“मी तर आपल्या डोळ्यांशी करार केला आहे; मी कोणा कुमारीवर नजर कशी जाऊ देऊ?” (ईयोब ३१:१)
आजच्या जगात, वासनेचा मोह हा पूर्वी कधी नव्हता इतका अधिक प्रचलित झाला आहे. इंटरनेटच्या अविष्काराने आणि अश्लील सामग्री सहज उपलब्ध झाल्याने, पुष्कळ वैयक्तिक लोक या विषयाबाबत स्वतः संघर्ष करत आहेत. चर्चच्या एका सभासदाने व्यवसायातील त्याच्या एका भागीदाराच्या कार्यालयाकडून गेल्यानंतरचा त्याचा अनुभव मला सांगितला. जेव्हा त्याने त्या खोलीत सहज नजर टाकली, तेव्हा त्याच्या भागीदाराला कॉम्पुटरवर अश्लील चित्रे पाहत रममाण असलेला पाहताना त्याला धक्काच बसला जे बाहेरून सहजपणे पाहिले जाऊ शकत होते. जेव्हा चर्चच्या त्या सभासदाने त्याच्या भागीदाराला याबाबत विचारले, तेव्हा त्याबाबत लाज वाटावी किंवा त्यास लपविण्याऐवजी, त्याच्या भागीदाराने उत्सुकतेने त्याला अधिक दाखवले. ही घटना आपल्या समाजात अश्लीलता किती पसरलेली आहे आणि परिणामस्वरूप किती असंवेदनशीलता निर्माण झाली आहे यावर प्रकाश टाकते. प्रेषित पौल गलतीकराच्या त्याच्या पत्रात वासनेच्या धोक्याबद्दल आपल्याला ताकीद देतो, “मी तर म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहेत व आत्मा देहवासने विरुद्ध आहे; ही परस्परविरोधी आहेत, ह्यासाठी की, जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये.” (गलती. ५:१६-१७)
वासनेची फसवणूक
अश्लील चित्रे पाहण्यासाठी योग्य ठरवण्यासाठी सर्वात सामान्य निमित्तांपैकी एक हा, ‘हे कोणाला दुखावणे नाही.’ तथापि, हे खोटे आहे. वासना आणि अश्लील चित्र पाहणे याचा दूरगामी परिणाम आहे जे एका व्यक्तीपासून फार दूरपर्यंत जाते. इफिसकरांस त्याच्या पत्रात, पौल लिहितो, “परंतु पवित्र जनांना शोभते त्याप्रमाणे, जारकर्म, सर्व प्रकारची अशुद्धता व लोभ ह्यांचे तुमच्यामध्ये नावसुद्धा निघू नये. तसेच अमंगळपण, बाष्कळ गोष्टी व टवाळी ह्यांचाही उच्चार न होवो, ती उचित नाहीत; तर त्यापेक्षा उपकारस्तुती होवो.” (इफिस. ५:३-४)
अश्लील चित्रे पाहणे कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रभावाला कमी करते, तुमच्या प्रामाणिकपणाला नष्ट करते, तुमच्या विचार करण्याच्या प्रक्रियेला नुकसान पोहचवते आणि तुम्हांला प्रिय असणारे नातेसंबंध मोडण्याची भीती निर्माण करते. लैंगिकतेबद्दल विकृत दृष्टीकोनाकडे ते नेऊ शकते आणि कोणावर कटाक्ष नजर ठेवणे आणि इतरांचे शोषण करण्याकडे देखील नेऊ शकते. ख्रिस्ती म्हणून, आपल्याला शुद्धता आणि पवित्रतेचे जीवन जगण्यास पाचारण केलेले आहे, जे ख्रिस्ताच्या चारीत्र्यास प्रतिबिंबित करते.
मत्तय ५:२७-२८ मधील येशूचे शब्द वासनेच्या गंभीरतेला अधोरेखित करते, “व्यभिचार करू नकोस म्हणून [पूर्वी त्यांनी] सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे.” वासना हे केवळ एक हानिकारक विचार किंवा क्षणभर सहभाग करणे नाही; ते एक पाप आहे जे आपल्याला देवापासून वेगळे करते आणि ते आपल्याला विनाशाच्या मार्गाकडे नेऊ शकते.
पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने वासनेवर मात करणे
तर मग वासनेच्या मोहावर या जगात आपण कसे मात करू शकतो जे लैंगिक चित्रे आणि अश्लील साधनांनी भरलेले आहे? उत्तर हे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात आहे. यहूदा आपल्याला प्रोत्साहन देतो, “प्रियजनहो, तुम्ही तर आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा; पवित्र आत्म्याने प्रार्थना करा” (यहूदा २१). आपल्या स्वतःला प्रार्थना, उपास आणि देवाच्या वचनात रममाण करण्याने, आपण आपल्या आध्यात्मिक समर्थनाला बळकट करू शकतो आणि देहाच्या मोहाचा प्रतिकार करू शकतो.
प्रेषित पौलाने कलस्सैकरांस त्याच्या पत्रात वासनेवर उपाय करण्यासाठी व्यवहारिक सल्ला दिला आहे : तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ- ह्याला मूर्तीपूजा म्हणावे-हे जिवे मारा” (कलस्सै. ३:५). वासनेविरुद्ध लढयात आपण सक्रीय असले पाहिजे, प्रत्येक विचारांना नियंत्रणात ठेवावे आणि त्यांना ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारे करावे. (२ करिंथ. १०:५)
हे लक्षात ठेवणे देखील महत्वाचे आहे की वासनेविरोधातील आपला संघर्ष आपली व्याख्या करत नाही. रोम. ८:१ मध्ये जसे पौल लिहितो, “म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. [ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.]. जेव्हा आपण अडखळतो आणि पडतो, तेव्हा आपल्या तारणाऱ्याच्या प्रेमळ हातात क्षमा आणि पुनःस्थापना आपल्याला मिळू शकते.
वासनेवर मात करणे हा दैनंदिन लढा आहे ज्यासाठी जागरुकता, शिस्त आणि पवित्र आत्म्यावर विसंबून राहण्याची आवश्यकता लागते. जेव्हा आपण शुद्धता आणि पवित्रतेचे जीवन जगण्याचा धावा करत असतो तेव्हा आपल्या संघर्षाबद्दल आपण प्रामाणिक असले पाहिजे आणि ख्रिस्तामधील भरवशाचे बंधू आणि भगिनी यांच्याकडून मदत आणि हिशेबदेही घेण्यासाठी तयार असले पाहिजे. लक्षात ठेवा, प्रभू येशूने पाप्यांना एकटे सोडले नाही. तो त्याच्यापासून दूर जात नाही. त्याच्या प्रेमात वाट पाहा, हे जाणून की प्रत्येक परीक्षा आणि प्रत्येक संघर्षासाठी त्याची कृपा पुरेशी आहे.
“मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही; आणि देव विश्वसनीय आहे, तो तुमची परीक्षा तुमच्या शक्तीपलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचा उपायही करील, ह्यासाठी की, तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे.” (१ करिंथ. १०:१३)
दैनंदिन शुद्धतेचा पाठपुरावा करण्यास समर्पित होत, वासनेच्या मोहावर मात करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन देण्यासाठी आणि समर्थ करण्यासाठी पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आणि ज्ञानावर अवलंबून राहू या. जेव्हा आपण असे करतो, तेव्हा आपण स्वातंत्र्य आणि आनंदाचा अनुभव करू जे आपल्या जीवनात देवाच्या इच्छेचे पालन करण्याने येते.
प्रार्थना
पित्या, माझ्या समजचे डोळे उघड, माझ्या मार्गाच्या चुका मला पाहू दे व माझ्या वासनेपासून दूर जाऊ दे. तुझ्या बहुमुल्य रक्ता द्वारे माझे डोळे व माझ्या विचारांना आवरण घाल. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दैवी रहस्ये उघड करावीत● आपल्या आध्यात्मिक पात्याचे रक्षण करणे
● यहूदा च्या जीवनाकडून धडा- ३
● द्वारपाळ
● एक मृत व्यक्तिजिवंत व्यक्तींसाठी प्रार्थना करीत आहे
● सैतान तुमच्या कार्यात कसे अडथळे आणतो
● देवाचे वचन काय तुम्हाला अडखळवू शकते?
टिप्पण्या