“जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान केलेला होईल; मी ‘जीवनाच्या पुस्तकातून’ त्याचे नाव ‘खोडणारच’ नाही, आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्याचे नाव पत्करीन.” (प्रकटी. ३:५)
ही शुभ्र वस्त्रे शुद्धता आणि पवित्रतेचे प्रतिक आहेत जी आपण ख्रिस्तावरील विश्वासाने प्राप्त करतो. ते प्रभू येशूच्या परिपूर्ण धार्मिकतेला प्रतिनिधित करतात, जे आपल्या पापाला आवरण घालते आणि पवित्र देवासमोर आपल्याला निर्दोष उभे राहू देते.
आदाम व हव्वेने पाप केल्यावर, त्यांनी त्यांच्या नग्नतेला जाणले आणि स्वतःला अंजिराच्या पानांनी पांघरून घालण्याचा प्रयत्न केला (उत्पत्ती ३:७). तथापि, त्यांच्या लज्जेला आणि अपराधाला लपविण्याचा त्यांचा प्रयत्न व्यर्थ होता. हा परमेश्वर होता ज्याने त्यांना चामड्याचे वस्त्र पुरविले (उत्पत्ती ३:२१), जे धार्मिकतेचे अंतिम आवरण दर्शवित होते जे प्रभू येशू ख्रिस्ता द्वारे येईल.
ज्याप्रमाणे आदाम व हव्वेला देवाकडून आवरणाची आवश्यकता होती, त्याप्रमाणेच आपल्याला देखील धार्मिकतेची आवश्यकता आहे जी आपल्या स्वतःची नाही. यशया संदेष्ट्याने घोषित केले, “आम्ही सगळे अशुद्ध मनुष्यासारखे झालो आहोत; आमची सर्व नीतीची कृत्ये घाणेरड्या वस्त्रांसारखी झाली आहेत” (यशया ६४:६). धार्मिकतेसाठी आपला स्वतःचा प्रयत्न देवाच्या परिपूर्ण प्रमाणासाठी कमी पडतो. परंतु सुवार्ता ही आहे की ख्रिस्तावरील विश्वासाने, आपल्याला त्याच्या धार्मिकतेने परिधान केलेले आहे. जसे प्रेषित पौल लिहितो, “हे देवाचे नीतिमत्व तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे विश्वास ठेवणाऱ्या सर्वांसाठी आहे; त्यात भेदभाव नाही” (रोम. ३:२२).
जेव्हा आपण ख्रिस्ताच्या धार्मिकता परिधान केलेले असतो, तेव्हा देवाच्या उपस्थितीत आत्मविश्वासाने प्रवेश करण्याचा विशेषाधिकार असतो. इब्री लोकांस पत्र आपल्याला स्मरण देते, “म्हणून बंधूजनहो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला त्या मार्गाने परमपवित्रस्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आहे; आणि आपल्याकरता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे; म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंत:करणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ.” (इब्री. १०:१९-२२)
लग्नाच्या मेजवानीच्या दाखल्यामध्ये, येशू एका माणसाचे वर्णन करतो ज्याने लग्नाच्या मेजवानीला योग्य वस्त्र परिधान न करता प्रवेश केला होता (मत्तय २२:११-१४). जेव्हा त्याला विचारण्यात आले तेव्हा त्याच्याजवळ काहीही उत्तर नव्हते आणि शेवटी त्याला बाहेर घालवून देण्यात आले. दाखला आपल्याला शिकवतो की आपण देवाजवळ आपल्या स्वतःच्या योग्यतेच्या आधारावर जाऊ शकत नाही. आपण ख्रिस्ताची धार्मिकता धारण करून असले पाहिजे, जी आपल्याला विश्वासाद्वारे मुक्तपणे दिली गेली आहे.
प्रेषित पौल बदल जो घडून येतो त्यास सुंदरपणे सारांशीत करतो जेव्हा आपण ख्रिस्तावर आपला विश्वास ठेवतो : “ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्याआमच्याकरता पाप असे केले; ह्यासाठी की, आपण त्याच्या ठायी देवाचे नीतिमत्व असे व्हावे” (२ करिंथ. ५:२१). ख्रिस्ताने आपली पापे स्वतःवर घेतली, आणि त्याच्या बदल्यात त्याची धार्मिकता आपल्याला दिली. किती अविश्वसनीय बक्षीस!
ख्रिस्ताच्या धार्मिकतेच्या बक्षिसाला तुम्ही स्वीकारले आहे का? देवाबरोबर योग्य संबंधात असण्यासाठी तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रयत्नावर अवलंबून आहात का किंवा वधस्तंभावरील येशूच्या पूर्ण केलेल्या कामावर तुम्ही विश्वास ठेवत आहात का? अद्भुत कृपा जी तुम्हांला दिली गेली आहे त्यावर चिंतन करण्यासाठी थोडा वेळ घ्या. जर तुम्ही अजूनही ख्रिस्ताची धार्मिकता प्राप्त केलेली नसेल, तर आजच हा दिवस आहे की तारणाचे त्याचे मुक्त दान आत्मसात करावे. आणि जर तुम्ही आधीच त्याच्या धार्मिकतेला परिधान करून आहात, तर तुमचे जीवन हे त्याच्या कृपेच्या परिवर्तनीय शक्तीची साक्ष असावे.
तारणाच्या मौल्यवान वस्त्राला आपण कधीही गृहीत धरू नये जे ख्रिस्ताने आपल्याला दिलेले आहे. प्रत्येक दिवस कृतज्ञतेत घालवू या आणि धार्मिकता जी आपण प्राप्त केली आहे त्यास योग्य असे जीवन जगू या.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तुझ्या पुत्राच्या धार्मिकतेने मला परिधान केल्याने तुझे आभार. या मौल्यवान बक्षिसाला मी कधीही गृहीत धरू नये, परंतु त्याऐवजी प्रत्येक दिवस तुझ्या कृतज्ञतेत आणि भक्तीत जगावे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 1● देवाचे ७ आत्मे: पराक्रमाचा आत्मा
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- ३
● उपासना: शांतीसाठी किल्ली
● दिवस ०८ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
● खोटे बोलणे सोडणे आणि सत्य स्वीकारणे
● वातावरणावर महत्वाची समज - १
टिप्पण्या