डेली मन्ना
16
14
113
देवाचे ७ आत्मे: ज्ञानाचा आत्मा
Tuesday, 19th of August 2025
Categories :
आत्म्याची नावे आणि शीर्षके
देवाचे ७ आत्मे
ज्ञानाचा आत्मा हा तो आहे जो तुम्हाला देवाचे ज्ञान आणतो.
प्रेषित पौलाने इफिस येथील ख्रिस्ती लोकांसाठी पुढील प्रमाणे प्रार्थना केली:
आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा वप्रकटीकरणाचाआत्मा दयावा. (इफिस १:१७)
एक कारण की त्याने अशा प्रकारे प्रार्थना केली ते हे आहे कीकारण जरी इफिस येथील ख्रिस्ती लोक पवित्र आत्म्याची दाने प्रदर्शित करीत होते, परंतुज्ञान व प्रकटीकरणाच्या समज द्वारे जी परिपक्वता येते त्याचा त्यांच्यामध्ये अभाव होता.
हेअसेच प्रकरण आहे जे आज अनेक ख्रिस्ती लोकांच्या बाबतीत आहे. ते पवित्र आत्म्याच्या दानामध्येसामर्थ्याने कार्य करतात परंतु जेव्हा देवाच्या गोष्टींच्या ज्ञानात व समज मध्ये चालण्याचा विचार येतो तेव्हा त्याबाबतीत त्यांच्यात गंभीर अभाव दिसतो.
अशा लोकांना प्रार्थना करण्याची गरज आहे की देवानेत्याच्या समज मध्ये ज्ञान व प्रकटीकरणाचा आत्मा त्यांना दयावा. मग तेथे अत्यंत आवश्यक संतुलन असेल.
जेव्हा ज्ञानाचा अभाव असतो तेव्हा लोक नेहमी चुकीच्या निवडी करतात.अधिकतर वाईट पीक ज्याची आपण आज कापणी करीत आहोतहेअनेक वाईट निवडी ज्या आपण मागे भूतकाळात केल्या आहेत तेथपर्यंतआपल्यालाघेऊन जाऊ शकतात. तथापि, जेव्हाज्ञानाचा आत्मा तुमच्यामध्ये कार्य करीत आहे, जीवन हे मग कधीही कंटाळवाणे वाटणार नाही. हे मग विपुलपणे फलदायक असे होईल आणि देवाला आदर आणेल.
ज्यालाज्ञान प्राप्त [तो हे देवाच्या वचनापासून आणि जीवनाच्या अनुभवातून प्राप्त करतो] होते, जो सुज्ञता संपादनकरितो, तो मनुष्य धन्य [आनंदी, भाग्यवान, हेवा वाटावा असा] होय.
कारण त्याचा सौदा रुप्याच्या सौद्यापेक्षा, व त्याचा लाभ उत्कृष्ट सोन्यापेक्षा उत्तम आहे. ज्ञान मोत्यापेक्षा मौल्यवान आहे; आणि तुला कोणतीही इष्ट वाटणारी वस्तु त्याच्याशी तुल्य नाही. (नीतिसूत्रे ३: १३-१५ ऐम्पलीफाईड)
नवीन करारात आपल्याला काहीतरी जे शलमोनाच्या संपूर्ण ज्ञानापेक्षा उत्तम असे आहे- ख्रिस्त. तो आपले ज्ञान आहे. येशूने स्वतःला असे म्हणत संबोधले,"शलमोनापेक्षा महान येथे आहे." (मत्तय१२:४२)
त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशू मध्ये आहा, तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्व आणि पवित्रीकरण व खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ति असा झाला आहे. (१ करिंथ १:३०)
त्याच्यामध्ये ज्ञानाचे व बुद्धिचे सर्व निधि गुप्त आहेत (कलस्सै २:३). दुसऱ्या शब्दात, स्वर्गाचे सर्व ज्ञान व प्रकटीकरणाची अमर्याद समजहे ख्रिस्तामध्ये अंतर्भूत आहे.
आता ही एक गोष्ट आहे की येशूला तुमच्या तारणारा म्हणून पाहावे, आणि दुसरी फारच वेगळी की त्यास तुमच्या व्यक्तिगत प्रभु म्हणून पाहावे. जेव्हा येशू हा तुमच्या जीवनाचा प्रभु आहे, तो तुमचे विचार,तुमच्या भावना इत्यादिंना मार्गदर्शन देण्यास सुरुवात करेल.ह्यावेळीच दैवी ज्ञान तुमच्यात कार्य करण्यास सुरु करते.
Bible Reading: Jeremiah 25-27
अंगीकार
पित्या,मी तुला धन्यवाद देतो की ख्रिस्त माझे ज्ञान आहे. माझ्या जीवनाचा प्रत्येक भाग जो दैवी ज्ञानाच्या अभावात आहे, तो तुझ्या दैवी ज्ञानाने भरला जावा. पित्या, मला योग्यता दे की मी माझ्या समकालीन लोकांपेक्षा उत्कृष्ट असे करावे वउन्नति करावी. मी येशूच्या नांवात घोषणा करतो की असामान्य ज्ञान व समज हा माझा भाग व्हावा येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● त्याचे दैवी दुरुस्तीचे दुकान● दिवस २३ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थनेचे
● पवित्र शास्त्राच्या संपन्नतेचे रहस्य
● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी
● दिवस १३:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● पैसा चरित्राला वाढवितो
● आध्यात्मिक नियम: संबंधाचा नियम
टिप्पण्या