अगदी प्रारंभापासून, देवाने हे दर्शविले आहे की रणनीती ही व्यवस्था निर्माण करणे आणि उत्कृष्टता प्राप्त करण्यामागील किल्ली आहे. त्याने मासा निर्माण करण्याआधी, त्याने पाणी तयार केले. त्याने पक्ष्यांना आकाशात ठेवण्याआधी, त्याने आकाश निर्माण केले. उत्पत्ती 1:2-10 स्पष्ट क्रम प्रकट करते : देवाने पाया रचला; मग त्यास जीवनाने भरले.
हे तत्व आपल्याला महत्वाचा धडा शिकवतो : देव योजनेवाचून कधीही कार्य करीत नाही. रणनीती ही त्याच्या सृष्टी रचनेच्या संचारयंत्रणेत विणलेली आहे. जर आपल्याला उत्तम उद्याचा अनुभव करायचा आहे, तर आपण त्यासाठी आज तयारी केली पाहिजे.
प्रभू येशू : रणनीती करणारा तारणारा
येशू जगात तयारीवाचून आला नाही. देवाने बारकाईने त्याच्या येण्याची योजना केली. पवित्र शास्त्रात भविष्यात्मक असंख्य चित्रे आहेत, ते प्रत्येक मसीहाची झलक प्रदान करते. कुमारीकडून जन्म घेण्याची यशयाची भविष्यवाणी (यशया 7:14) ते मीखाचे बेथलेहेमकडे त्याच्या जन्माचे ठिकाण म्हणून इशारा करणे (मीखा 5:2), देवाची रणनीती शतकानुशतके उघड झाली आहे.
गलती. 4:4 मध्ये पौल लिहितो, “परंतु काळाची पूर्णता झाली, तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राधीन जन्मलेला असा होता.” देवाने इतिहासातील अचूक क्षण निवडला होता जेव्हा रोमी साम्राज्याचे रस्ते आणि पायाभूत सुविधा सुवार्ता पसरविण्यासाठी जलद मार्ग करून देईल. प्रत्येक सविस्तर घटना ह्या परिपूर्णपणाने रचलेल्या होत्या.
कल्पना करा की येशू त्या ठिकाणी किंवा त्या वेळेस जन्माला आला असता जेथे त्याचा संदेश लोकसमुदायांपर्यंत पोहचला नसता. देवाच्या रणनीतीपर वेळेने हे निश्चित केले की त्याच्या संदेशाने संपूर्ण जगाला प्रभावित करावे.
पेंटेकॉस्ट : दैवी रणनीतीचा दिवस
पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याचे येणे हा काही योगायोग नव्हता. देवाने एक विशेष दिवसाची निवड केली जेव्हा जगातील प्रत्येक राष्ट्रातील लोक यरुशलेम येथे एकत्र येतील. प्रेषित. 2:1-4 या नाट्यमय क्षणाचे वर्णन करते : इशारा वाचून तेथे प्रचंड वाऱ्यासारखा आवाज होता...आणि त्याने संपूर्ण इमारतीला भरून टाकले होते. मग, रानातील अग्नीसारखे, पवित्र आत्मा त्यांच्या पदानुसार पसरला.”
हे सहजगत्या घडलेले नव्हते. पेंटेकॉस्टचा दिवस हा यहूदी सण आहे ज्यात पीक उत्पन्न झाल्याचा उत्सव करतात आणि यरुशलेम शहर पाहुण्यामंडळींद्वारे भरून गेलेले होते. जेव्हा पवित्र आत्मा उतरला, तेव्हा वेगवेगळ्या राष्ट्रांतील लोकांनी त्यांच्या मातृभाषेत संदेश ऐकला (प्रेषित. 2:6-11). या पाहुण्यांनी तो संदेश त्यांच्या देशाला नेला, आणि पवित्र आत्म्याच्या अग्नीला दूरवर पसरविला.
दैनंदिन जीवनात रणनीती
जर देव त्याची योजना पूर्ण करण्यासाठी रणनीतीचा वापर करतो, तर आपण त्याचा किती अधिक वापर केला पाहिजे? नीतिसूत्रे 21:5 म्हणते, “उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात, जो कोणी उतावळी करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.” योजना करणे हे केवळ व्यवहारिक नाही; तर ते पवित्र शास्त्रानुसार आहे.
मी एकदा एका तरुण उद्योजगाकला भेटलो ज्याला व्यवसाय सुरु करण्यासाठी बोलावले गेले आहे असे वाटले जे मिशन कार्यास साहाय्य करेल. सरळपणे त्यास सुरुवात करण्याऐवजी, त्याने एक वर्ष उद्योजकावर संशोधन केले, संचारयंत्रणा तयार केली, आणि देवाच्या मार्गदर्शनाचा धावा केला. आज, त्याचा व्यवसाय भरभराटीत आहे, आणि तो जगभरातील मिशनरी लोकांना साहाय्य करतो. त्याचे यश हे अचानकपणे झालेले नव्हते; ते दैवी रणनीती तसेच विश्वासुपणे केलेल्या कार्याचा परिणाम होता.
रणनीतीमध्ये पवित्र आत्म्याची भूमिका
देव सर्वकाही आपण आपल्या स्वतःहूनच समजून घ्यावे अशी इच्छा करीत नाही. पवित्र आत्मा हा आपला मार्गदर्शक आहे, जो दैवी ज्ञान आणि समज प्रदान करतो. योहान 16:13 म्हणते, “तरी तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हांला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल.” पवित्र आत्म्याकडून निर्देशाचा धावा करणे हे आपल्या स्वतःच्या जीवनासाठी, कुटुंबासाठी आणि सेवाकार्यासाठी रणनीती तयार करण्यासाठी महत्वाचे आहे.
धार्मिक रणनीती विकसित करण्यासाठी व्यवहारिक पाऊले
1.प्रार्थनेने सुरुवात करा
तुमची जीवनासाठी देवाजवळ त्याच्या दृष्टांतासाठी मागणी करा. नीतिसूत्रे 3:5-6 आपल्याला स्मरण देते, “तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”
2.तुमच्या योजना लिहून ठेवा
हबक्कूक 2:2 म्हणते, “हा दृष्टांत लिहून काढ, पाट्यांवर ठळक लिही; म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे.” लेखन तुमची उद्दिष्टे स्पष्ट करते आणि तुम्हाला उत्तरदायी ठेवते.
3.सल्ला घ्या
नीतिसूत्रे 15: 22, “मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात.” धार्मिक शिक्षक आणि सल्लागारांसोबत राहा.
4.कार्य करा
एक रणनीती तेव्हाच परिणामकारक होते जेव्हा तुम्ही तसे करण्यासाठी पाऊले उचलता. याकोब 2:17 म्हणते, “ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे.” तुमच्या प्रयत्नांना आशीर्वादित करण्यासाठी देवावर भरवसा ठेवा जेव्हा तुम्ही आज्ञाधारकपणात पुढे प्रगती करता.
5.परिवर्तनशील व्हा
कधी कधी, देव आपल्या योजना समायोजित करतो. त्याच्या पुन्हा निर्देशासाठी तयार राहा, हे जाणून की त्याची रणनीती ही नेहमीच परिपूर्ण आहे. (यशया 55:8-9)
तुमच्या स्वतःला विचारा
- माझ्या जीवनात काही क्षेत्रे आहेत का जेथे मी स्पष्ट रणनीतीशिवाय कार्य करीत आहे?
- मी माझ्या योजना करण्याच्या प्रक्रीयेमध्ये पवित्र आत्म्याला कसे आमंत्रित करू शकतो?
- आज मी कोणती पाऊले घ्यावीत की माझ्यासाठी देवाजवळ जे भविष्य आहे त्याच्यासाठी तयारी करावी?
Bible Reading - Genesis 22 - 24
प्रार्थना
पित्या, अंतिम रणनीती करणारा असण्यासाठी तुझे आभार. शहाणपणाने योजना करण्यासाठी आणि माझे जीवन तुझ्या इच्छेनुसार समरूप करण्यासाठी मला शिकवण दे. पवित्र आत्म्या, मला सर्व सत्यात मार्गदर्शन कर आणि प्रत्येक निर्णयात मला ज्ञान प्रदान कर. माझ्यासाठी तुझ्याजवळ असणाऱ्या भविष्यासाठी तयार होण्यासाठी मला साहाय्य कर, हा विश्वासू ठेवून की तुझ्या योजना ह्या नेहमीच चांगल्यासाठी आणि तुझ्या गौरवासाठी आहेत. येशूच्या नावात, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सुवार्ता घेऊन जाणारे● भावनात्मकदृष्टया वाहवत जाऊन बळी पडणे
● दिवस ०५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● तुम्ही प्रार्थना करा, तो ऐकतो
● सामर्थ्यशाली तीन-पदरी दोरी
● अन्य भाषे मध्ये बोला व आध्यात्मिकदृष्टया ताजेतवाने व्हा
● देवाचे 7 आत्मे
टिप्पण्या