कुटील मनुष्य वैमनस्य पसरितो; कानास लागणारा मोठया स्नेह्यात फुट पाडितो. (नीतिसूत्रे 16:28)
निंदा ही काहीतरी आहे ज्याबाबतीत आपल्याला सावधान राहिले पाहिजे जेव्हा आपण नवीन संबंध बनवीत आहोत.
निंदा ही संबंधासाठीहानिकारकका आहे?
जसे पवित्र शास्त्र सांगते, निंदा ही चांगल्या मित्राला सुद्धा दूर करते. निंदा संबंध तोडते, विश्वास नष्ट करते, आणि निंदे सह आलेले दु:ख शब्द बोलून गेल्यानंतर बऱ्याच समयापर्यंत राहते.
लक्षात ठेवा कोणीतरी जो कोणाविषयी तुमच्याकडे निंदा करतो तो तुमच्याविषयी सुद्धा दुसऱ्याकडे निंदा करेल आणि निंदा मित्रता तोडते (नीतिसूत्रे 16:28). चला आपण आपल्या संबंधांचा आदर करू या आणि निंदे च्या विषारी जाळ्यात पडू नये.
वास्तवात, लोक जे तुमच्याजवळ आहेत त्यांच्याविषयी तुमच्याकडे निंदा करतील आणि त्यांच्याविषयी चुका शोधण्याचा प्रयत्न करतील म्हणजे ते तुमच्याजवळ येऊ शकतील. एकमर्यादाबनवून ठेवा की तुम्ही अशा गोष्टींना थारा देणार नाही जर ते त्या लोकांविषयी वाईट बोलतात जे तुमच्याघनिष्ठतेत आहेत.
सहकारीकिंवा मित्रा विषयी निंदा करणे हे कोणाबरोबर सहज संबंध बनविण्या सारखा मार्ग दिसतो, तथापि, हा काही चांगला मार्ग नाही की एक मजबूत, विश्वासू संबंध बनवावे.
वास्तवात, जर तुम्ही कोणाला जाणत असाल की ते असेच निंदा करीत असतात, तर अशा व्यक्तीवर विश्वास ठेवण्यात सावधानी बाळगा.
जेव्हा तुम्ही कोणा नवीन व्यक्तीला भेटता आणि निंदा ही उफाळून येते, तर सहजपणे संभाषण त्या गोष्टीपासून वेगळ्या विषयाकडे नेण्याचा प्रयत्न करा.जर ते कार्य करीत नाही, आणि तीच समस्या पुन्हा येत राहते, तर तुम्हाला त्या विषयाला प्रीतीने हाताळायचे आहे जे स्पष्टपणे तुमची मर्यादा दाखवीत असते.
निंदा करणे हे तुमच्यासाठी देवाच्या योजने मध्ये नाही. देवाने आपल्याला यासाठी निर्माण केले नाही की प्रत्येकाच्या चुका प्रत्येकाला दाखवीत राहण्याद्वारे एक-मेकांचा न्याय करत राहावे. बायबल आपल्याला निरंतर एक-मेकांवर प्रीति करण्यास सांगत आहे, इतरांशीतसे वागा जसे त्यांनी तुमच्याशी वागावे असे तुम्हाला वाटते. बोलण्याचे स्वातंत्र्य ह्याचा अर्थ हा नाही की आपण जिभेवर ताबा ठेवू नये.
प्रियजनहो, देवाने पवित्र आत्म्यामध्येस्वातंत्र्याचे जीवन जगण्यासाठी पाचारण केले आहे. परंतुह्या संधीला एक अद्भुत स्वातंत्र्यअसे पाहू नका की कोणाला तरी कुचेष्टेने पाहावे. स्वातंत्र्य म्हणजे आपण आत्म-केंद्रित राहण्यासापासून पूर्णपणे मुक्त व्हावे की आपण एक-मेकांचे दास व्हावे, जे सर्व काही आपण करतो त्यामध्ये प्रीती व्यक्त करावी. (गलती 5:13)
प्रार्थना
परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्यावाणीचे द्वार संभाळ, मला निंदा करण्यापासून राख. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमच्या मनाला शिस्त लावा● संबंधामध्ये राहण्याद्वारे अभिषेक
● आध्यात्मिक अभिमानावर मात करण्याचे ४ मार्ग
● उपासनेचा सुगंध
● येशूचे रक्त लावणे
● त्याच्या धार्मिकतेस परिधान करा
● देवासाठी आणि देवाबरोबर
टिप्पण्या