डेली मन्ना
दिवस ०२ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
Saturday, 23rd of November 2024
37
27
323
Categories :
उपास व प्रार्थना
सैतानी मर्यादांना मोडून काढणे
"फारो बोलला, तुम्हीं रानात जाऊन परमेश्वर तुमचा देव यास यज्ञ करावा यासाठी मी तुम्हांस जाऊ देतो; मात्र फार दूर जाऊ नका;...." (निर्गम ८:२८)
या दिवसासाठी आजचा शास्त्रपाठ प्रगट करतो की फारोने इस्राएली लोकांना कसे गुलाम म्हणून बंदिस्त ठेवले होते, ज्याने त्यांच्यावर मर्यादा घालून ठेवल्या होत्या आणि घोषणा केली होती की ते फार दूर जाऊ शकत नाही. दुर्दैवाने, अनेक ख्रिस्ती लोक त्यांच्या जीवनावर सैतानी मर्याद्यांच्या कार्याविषयी अज्ञानी असतात.
सैतानी मर्यादा काय आहेत?
सैतानी मर्यादा व्यक्ति, ठिकाण किंवा गोष्टींवर बंधने आणतात. ते व्यक्तीजवळ चांगल्या गोष्टी येण्यापासून रोखतात. हे सैतानी कार्य व्यक्तीची प्रगती थांबवू किंवा हळुवार करू शकते.
नेहमी हे लक्षात ठेवा की सैतानाच्या योजनेविषयी आपण अज्ञानी राहू नये (२ करिंथ २:११). तसेच, ख्रिस्ताला प्रगट केले गेले जेणेकरून सैतानाची कार्ये नष्ट करावी. (१ योहान ३:८)
त्यामुळे, जेव्हाकेव्हा आपण सैतानाच्या कार्याविषयी बोलतो, तेव्हा सैतानाला मोठे करू नये परंतु त्याऐवजी ख्रिस्ती लोकांना यांच्याविषयी ज्ञात करावे आणि त्यांना नष्ट करावे हा आहे.
कोणतीही सैतानी मर्यादा जी तुमचे कार्य, आरोग्य, कुटुंब किंवा जीवनाच्या गुणवत्तेवर परिणाम करीत असेल त्यास येशूच्या नावात आजच नष्ट केले जाईल.
सैतानी मर्यादांचे ३ मुख्य प्रकार
१. व्यक्तिगत मर्यादा
हे तेव्हा घडते जेव्हा व्यक्तीला प्रतिबंध केला जातो. मर्यादा ही स्वतःहून ओढून घेतलेली असेल (अज्ञानी पणामुळे) किंवा सैतानी शक्तीद्वारे लादली गेली असेल.
भारताच्या दुसऱ्या एका राज्यात शुभवर्तमान प्रसार कार्याच्या प्रवासाला जाताना एक मनुष्य एकदा आमच्याबरोबर आला. आम्ही विमानतळावर आतमध्ये प्रवेश करणे आणि इतर औपचारिक गोष्टी पूर्ण केल्या आणि विमानात प्रवेश करण्यासाठी वाट पाहत होतो. ज्यावेळेस विमानात बसण्याची वेळ आली, हा मनुष्य धापा टाकू लागला आणि त्यास काहीतरी होऊ लागले. आम्ही त्यास त्याच्या पत्नीबरोबर तेथेच सोडले ज्यांच्याबरोबर काही व्यवसायिक वैद्यकीय लोक साहाय्य करीत होते आणि आम्ही विमानात बसण्यासाठी पुढे गेलो. तो लहानसा प्रवास होता, आणि जेव्हा आम्ही पुन्हा विमानातून खाली उतरलो, मी त्याच्या पत्नीला फोन केला आणि त्याच्या आरोग्याविषयी चौकशी केली. मला आश्चर्य वाटले, की त्याने फोन घेतला आणि म्हणाला, "ज्यावेळी विमान वर उडाले त्याचवेळी, मी आश्चर्याने बरा झालो होतो."
आमच्या एक तासाच्या सुटकेच्या सभेदरम्यान, या मनुष्याने पूर्णपणे सुटका प्राप्त केली होती. देवाच्या आत्म्याने प्रगट केले होते की त्याच्या वंशात कोणीही यापूर्वी विमानाने प्रवास केलेला नव्हता, आणि तेथे त्याच्या जीवनावर सैतानी मर्यादा लावलेली होती.
२. सामुहिक मर्यादा
हा प्रतिबंध लोकांच्या गटावर लावला जातो, जसे कुटुंब, गाव, शहर किंवा राष्ट्र देखील. "त्यानंतर अरामाचा राजा बेनहदाद याने आपले सर्व सैन्य एकवट करून शोमरोनावर स्वारी करून त्यास वेढा घातला. तेव्हा शोमरोनात जबर महागाई झाली, वेढा एवढा भारी पडला की, गाढवाच्या एका मुंडक्यास ऐंशी रुपये आणि कबुतराच्या पावशेर विष्ठेस पाच रुपये पडू लागले" (२ राजे ६:२४-२५).
३. वित्तीय व आर्थिक मर्यादा
वित्तीय मर्यादेच्या चिन्हामध्ये बेरोजगारी, दारिद्र्य, आर्थिक कर्जाचे ओझे व संकटे ही आहेत.
देवाच्या सामर्थ्याने, मी तुमच्या जीवनावर आदेश देत आहे की कोणतीही सैतानी मर्यादा जी तुमच्या जीवनाविरुद्ध आहे ती येशूच्या नावात पवित्र आत्म्याच्या अग्निद्वारे नष्ट केली जावोत.
सैतानी मर्यादेचे पवित्र शास्त्रातून उदाहरणे
- यहोशवा आणि इस्राएली लोक
१ इस्राएल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या वेशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या; कोणी बाहेर गेला नाही की आंत आला नाही. २ परमेश्वर यहोशवाला म्हणाला, पाहा, यरीहो, त्याचा राजा व त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहेत." (यहोशवा ६:१-२)
इस्राएली लोकांनी मोठया अपयशास तोंड दिले होते आणि यरीहोला उध्वस्त करू शकले नव्हते कारण नगराचे द्वार बंद केलेले होते आणि त्याच्या भिंती भक्कम होत्या. देवाच्या साहाय्याशिवाय, मर्यादा नष्ट केली जाऊ शकत नव्हती, ते सेनेच्या शक्तीपलीकडचे होते.
- यहूदा विरुद्ध शिंग
"आणखी परमेश्वराने मला चार लोहार दाखविले. मी विचारिले, यांचे येथे काय काम? तो मला म्हणाला, ज्यांनी यहूदास परागंदा करून कोणास आपले डोके वर काढू दिले नाही ती ही शृंगे आहेत; परंतु आता त्यांस भेदरवून सोडावे व ज्या राष्ट्रांनी यहूदास परागंदा करण्यासाठी त्याच्या भूमीविरुद्ध आपले शृंग उचलिले त्यांची शृंगे पाडून टाकावी म्हणून हे आले आहेत." (जखऱ्या १:२०-२१)
सैतानी शृंगांनी लोकांना वाढण्यापासून रोखले होते; ही ती मर्यादा होती जिने लोकांच्या नियतीवर मर्यादा आणली होती. देवाने दैवीपणे संदेष्ट्यास दाखविले की आध्यात्मिक क्षेत्रात काय घडत आहे आणि लोक त्यांची आर्थिकता, आरोग्य आणि कारकीर्द मध्ये संघर्ष का करीत आहेत.
दैवी प्रकटीकरणाशिवाय, सैतानी मर्यादेच्या कार्यास समजणे हे कठीण होऊन जाते.
Bible Reading Plan : Matthew 8-12
प्रार्थना
१. देवाची स्तुति व उपासना करा (तुम्ही काही तल्लीन होणारे संगीत वाजवू शकता की तुम्हांस साहाय्य करावे.)
२. कोणतीही मर्यादा माझी आर्थिकता, आरोग्य व प्रगतीवर लावले गेले आहे ते येशूच्या नावात अग्निद्वारे नष्ट केले जावे.(यशया५४:१७, नहूम १:९)
३. हे परमेश्वरा, माझ्या जीवनाविरुद्ध कोणतीही गुप्त मर्यादा जी कार्य करीत आहे ती येशूच्या नावात उघड केली जावी. (ईयोब १२:२२, लूक ८:१७)
४. येशूच्या रक्ताने, माझ्या जीवनाविरुद्ध कार्य करणाऱ्या कोणत्याही सैतानी मर्यादेस येशूच्या नावात मी मोडत आहे. (प्रकटीकरण १२:११, कलस्सैकरांस २: १४- १५)
५. देवाच्या आत्म्याने, माझ्या प्रगतीला जे काही अडथळा करीत आहे त्यास येशूच्या नावात मी विखरून टाकीत आहे. (यशया ५९:१९, जखऱ्या ४: ६-७)
६. चांगली गोष्टी माझ्याकडे येण्यापासून जे काही अडथळा करीत आहे, मी त्यांस अग्निद्वारे येशूच्या नावात आता नष्ट करीत आहे.( अनुवाद २८: १२, स्तोत्रसंहिता ८४:११)
७. हे परमेश्वरा, येशूच्या नावात मला समर्थ कर की कार्यरत रहावे आणि चिंता करू नये, चालत राहावे आणि मूर्च्छित होऊ नये. (यशया ४०:२९-३१, फिलिप्पैकरांस ४:१३)
८. मी अलौकिक सामर्थ्य प्राप्त करतो की येशूच्या नावात सर्व अडथळे व मर्यादांना मोडून काढावे. ( मीखा२:१३, इफिसकरांस ६:१०)
९. येशूच्या रक्ताने, प्रत्येक वेदी, विचित्र वाणी जी माझ्या प्रगतीस अडथळा करीत आहे त्यास येशूच्या नावात मी शांत करीत आहे. ( इब्री लोकांस १२:२४, १ राजे १८ : ३८-३९)
१०. कमीत कमी १० मिनिटे अन्य भाषेमध्ये प्रार्थना करा.

Join our WhatsApp Channel
Most Read
● कृपा दाखविण्याचे व्यवहारिक मार्ग● वचन प्राप्त करा
● आध्यात्मिक प्रवेश द्वारांचे रहस्य
● विचार करण्यास वेळ घ्या
● देवाने एवढी प्रीती केली की त्याने दिला
● आत्म्याची नावे आणि शीर्षक: देवाचा आत्मा
● परमेश्वराला प्रथम स्थान देणे# २
टिप्पण्या