डेली मन्ना
शर्यत जिंकण्यासाठी दोन पी
Thursday, 8th of February 2024
25
19
838
Categories :
आध्यात्मिक वंश
आणि चला आपण शर्यत धीराने सहनशीलता व स्थिर चित्ताने व कार्यशील दृढते सह नियुक्त केलेल्या धावेच्या मार्गावर धावू जे आपल्यापुढे नेमून दिले आहे. (इब्री १२:१ ऐम्पलीफाईड)
जीवनाची शर्यत ही १०० मीटर रेषा ओलांडणे नाही, ही मैरेथॉन आहे. आणि मैरेथॉन धावण्यासाठी तुम्हाला सहनशीलता असली पाहिजे. सहनशीलता हे धीर व सातत्य मिळून आहे.
येथे काही वेळ असेन जेव्हा गोष्टी तुमच्यासाठी चांगल्या होत नसतील. अशा वेळी, आपल्याला शांतपणे देवाच्या आश्वासनामध्ये भरवसा ठेवण्याची गरज आहे, जे करण्यासाठी आपल्याला बोलाविले आहे त्यात सातत्य राखून असावे आणि धैर्य सोडू नये.
त्यामुळे आत्महत्त्या हे देवाच्या लेकराला पर्याय नाही; निराशा हे देवाच्या लेकराला पर्याय नाही. येथे अडथळे असतील, येथे अपयश असेल, आणि येथे फसवणूक असेल. परंतु तुमच्यापुढे निश्चित केलेला मार्ग असेल, तो धीराने व सातत्य राखून धावा.
राजा हिज्कीया हा एक नीतिमान राजा होता जो परमेश्वराच्या मागे चालण्यास संपूर्ण अंत:करणाने समर्पित होता. त्याने संपूर्ण इस्राएल, यहूदा, एफ्राईम, व मनश्शे यासर्वांना पत्रे पाठविली, की यरुशलेम ला वार्षिक वल्हांडणसणासाठी परमेश्वराच्या मंदिरात येण्यासाठी प्रत्येकाला आमंत्रित करावे.
त्या पत्रामध्ये संदेश सुद्धा होता हे म्हणत, "इस्राएल लोकहो, अब्राहाम, इसहाक व इस्राएल यांचा देव जो परमेश्वर त्याच्याकडे वळा" (२ इतिहास ३०:६)
याप्रकारे एफ्राईमव मनश्शे या प्रांतातील नगरानगरातून फिरत जासूद जबलूनापर्यंत गेले, पण लोकांनी त्यांची टर उडवून फटफजिती केली. (२ इतिहास ३०:१०)
तेथे तेव्हा निंदा करणारे होते; आता सुद्धा निंदा करणारे आहेत.
निंदा करणारे प्रत्येक युगात आहेत. नोहा ची निंदा केली गेली जेव्हा त्याने तारू बनविण्यास सुरुवात केली. आपल्या प्रभु येशूची निंदा केली गेली. धावणाऱ्यांची निंदा केली गेली. परंतु चांगली गोष्ट ही निंदा करणाऱ्यांकडे लक्ष न देता ते धाव धावत राहिले. निंदा करणारे निंदा करीत राहतील, तुम्ही धावत राहा.
देवाने जे करण्यास तुम्हाला बोलाविले आहे ते करण्याचे थांबू नका. देवाने ज्यासाठी तुम्हाला बोलाविले आहे ते सर्व व्हा.
गलती ६:७ मध्ये बायबल म्हणते, "फसू नका; देवाचा उपहास व्हावयाचा नाही."
देवाने जे करण्यासाठी आपल्याला बोलाविले आहे ते आपण जेव्हा करीत राहतो, लोक ज्यांस परमेश्वराने निवडिले आहे ते निश्चितच परमेश्वराकडे वळतील. तुम्ही देवाने-निश्चित केलेल्या शेवटापर्यंत पोहचाल.
तरी आशेर, मनश्शे व जबुलून यांतले काही लोक नम्र होऊन यरुशलेमेस आले; आणि यहूदाला देवाचा असा वरदहस्त प्राप्त झाला की राजाने व सरदारांनी परमेश्वराच्या वचनानुसार जी आज्ञा केली ती पाळण्यास ते एकचित्ताने तत्पर झाले. (२ इतिहास ३०:११-१२)
मी आदेश देतो व घोषणा करतो की तुमच्या कुटुंबाचे सदस्यहे वाचतील. तुम्ही शांतीमय डेऱ्यात निवास कराल. हार मानू नका आणि नियुक्त केलेल्या शर्यतीत धावणे सुरू करा.
प्रार्थना
१. पित्या, मीपडणार नाही; व मी चुकणार नाही वथकणार नाही. येशूच्या नांवात, मी मागे जाणार नाही.
२. पित्या असे होवो की माझ्या मार्गावरील प्रत्येक आवाहने, ही येशूच्या नांवात, माझ्या जीवनातील नवीन वाटचाल व यशाच्यापायरीचे दगड होवो.
३. मी मरणार नाही पण जगेन की पृथ्वीवरील माझे दिवसपूर्ण करीन. ख्रिस्तामधील माझ्या शेवटास, जिवंतांच्या भूमीतयेशूच्या नांवात मी पूर्ण करीन. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दुसऱ्यावर दोष लावणे● यहूदाच्या विश्वासघाताचे खरे कारण
● तुमच्या रांगेतच राहा
● अनिश्चिततेच्या काळात उपासनेचे सामर्थ्य
● मोठया संकटात
● इतरांसाठी प्रार्थना करणे
● प्रारंभीच्या अवस्थेत परमेश्वराचीस्तुति करा
टिप्पण्या