आजच्या समयात, अशक्त हे प्रबळद्वारे वर्चस्वात असतात, गरिबांवर श्रीमंत राज्य करतात वगैरे. तथापि, देवाच्या पद्धतीत, सामर्थ्य व सत्ता यांना जो सिद्धांत चालवितो तो जगाच्या नियमापेक्षा मुलभूतपणे वेगळा आहे.
सामर्थ्य हे दिलेले नाही की आपल्या स्वतःकडे लक्ष वेधून घ्यावे परंतु हे दिले गेले आहे की आपण आपल्या सभोवती जे आहेत त्यांच्यासाठी मीठ व प्रकाश असे व्हावे. त्याचे सामर्थ्य ही संपत्ति आहे जे देवाने आपल्याला दिली आहे त्याचे वाटेकरी व्हावे म्हणजे आपण इतरांना साहाय्य करावे, त्यांच्यावर वर्चस्व किंवा गैरवापर करू नये परंतु त्यांच्यावर प्रभाव करावा.
रोम १५:१ संदेशाच्या भाषेत असे लिहिले आहे, "आपण जे सशक्त आहो त्या पण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे." आणि केवळ ते करू नये जे आपल्यासाठी सोयीस्कर असे आहे. शक्ती ही सेवे साठी आहे, प्रतिष्ठे साठी नाही.
किल्ली#१
आपण जर देवासमोर नम्र राहतो, आणि जे काही त्याने आपल्याला दिले आहे त्याचा वापर ज्ञानानेव त्याच्या गौरवाकरिता करतो, तर परमेश्वर आपल्यावर अधिक साठी भरवंसा करू शकतो. परमेश्वराकडे तुमच्या सामर्थ्यामध्ये येऊ नका, परंतु परमेश्वराकडे तुमच्या सामर्थ्या साठी या.
"जो अगदी थोडक्याविषयी विश्वासू तो पुष्कळाविषयीही विश्वासू आहे; आणि जो अगदी थोडक्याविषयीअन्यायी तो पुष्कळाविषयीही अन्यायी आहे." (लूक १६:१०)
बायबल हे त्या लोकांच्या उदाहरणाने भरलेले आहे ज्यांनी परमेश्वरावर त्यांच्या गरजा व त्यांच्या विसंबून राहण्यासमान्य केले आहे. जोपर्यंत ते हे स्मरणात ठेवतात की परमेश्वर हा त्यांचे स्त्रोत व सामर्थ्य आहे, जे ते प्राप्त करतात हे त्याच्या गौरवाकरिता आहे, सर्व काही सुरळीत चालते.
प्रेषित पौल याचे एक मोठे उदाहरण आहे. जेव्हा त्यास सैतानाच्या दूता द्वारे त्रास झाला (ज्यास त्याने त्याच्या शरीरात टोचणारा काटा म्हटले आहे), त्याने देवाकडे साहाय्यासाठी विनंती केली. परमेश्वराने हे म्हणत उत्तर दिले:
"माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ति पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन" (२ करिंथ १२:९).
म्हणून आज, व प्रतिदिवशी, त्यास त्याचे सामर्थ्य व शक्तीनेतुम्हांला भरण्यासाठी विनंती करा. जेव्हा गोष्टी तुमच्या सभोवती घडू लागतात, नेहमीच हे स्वीकारा की हे त्याचे सामर्थ्य आहे जे तुमच्या अशक्तपणात कार्य करीत आहे. त्यास सर्व गौरव देण्याचे विसरू नका.
प्रार्थना
पित्या, तुझी कृपा मला पुरेशी आहे, तुझे सामर्थ्य माझ्या अशक्तपणात सिद्ध करते.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पारख उलट न्याय● शेवटच्या समयाची 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे #1
● वेदी ला प्राथमिकता दया की तुमचे जीवन बदलावे
● देवाचे मुख होणे
● भविष्यात्मक गीत
● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● २१ दिवस उपवासः दिवस १६
टिप्पण्या