आपल्यापैंकी अनेकांना ठाऊक आहे कीमीखूपच साधारण कुटुंबातून आलो आहे. सर्व काही इतके सोप्यारीतीने होत नव्हते, परंतुमाझे वडील आणि आई यांनी आम्हां तीन लेकरांना वाढविण्यात खूपच कष्ट केले. मला एक वाढदिवस आठवतो मी माझ्या आईला म्हटले मला एक भिंग विकत आणून दे. आज, कदाचित लेकरांसाठी ते अद्भुत मूल्य असणार नाही परंतु त्या मागील दिवसांत, ते काहीतरी एकमेव असे होते.
मी माझी भिंग घेऊन मुंग्यांना त्यांच्या छिद्रातून बाहेर येताना पाहत असे. ते फार मोठे दिसत असे, ते फार वेगळे दिसत असे.
मी सर्व सव्विस्तर पाहू शकत होतो. माझ्यासारख्या लेकराला, त्याने एक नवीन जग उघडे केले होते.
तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा; आपण सर्व मिळून त्याचा नावाची महती वर्णू या. (स्तोत्रसंहिता ३४: ३)
परमेश्वराची महती वर्णून तुम्ही त्यास मोठे करीत नसता. परंतु हो! तो तुमच्या मनाच्या दृष्टीकोनास भरतो आणि मग तो तुमच्या जीवनाचा मोठा भाग होतो.
तर मग कोणी परमेश्वराची महिमा कशी करावी?
ज्याकडे तुम्ही लक्ष दयाल ते तुमच्या मनात वाढेल.
दाविदाला परमेश्वराची महिमा करावयास पाहिजे होते. ते कसे करावे हे त्याने सांगितले: परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील; दीन हे ऐकून हर्ष करितील. (स्तोत्रसंहिता ३४: १-२)
हा फारच विनाशाचा वेळ आहे आणि तुमच्या विजयाचे स्थान जपण्यासाठी तुम्हाला तुमचे ध्यान योग्य गोष्टीवरकेंद्रित करावयाचे किंवा त्याकडे लावण्याची गरज आहे नाहीतर, ते तुमच्या दृष्टिकोनावर सावली करेल.
घरी, जेव्हा तुम्ही जरी काम करीत आहात, तेव्हा काही सौम्य संगीत वाजवा. त्याचीस्तुति करीत राहा, दिवसभरउपासनेचीगीते गात राहा. हे तुमचे अंत:करण व मन परमेश्वरावर स्थिर करेल. आणि म्हणून जेव्हा तुम्ही असे करता तेव्हा तुम्ही त्याचा महिमा वर्णाल आणि त्यास उंचवाल.
परमेश्वर हा तुमच्या जीवनाचा मोठा भाग होईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल की जे सर्व अडथळे तुमच्या मार्गात आहेत त्यावर प्रभुत्व मिळवावे.
Bible Reading: Isaiah 24-27
प्रार्थना
पित्या परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो की तू संपूर्ण विश्वाचा निर्माणकर्ता आहेस. सार्वकालिक परमेश्वर. सनातन पिता. एकमेव आणि सत्य परमेश्वर. आम्ही प्रार्थना करतो की जेव्हा आम्ही आमचे अंत:करण, मन आणि आमचे नेत्र तुझ्यावर केंद्रित करतो तेव्हा आम्ही पाहू तू प्रत्यक्षात कोण आहेस. आम्ही तुला उंचावितो आणि तुला महिमा, आदर आणि स्तुति देतो येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● देव पुरस्कार देणारा आहे● दिवस १८:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● पापी रागाचे स्तर उघडणे
● तुम्ही एका उद्देशा साठी जन्मला आहात
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे#1
● पृथ्वीचे मीठ किंवा मिठाचा स्तंभ
● विश्वासाचे बरे करणारे सामर्थ्य
टिप्पण्या