डेली मन्ना
अन्य भाषे मध्ये बोला व आध्यात्मिकदृष्टया ताजेतवाने व्हा
Tuesday, 9th of April 2024
29
21
814
Categories :
पवित्र आत्म्याची भेट
तोतऱ्याच्या द्वारे परभाषेत तो या लोकांशी बोलेल; तो त्यांस म्हणाला होता, ही विश्रांति आहे; भागलेल्यांस विसावा दया; याने त्यांस आराम होईल, तरी ते ऐकताना. (यशया २८:११-१२)
स्मिथ विगल्सवर्थ देवाचा एक महान माणूस हा केवळ एक प्लंबर होता. परंतु परमेश्वराने त्यांचा उपयोग केला की हजारो लोकांना जागृत करावे. त्यांच्या अलौकिक सेवाकार्या द्वारे अनेक जण हे स्वस्थ झाले व दुष्टात्म्यांकडून त्यांची सुटका केली गेली.
विगल्सवर्थ एकदा एका घरात गेले जेथे कोणी मरण पावले होते व जेथे त्या मृत व्यक्तीचे शरीर हे तीन दिवसापासून तसेच ठेवलेले होते. देवाकडून ते एका मिशनवर होते. त्यांनी लगेचच त्या कुटुंबाला त्या खोली बाहेर जाण्यास सांगितले. त्यांनी त्या मृत व्यक्तीच्या कोट चे कॉलर धरले व त्यास त्या शवपेटीमधून ओढून बाहेर काढले! त्यांनी त्या शरीराला भिंतीच्या आधारे उभे केले व आदेश दिला, "जिवंत" हो! जेव्हा त्यांनी त्या मनुष्याच्या शरीराला सोडले, ते कडक झालेले मृत शरीर मोठया आवाजाने धाडकन जमिनीवर पडले. त्याक्षणीच तुम्ही व मी धैर्य सोडून दिले असते, पण विगल्सवर्थ कडे जो विश्वास होता तो आपल्यापैकी अनेकांना नाही आहे! (परमेश्वर आम्हाला साहाय्य करो.)
विगल्सवर्थ ने पुन्हा एकदा त्या मृत शरीराच्या कोट ची कॉलर धरली व पुन्हा एकदा त्यास भिंतीच्या आधारे उभे केले. आणि ते मोठयाने ओरडले, "मी तुला एकदा बोलले आहे, आता मी पुन्हा बोलत आहे...जिवंत हो! ते कडक झालेले मृत शरीर जमिनीवर पुन्हा मोठया आवाजासह पडले. कोणास ठाऊक की ह्या सृष्टि मध्ये व ते गरीब कुटुंब व त्या घरातील अंत्यविधीला आलेले लोक त्या बंद खोली मधून येणाऱ्या आवाजाबद्दल काय विचार करीत असतील!
तिसऱ्या वेळेला विगल्सवर्थ ने त्या मृत शरीराला उचलले व त्यास भिंतीच्या आधारे उभे केले. त्याने त्यांचे बोट शरीराकडे केले, व आदेश दिला: "मी तुला एकदा बोललो, मी तुला दुसऱ्यांदा बोललो, परंतु मी ह्या तिसऱ्या वेळेनंतर तुला बोलणार नाही. आता जिवंत हो! अचानक, तो मनुष्य खोकला, त्याचे डोके हलविले, त्याचे तोंड पुसले व त्या अंत्यविधीच्या घराबाहेर गेला! विगल्सवर्थ च्या सेवाकार्या मध्ये असे मृताला जिवंत करण्याचे कार्य एकदा नाही, दोनदा नाही परंतु १४ वेळा घडले!
ते त्यांच्या वयाच्या ८० वयात असताना सुद्धा, त्यांचा जोम हा कधी कमी झाला नाही. कोणीतरी त्यास एकदा विचारले, "सर, तुम्ही सुट्टीवर जाता काय?" ताबडतोब प्रत्युत्तर आले, "मी दररोज सुट्टी घेतो." त्यांनी मग हे बोलत ते स्पष्ट केले, "अन्य भाषे मध्ये बोलत मी दररोज विश्रांती घेतो व माझ्या स्वतःला ताजेतवाने करतो. तीच तर माझी खरी सुट्टी आहे.
आजच्या वेळेतील अत्यंत तणाव व व्यस्त कार्यक्रम, व इतर सर्व दबावात, आपल्या सर्वाना तसे आंतरिक ताजेतवाने होण्याची गरज आहे जे केवळ देवाबरोबर एकटे वेळ घालविल्याने येते. प्रभु येशू हे बोलत तुम्हाला आमंत्रित करीत आहे, "अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हांला विसावा देईन." (मत्तय ११:२८).
तुम्हाला फारच निराश झालेले, थकलेले व शक्तिहीन झाल्यासारखे वाटत आहे काय, तर मग तुम्हाला केवळ हे करण्याची गरज आहे की अन्य भाषे मध्ये परमेश्वराची स्तुति करीत चांगला वेळ घालवावा. तुम्ही जे विचार किंवा कल्पना करू शकता त्यापेक्षा अधिक ते तुम्हाला ताजेतवाने करील.
(मला कळू दया की दररोजची भाकर तुम्हाला कशी आशीर्वाद देत आहे. खाली तुमची टिप्पणी लिहा. तसेच, तुमच्या दान देण्याद्वारे देवाच्या कार्याला साहाय्य करण्यास विसरू नका.)
प्रार्थना
पित्या, माझ्या अविश्वासासाठी मला क्षमा कर! माझ्या संपूर्ण अंत:करणापासून मी तुझ्याकडे वळतो व ते ताजेतवाने होणे प्राप्त करतो जे तुझ्या सान्निध्यापासून येते. येशूच्या नावात. आमेन. (प्रेषित ३:१९)
Join our WhatsApp Channel
Most Read
● सामर्थ्यशाली तीन-पदरी दोरी● तुम्हाला कोण मार्गदर्शन करीत आहे?
● लहान तडजोडी
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -६
● ख्रिस्ती लोक डॉक्टर कडे जाऊ शकतात काय?
● पवित्र आत्म्याच्या प्रकटीकरणात्मक इतर दानास मिळविण्याचा मार्ग मिळवा
● आध्यात्मिकदृष्टया तुम्ही योग्य आहात काय?
टिप्पण्या