्याची संधी नसते. तुम्ही सरळ त्यांस तुमच्या स्वयंपाक घरात आणता, कापता आणि खाण्यास देता. म्हणून, याची गरज असते की ते पूर्णपणे स्वच्छ धुतले आहेत म्हणजे तुमच्या ताटातील कोशिंबीरसह आनंदी क्षण तुम्हांला संसर्गासाठी दवाखाण्यात घेऊन जाणार नाही.

एस्तेरच्या पुस्तकात हे प्रकरण होते. राजासमोर येण्याअगोदर स्त्रियांची शुद्धि व्हावी यासाठी विशेष तरतूद करण्यात आली होती. एस्तेर २:१२ मध्ये बायबल म्हणते, ""स्त्रियांसाठी ठरवलेल्या नियमांप्रमाणे बारा महिन्यांपर्यंत सर्वकाही उपचार झाल्यावर एकेका कुमारीची अहश्वेरोश राजाकडे जाण्याची पाळी आली. त्यांच्या शुद्धीकरणाची रीत म्हटली म्हणजे त्यांना गंधरसाचे तेल सहा महिने व सुगंधी द्रव्ये सहा महिने लावत असत; शिवाय इतर शुद्धतेच्या वस्तू त्यांना लावत असत.

आता केजेवी बायबल मध्ये वचनास पडताळून पाहू, बायबल म्हणते, "आता जेव्हा प्रत्येक मुलीची पाळी आली की राजा अहश्वेरोशकडे जावे, त्यानंतर ती बारा महिने, स्त्रियांच्या व्यवहारानुसार, (अशा प्रकारे त्यांच्या शुद्धीकरणाचे दिवस पूर्ण झाले, काटेकोरपणे, गंधरसाच्या तेलाने सहा महिने, आणि सहा महिने सुगंधी वासासह आणि इतर वस्तूंद्वारे स्त्रियांच्या शुद्धीकरणासाठी)."

बायबल म्हणते की एस्तेरने पहिली सहा महिने राजाच्या राजवाडयात गंधरसाचे तेल वापरून पथ्यासह तयारी केली होती. केजेवी मधून, तेलाच्या वापराचा प्राथमिक उद्देश हा शुद्धीकरणासाठी आहे. तुम्ही याची कल्पना करू शकता की हे तेल सहा महिने वापरावे लागले की शरीराची सर्व घाण व दुर्गंध स्वच्छ करावी. माझी खात्री आहे की हे तेल महागडे होते, तरीही राजा इतका खर्च करीत असे याची खात्री करण्यास की जो कोणी राजासमोर येईल तो शुद्ध असावा.

तुम्ही तुमच्या स्वतःला किती काळ शुद्ध ठेवण्यास तयार आहात? काही लोकांना चर्चला येण्यास कंटाळा येतो, हे तर सोडून दया की त्यांच्या शुद्धीकरणासाठी पाळकांच्या उपदेशाचे पालन करावे. इतर हे आधीच तडजोड करीत आहेत कारण त्यांना वाटते की शुद्धीकरणाची जीवनशैली ही धीमी आहे. ते अधिक वेगाने पैसे मिळविण्यासाठी पापात बुडत जातात. एस्तेरच्या बाबतीत, शुद्ध होण्यासाठी तिला गंधरसाचे तेल सहा महिने वापरावयाचे होते. परंतु देवाचे एक मुल म्हणून, तुमची शुद्धता ही सार्वकालिक आहे. आजच्या वचनात, प्रेषित योहानाने म्हटले की जर तुम्ही राजासमोर एके दिवशी उभे राहण्याची आशा बाळगता, तर तुम्ही तुमच्या स्वतःला नेहमीच शुद्ध ठेवले पाहिजे.

विलक्षणपणे, गंधरस हा येशूच्या आयुष्यात कमीत कमी पाच वेळा दिसतो.
पहिल्यांदा, "नंतर ते त्या घरात गेले. तेव्हा तो बालक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले आणि आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून 'सोने, ऊद' व गंधरस' ही दाने त्याला अर्पिली." (मत्तय २:११)

दुसऱ्यांदा, येशूच्या पहिल्या अभिषेकाच्या वेळी, एक अज्ञात "पापी स्त्री" ने शुद्ध जटामासीचे मोलवान सुगंधी तेल थेंबानी किंवा द्रव्य प्रकारात, वापरले की शिमोन परुश्याच्या घरात येशूच्या पायास तिच्या अश्रूंसह लावावे.

तिसऱ्यांदा, येशूच्या दुसऱ्या अभिषेकावेळी, मरीया, जी मार्थाची बहिण हिने येशूचा जटामांसीच्या (किंवा गंधरस) तेलाने अभिषेक केला, पुन्हा एकदा बेथानी शहरात, कुष्ठरोगी शिमोनाच्या घरात, परंतु यावेळी त्याच्या मस्तकास तेल लावले होते. येशूने शिष्यांना सांगितले की मरीयेने त्याच्या उत्तरकार्यासाठी हे केले आहे.

चौथ्यांदा, येशूच्या मरणसमयी, रोमन सैनिकाद्वारे द्राक्षारस मध्ये गंधरस मिश्रण करून येशूला वधस्तंभावर मरण पावण्यापूर्वी देण्यात आले होते.
शेवटी, येशूच्या पुरण्याच्यावेळी, गंधरस हे सुगंधित द्रव्य आणि मसाल्याची निवड वापरली गेली की येशूच्या मरणानंतर त्याच्या शरीराला लावावे.

गंधरस हे सौदर्यासाठी आणि शवाला मसाला लावणे या दोन्हीसाठी आहे. ही वेळ आहे की स्वच्छता करावी. ही वेळ आहे की त्या गोष्ट सतत करत राहाव्या ज्या आपणास पवित्र व शुद्ध ठेवतात जोपर्यंत राजा येत नाही. तुमच्या मनाची तयारी करा की ज्यावेळी इतर हे तडजोड करतील आणि धुळीत खेळतील, त्याचवेळी तुम्ही शुद्धतेचे तेल सतत लावत राहाल म्हणजे तुम्ही राजाची कृपा आकर्षित करू शकाल जेव्हा तो प्रगट होईल.

Bible Reading: Leviticus 14-15
प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, तुझ्या वचनाच्या समजसाठी मी तुझे आभार मानतो. मी प्रार्थना करतो की मी शुद्ध राहावे म्हणून तू मला साहाय्य कर. मी तुला माझे अंत:करण देतो आणि प्रार्थना करतो की समाजातील तडजोडीवर मात करण्यास तूं मला साहाय्य करशील. मी फर्मान काढतो की जेव्हा तू प्रगट होईल तेव्हा मी निष्कलंक असा आढळेन. येशूच्या नावाने. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● क्षमाहीनता
● परमेश्वराचा आनंद
● चालण्यास शिकणे
● बी बद्दल आश्चर्यकारक सत्य
● एक आदर्श व्हा
● वनातील मानसिकतेवर प्रभुत्व करणे
● ख्रिस्तासाठी राजदूत
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन