सर्व परिस्थिती मध्ये धन्यवाद दया, कारण ख्रिस्त येशू मध्ये तुमच्यासाठी देवाची हीच इच्छा आहे. (1 थेस्सलनी 5:18)
जर कोणालाही निराश होण्याचे कारण असेल तर, ते पौल आणि सीला ला होते. ते शुभवर्तमान प्रचार करीत होते आणि ह्यासाठी त्यांना धरले, मारले आणि त्यांचे वस्त्र फाडले होते. सार्वजनिकरित्या अपमान केल्या नंतर, त्यांना साखळदंडात अडकवून अपराध्यांप्रमाणे तुरुंगात टाकण्यात आले होते.
परंतु मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असतां बंदिवान त्यांचे ऐकत होते (प्रेषित 16:25)
तुरुंगातील त्यांच्या स्तुती ने देवासाठी मार्ग तयार केला की काहीतरी अविश्वसनीय असे त्या फिलिप्पै येथील तुरुंगात करावे.
तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. (प्रेषित 16:26)
1. तुरुंगाची पाये ही हादरली.
2. सर्व दरवाजे हे उघडले गेले.
3. सर्वांची बंधने तुटली.
त्यांच्या स्तुती ने केवळ त्यांचे दरवाजे उघडले नाही परंतु सर्व दरवाजे उघडले.
त्यांच्या प्रार्थने ने केवळ त्यांची बंधने तुटली नाही परंतु सर्वांची बंधने तुटली.
सर्व परिस्थितीत प्रभूची तुम्ही स्तुती करणे हे ज्याविषयी तुम्ही अधिक विचार करत आहात त्यांची सुद्धा द्वारे उघडतील आणि त्यांची बंधने तोडतील.
तसेच, ते जर कुरकुर करीत व तक्रार करीत राहिले असते की प्रेमळ पिता हा त्यांना अशा भयंकर परिस्थितीत कसा काय टाकू शकतो, तर त्यांनी जेलर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला देवाकडे आणण्याची संधी गमाविली असती.
तुमच्यापैकी काही हे प्रभु मधील तुमच्या विश्वासाच्या कारणामुळे अत्यंत छळातून जात आहेत. धैर्य सोडू नका. प्रभूवर विश्वास धरून राहा. नीतिमानाला फार कष्ट होतात; तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवितो (स्तोत्रसंहिता 34:19). परमेश्वराची सेवा करण्याचे थांबू नका परंतु त्याची सतत स्तुती करा.
तुमचे तुरुंग हे तुमच्या स्तुती चे क्षेत्र होत आहे.
प्रार्थना
पित्या, तू जो प्रत्यक्ष आहे ते पाहण्यास मला साहाय्य कर. सर्व परिस्थितीत तुझ्यावर विश्वात ठेवण्यास मला शिकव हे स्मरणात ठेवून की तू कोण आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● मोठया संकटात● उपासनेला एक जीवनशैली बनवावे
● द्वारपाळ
● नवीन तुम्ही
● आर्थिकते मध्ये नवीन वाटचाल
● आपल्या तारणाऱ्याची विनाअट प्रीति
● तुमची कल्पना वापरा की तुमच्या वचनाला योग्य स्वरूप दयावे
टिप्पण्या