मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय पाहतो. (१ शमुवेल १६:७)
एके दिवशी प्रभु येशू मंदिरात दानपेटीच्या अगदी बाजूला बसला होता. त्याने पाहिले की लोक दानपेटी मध्ये पैसे कसे टाकत होते (मार्क १२:४१). मी विश्वास ठेवतो की प्रभु येशू दानपेटी मध्ये लोक जेवढे पैसे टाकत होते केवळ तेच पाहत नव्हता परंतुलोक जे परमेश्वराला देत होते त्यांच्या हृदयाचे आंतरिक विचार सुद्धा तो पाहत होता.
हे अद्भुत आहे कीएक विधवे द्वारे दोन टोल्याचे अर्पण जे महत्वहीन असे दिसणारे होते त्याकडे प्रभूच्या नेत्रांनी पाहिले.
हे ते अर्पणाचे प्रमाण नव्हते ज्याने प्रभूचे लक्ष वेधून घेतले होते परंतु विधवेचे आचरण होते. हे मला हे सुद्धा सांगते की तुमच्या दान देण्याला सामर्थ्य आहे की प्रभूचे लक्ष वेधून घ्यावे.
२ इतिहास १६:९ म्हणते, "परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करितो."
अशक्त, गरीब, लाचार आणि ते जे गरजे मध्ये आहेत त्यांच्यासाठी ही एक महान सुवार्ता आहे. तुम्ही एका चमत्काराच्या गरजे मध्ये आहात काय? तर मग हे ओळखाकी परमेश्वराचे डोळे तुमच्यावर आहे की तुमच्या परिस्थिती मध्ये सामर्थ्याने दर्शवावे हे पण आवश्यक आहे की तुमचे हृदय हे त्याशी विश्वासू असावे.
नोहा च्या दिवसांत, परमेश्वराने पाहिले की पृथ्वी ही भ्रष्ट झाली आहे; आणि ती जाच-जुलुमांनी भरली आहे. देवानेजगामधील सर्व भ्रष्टता पाहिली, कारण पृथ्वीवरील प्रत्येक जण हा भ्रष्ट होता (उत्पत्ति६:११-१२).
परंतु नोहा हा निराळा होता. तो जमावासारखा चालत नव्हता आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत परमेश्वराचा शोध घेणारा होता. बायबल म्हणते, "परंतु नोहा वर परमेश्वराची कृपादृष्टि होती." (उत्पत्ति ६:८)
कोणीतरी म्हटले आहे, की मृत मासा सुद्धा उतरत्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातो परंतु केवळ जिवंत मासा हा पाण्याच्या प्रवाहा विरोधात जाऊ शकतो. प्रतिदिवशी अभक्तिपणा आपल्याभोवती वाढत आहे परंतु त्याने आपल्याला धैर्य सोडावे असे करू नये.
त्याऐवजी आपण नोहा सारखे परमेश्वराला अधिक आणि अधिक धरून राहावे. लक्षात ठेवा, परमेश्वराच्या डोळ्यापासून काहीही लपलेले नाही. दररोज परमेश्वराला हाक मारा, हे म्हणत, "परमेश्वरा, मला एक पवित्र जीवन व्यतीत करावयाचे आहे. मला साहाय्य कर परमेश्वरा, परमेश्वर स्वतः तुमच्या वतीने सामर्थ्यवान असे दर्शवेल. तुमच्या शत्रूला सुद्धा तुमच्या जीवनात देवाचे कार्य पाहावे लागेल.
Bible Reading: Job 3-8
प्रार्थना
पित्या, मला ते हृदय दे की जे प्रतिदिवशी; प्रत्येक परिस्थितीमध्ये तुझ्याशी प्रामाणिक राहील. तुझी कृपा मजवर या दिवसांत व नेहमीच राहो असे होवो. येशूच्या नांवात. आमेन.
पित्या, मला कृपा पुरीव की दररोज प्रार्थना करावी. जेव्हा मी तुझ्याजवळ येतो, माझ्याजवळ ये जे तूं येशूच्या नांवात आश्वासन दिले आहे. आमेन.
पित्या, मला कृपा पुरीव की दररोज प्रार्थना करावी. जेव्हा मी तुझ्याजवळ येतो, माझ्याजवळ ये जे तूं येशूच्या नांवात आश्वासन दिले आहे. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● परमेश्वराला महिमा कसा दयावा● तुमचा गुरु कोण आहे - I
● अडथळ्यांवरमात करण्याचे व्यवहारिक मार्ग
● महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते-२
● स्वर्गाचे आश्वासन
● लोक बहाणे करण्याची कारणे- भाग १
● सर्वांसाठी कृपा
टिप्पण्या