चमत्कारिक ताऱ्याने मागी लोकांना येशू होता त्या घरापर्यंत मार्गदर्शन केले. त्यांची अंत:करणे “अत्यंत मोठ्या आनंदाने” उफाळून आली (मत्तय २:१०). घरात गेल्यावर बाळास त्याची आई, मरीयेबरोबर पाहून, तुम्ही त्यांच्या आदराची आणि विस्मयाची कल्पना करू शकता का? प्रगल्भ उपासनेच्या क्षणात अपेक्षेचा कळस झाला आणि त्यांनी येशूसमोर तीन बक्षिसे ठेवली: सोने, ऊद आणि गंधरस.
ही सहज दिलेली चिन्हे नव्हती, प्रत्येकाचे एक भविष्यात्मक महत्व आहे जे आपल्याला जीवन, उद्देश, आणि येशूच्या भविष्याबद्दल देखील सांगते.
सोने:
हे मौल्यवान धातू हे नेहमीच राजेशाही आणि दैवत्वाचे प्रतिक आहे. सोने अर्पण करण्याने, मागी लोकांनी येशूला राजा म्हणून स्वीकारले- केवळ यहूद्यांचा राजा नाही तर विश्वाचा.
हे कलस्सै. २:९ मध्ये व्यक्त केलेल्या सत्याशी प्रतिध्वनित होते, “कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता मुर्तिमान वसते.”
ऊद:
धार्मिक समारंभासाठी उदबत्तीमध्ये वापरले जाणारे राळ, ऊद हे प्रार्थना आणि दैवी मध्यस्थीचे प्रतिक आहे. ज्याप्रमाणे धूर स्वर्गाच्या दिशेने वर जातो, त्याप्रमाणे येशू हा मानवता आणि देवाच्या मध्ये मध्यस्थ म्हणून उभा राहणार आहे. रोम. ८:३४ मध्ये, आपण वाचतो, “तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यांतून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करत आहे तो ख्रिस्त येशू आहे.”
गंधरस:
कदाचित, तिन्हींपैकी सर्वात रहस्यमय, गंधरस हे एक सुगंधी मलम आहे, ते ख्रिस्ताचे दू:खसहन, मृत्यू आणि पुनरुत्थानाचा पुर्वाभास देते. हा काही योगायोग नाही की गंधरस हा येशूला वधस्तंभावर देण्यात आला होता (मार्क १५:२३), आणि त्याला पुरण्यासाठी त्याच्या शरीराच्या तयारीसाठी वापरला गेला होता (योहान १९:३९-४०).
मागी लोकांच्या भेटवस्तू म्हणजे सोन्याच्या पन्नीत गुंडाळेल्या भविष्यवाण्या, एक सुगंधी ढग, आणि एक कडू मलम. ते येशूचा राजेशाहीपणा, मध्यस्थी करणारा म्हणून त्याची भूमिका, आणि मानवतेच्या उद्धारासाठी त्याचा अटळ मृत्यू आणि पुनरुत्थानाकडे इशारा करतात. बक्षिसांचा अर्थ जगाला समजण्याअगोदर सुवार्तेने त्यांना सारांशीत केले.
पूर्वेकडील ज्ञानी लोकांना स्वर्गीय चीन्हाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले की पृथ्वीला थक्क करणारी, दैवी रहस्ये ओळखावीत. जगाला जे अजून समजायचे होते त्याला त्यांनी स्वीकारले: येशू राजा होता, तो देव होता, तो मध्यस्थी करणारा होता आणि तो तारणारा होता जो मरण पावणार आणि पुन्हा उठणार होता. त्यांच्या शहाणपणात, त्यांनी एका बाळाला नमन केले, जो मुळात, त्यांचा निर्माणकर्ता आणि राजा होता.
आपल्याबद्दल काय? येशूसमोर आपण कोणती बक्षिसे आणतो? आपल्याकडे कदाचित सोने, ऊद व गंधरस नसेलही, परंतु सर्वात मौल्यवान बक्षीस जे आपण अर्पण करू शकतो ते आपण स्वतः आहोत- आपली अंत:करणे अधीन करणे आणि उपासना करण्याच्या स्थितीत, तो खरेच कोण आहे हे स्वीकारावे. जसे रोम. १२:१ आपल्याला आग्रह करते, “म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवितो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.”
प्रार्थना
प्रभू येशू, तुझ्या राजेपणाचा भारदस्तपणा आणि अद्भुतता, आमचा मध्यस्थी करणारा म्हणून तुझी भूमिका, आणि तुझ्या पुनरुत्थानाद्वारे मृत्युवरील तुझा विजय आत्मसात करण्यास आम्हांला मदत कर. आम्ही तुला आमचा राजा, आमचा याजक, आणि आमचा तारणारा म्हणून आमचे जीवन एक जिवंत बलिदान म्हणून अर्पण करावे असे होवो. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● शांति तुम्हाला कसे बदलते ते शिका● वातावरणावर महत्वाची समज-३
● स्वप्न हे देवाकडून आहे हे कसे ओळखावे
● देवाचे वचन वाचण्याचे 5 लाभ
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-४
● प्रभावीपणे वेळेचे व्यवस्थापन कसे करावे
● देवासारखा विश्वास
टिप्पण्या