तुम्हाला ठाऊक आहे काय की आता सध्या प्रभु येशू स्वर्गात आहे, तुमच्या आणि माझ्यासाठी मध्यस्थी करीत आहे?
इब्री ७: २५ आपल्याला सांगते की, "ह्यामुळे ह्याच्या द्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे;
कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे."
आणि रोम ८: ३४ आपल्याला सांगते की, "तर दंडाज्ञा करणारा कोण? जो मेला इतकेच नाही, तर मेलेल्यातून उठला आहे, जो देवाच्या उजवीकडे आहे आणि जो आपल्यासाठी मध्यस्थीही करीत आहे तो ख्रिस्त येशू आहे."
येशू ख्रिस्ताच्या मृतांमधून पुनरुत्थानानंतर, येशूची सेवा मध्यस्थी करणे आहे. जरमध्यस्थीची सेवा ही येशूची सेवा आहे, तर ती आपली सुद्धा सेवा असली पाहिजे. मध्यस्थीची सेवा ही शेवटल्या काळाची सेवा आहे.
ही वास्तविकता की येशू सिंहासनासमोर मध्यस्थी करीत आहे हे याकडे स्पष्टपणे बोट दाखविते कीयेशू हा जिवंत आहे आणि त्याने पित्याकडून अधिकार प्राप्त केला आहे की आपला सिद्ध महायाजक असावे.
जुन्या करारात, मुख्य याजक यास दीक्षित केले जात होते की लोकांच्या वतीने कार्य करावे.
१. त्यांना इस्राएली लोकांच्या वतीने पापासाठी बलिदान करावयाचे होते आणि त्यांच्यासाठी प्रार्थना सुद्धा करावी. (इब्री ५: १)
२. परंतु यास पुन्हा पुन्हा करावे लागत होते.
३. याजक मरण पावले, तर नवीन याजक नियुक्त करावे लागत होते. (इब्री ७: २३)
फरक हा....
१. येशूला केवळ एकच वेळ बलिदान आणावे लागले. मग तो मृत्युमधून उठविला गेला. हे आपल्याला दाखविते की त्याच्या बलिदानपूर्वक मृत्यूचे सार्वकालिक मूल्य.
२. कारण तो कायमचे जिवंत आहे, तो युगानुयुग आपल्यासाठी मध्यस्थी करण्यास समर्थ आहे. तो ते कायमचे करीत आहे. (इब्री ७: २४)
येशूच्या मध्यस्थीचे कार्य सैतानाच्या कार्यास विरोध करते, जो कायमचे देवासमोर आपल्याला दोष देत आहे. (प्रकटीकरण १२: १०)
कदाचित काहीतरी तुम्हांला अडखळण करीत आहे आणि तुम्हांला शांति नाही. हे लक्षात ठेवा, की येशू आता सध्या तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजणांसाठी मध्यस्थी करीत आहे. ही अगदी वास्तविकता तुमच्या अंत:करणात शांति स्थापित करो.
Bible Reading: Isaiah 65-66 ; Jeremiah 1
प्रार्थना
प्रभु येशू, पित्यासमोरमला सादर करण्यासाठी मी तुला धन्यवाद देतो. तूं नेहमीच माझ्यासाठी मध्यस्थी करीत आहे. मला हे शिकीव कीहे समाधान इतरांना सुद्धा दयावे. मध्यस्थी करण्यास मला शिकीव. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● लैंगिक परीक्षेवर वर्चस्व कसे मिळवावे● प्रीतीची भाषा
● क्षमाहीनता
● अद्भुतरित्या नवीन मार्ग सापडणे (दिवस 13)
● प्रीति साठी शोध
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 3
● येशू एक बाळ म्हणून का आला
टिप्पण्या