english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. स्वप्न हे देवाकडून आहे हे कसे ओळखावे
डेली मन्ना

स्वप्न हे देवाकडून आहे हे कसे ओळखावे

Friday, 2nd of September 2022
32 15 2626
Categories : स्वप्ने
राजा गिबोन येथेयज्ञ करावयास गेला; तें सर्वात मोठे उच्च स्थानहोते; तेथल्या वेदीवर शलमोनाने एक सहस्त्र होमबलि अर्पिले. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शलमोनास दर्शन दिले; देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. (1 राजे 3:4-5)

एक मार्ग आहे ज्याद्वारे देव आपल्याशी बोलत असतो तो स्वप्न आहे. शलमोन, इस्राएलचा एक सर्वात महान राजा ज्यास महत्वाचे स्वप्न पडले ज्याद्वारे देव त्याच्याबरोबर प्रत्यक्षात बोलला. ह्या स्वप्नाने त्याचे जीवन व इस्राएल राज्यावर मोठा प्रभाव केला.

स्वप्न हे महत्वाचे आहेत कारण स्वप्ना द्वारे आध्यात्मिक मार्गदर्शन होत असते. आध्यात्मिक दाने ही स्वप्ना द्वारे सुद्धा दिली जाऊ शकतात. ह्या प्रकरणात, शलमोनने ज्ञानाचे वरदान आणि पारख करण्याचे ज्ञान हे मोठया प्रमाणात प्राप्त केले.

एक प्रश्न, मी नेहमी विचारतो तो हा आहे की, "तुम्ही हे कसे म्हणू शकता की आता देव बोलत आहे?" कधी कधी हे अगदी उघड असते, आणि इतर वेळेला तसे असू शकत नाही."

स्वप्न हे देवाकडून आहे की नाही ते जाणण्याचा एक मार्ग हा की, तुम्ही उठल्या नंतर सुद्धा संपूर्ण स्वप्न हे आठवू शकाल. जेव्हा देवाला आपणांस स्वप्नात बोलावयाचे असते, तर हे उघडच आहे की आपण ते स्पष्टपणे आठवणार. अनेक वेळेला मी स्वप्नाचाथोडासा किंवा काही भाग आठवला परंतु जेव्हा मी संपूर्ण स्वप्न सव्विस्तरपणे आठवतो, मी त्याकडे लक्ष देतो. देव कदाचित माझ्याबरोबर बोलत असेन.

इतर वेळेला,तेच स्वप्न तुम्हाला पुन्हा पुन्हा येत असेल. जेव्हा देव तुमचे लक्ष तेथे आणत असेन, त्यास खात्रीने ठाऊक आहे की तुमचे लक्ष तेथे कसे आणावे.

उत्पत्ति41:1-15 मध्ये, "फारो ला स्वप्न पडले आणि स्वप्नात, तो झोपी गेला आणि त्यास आणखी एक स्वप्न पडले. जेव्हा स्वप्न संपले तेव्हा फारो उठला." बायबल मध्ये स्वप्न पुन्हा पुन्हा येण्याचे हे एक उदाहरण आहे, जेथे देव फारो चे लक्ष वेधूनघेण्याचा प्रयत्न करीत आहे.

फारो हा नीतिमान मनुष्य नव्हता तरी सुद्धा देव त्यास स्वप्नाद्वारे बोलत होता. त्यास हे कळले होते हे स्वप्न साधारण नाही आणि मग तो त्या स्वप्नाचे उत्तर प्राप्त करण्याच्या शोधात होता. त्यास एक धार्मिक मनुष्य, योसेफ, मिळाला, की त्याचे योग्य स्पष्टीकरण करावे जे केवळ देवच करू शकत होता.

"ते त्यास म्हणाले, आम्हाला स्वप्ने पडली आहेत, व त्यांचा अर्थ सांगणारा कोणी नाही. योसेफ त्यांस म्हणाला अर्थ सांगणे देवाकडे आहे ना? आपआपले स्वप्न मला सांगा." (उत्पत्ति 40:8)

कधीकधी स्वप्न हे भ्रमात पडणारे असू शकते. अशा वेळेला, उत्तम गोष्ट ही आहेकी देवाला सरळपणे विचारावे की तो काय बोलत आहे हे तुम्हाला दाखवावे की स्वप्न हे त्याच्याकडून आहे काय, तर तुम्हाला वचन किंवा गीत मिळेल वगैरे, की स्वप्नाला निश्चित करावे.

स्वप्ना वर अधिक अभिषिक्त माहिती:
तुमचे स्वप्न समजावे (नोहा ऐप वर ई-बुक)
नोहा ऐप वर स्वप्न डिक्शनरी(शब्दकोश)
प्रार्थना
आज, दानीएलाच्या उपासाचा ६ वा दिवस आहे
[जर तुम्हीं अजूनही त्यामध्ये भाग घेतला नसेल किंवा त्यावर आणखी माहिती हवी असेन तर कृपाकरून दररोजचा मान्ना २६ व २७ ऑगस्टचा संदर्भ घ्या.]

पवित्रशास्त्र वाचन
अनुवाद १:६-८
योएल २:२५-२७
१ योहान २:१५
यशया ६०:१-२

प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, तुझा आत्मा माझ्यावर ओत, आणि दैवी स्वप्न पाहण्यास मला साहाय्य कर. पित्या, येशूच्या नांवात, जे स्वप्न तू मला देत आहे त्याबद्दल पारख करण्याचे ज्ञान मला दे.

प्रार्थना अस्त्र
१. मला व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना अनेक वर्षे एकाच पातळीवर ठेवण्यास कारणीभूत होणारी प्रत्येक सैतानी शक्ती, येशू ख्रिस्ताच्या सर्वशक्तिमान नावात, मी तुला आज्ञा देत आहे की अग्निद्वारे उपटून टाकिले जावो.

२. सैतानी सापळे जे माझ्या नियतीला नवीन वाट मिळण्यापासून जखडून ठेवीत आहेत, येशू ख्रिस्ताच्या सर्वशक्तिमान नावात, मी तुला आज्ञा देत आहे की अग्निद्वारे उघडले जावे व मला मोकळे करावे.

३. संदेष्टा एलीयावर जो हात आला, आणि त्यास अहाबाच्या रथापुढे धावू दिले, ते आता येशूच्या नावात मजवर येवो. मी वेगाचा अभिषेक प्राप्त करीत आहे की, जेथे मी आता सध्या आहे तेथून पुढे येशूच्या नावात वाटचाल करावी.

४. येशूच्या नावात, मी आदेश देत आहे की जे काही सैतानी हस्तक्षेपामुळे मी गमाविले आहे ते सर्व काही येशू ख्रिस्ताच्या सर्वशक्तिमान नावात वेगाने पुनर्स्थापित केले जावे.

५. येशूच्या नावात, माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रात मी प्रगती प्राप्त करीत आहे.

६. येशूच्या नावात, मी आज्ञा देत आहे की सृष्टीमधील सर्वकाही हे आता माझ्या प्रगतीच्या वाढीसाठी कार्य करू लागावे.

७. पित्या, येशूच्या नावात, मी प्रार्थना करितो की प्रत्येक जण जे या दानीएलाच्या उपासामध्ये भाग घेत आहेत ते नवीन असामान्य मार्ग व चमत्कार प्राप्त करोत. असे होवो की त्यांच्या साक्षीद्वारे अनेक जण प्रभूकडे वळावेत.

उपासनेमध्ये वेळ घालवा.

Join our WhatsApp Channel


Most Read
● दिवस ०५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● सार्वकालिक निवेश
● अपरिवर्तनीय सत्य
● उपासनेचा सुगंध
● यशाची परीक्षा
● इतरांबरोबर शांतीमध्ये राहा
● छाटण्याचा समय– २
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन