सवयी ह्या आपल्या दैनंदिन जीवनाचा पाया असे आहेत. आपण आपले रोजचे व्यवहार मजबूत करतो, आणि शेवटी आपल्या सवयी आणि नियमित कार्य आपल्याला घडविते आणि आपण कोण आहोत ते बनविते. अडथळे तुमचे लक्ष असंख्य दिशेमध्ये नेते. जर तुम्ही अडथळ्यांना शरण जाणाऱ्या सवयीत आहात, चला मला तुम्हांला त्याच्या परिणामा विषयी सावधान करू दया.
१. अडथळे तुमच्या नवनिर्मितीच्या मार्गामध्ये अडथळा करू शकतात
जर आपण प्रेषित 3 वाचले, एके दिवशी दुपारी प्रेषित पेत्र व योहान प्रार्थने साठी मंदिरात गेले. प्रवेशद्वाराजवळ, ज्यास सुंदर दरवाजा म्हणतात, एक मनुष्य, एक भिकारी जो जन्मापासून पांगळा होता तो तेथे होता. जेव्हा त्याने पाहिले की पेत्र व योहान मंदिरात जात आहेत, त्याने त्यांच्याकडे पैशाची भीक मागितली.
तेव्हा पेत्र व योहान ह्यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले; आणि पेत्र म्हणाला, आम्हांकडे पाहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लाविले. (प्रेषित ३: ४-५)
मला पाहिजे की तुम्ही लक्षपूर्वक ध्यानात घ्या, पेत्रानेपांगळ्याभिकाऱ्यास म्हटले, "आम्हांकडे पाहा" आणि भिकाऱ्याने पेत्राकडे लक्ष लाविले. त्याच वेळी चमत्कार घडला.
हे मला हे सांगते की तुमच्या जीवनात नवीन वाटचाल मिळविण्यासाठी तुम्हाला योग्य गोष्टींवर केंद्रित राहावयास पाहिजे. अडथळे हे तुम्हाला तुमच्या नवीन वाटचाल पासून हिरावून घेऊ शकतात.
२. अडथळे हे आपल्या जीवनात आणि ह्या जगामध्ये परमेश्वरकार्य करीत आहे हे पाहण्यास आपल्यालाप्रतिबंध करते.
इकडे वारा तोंडाचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या चवथ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, "भूत आहे"; आणि ते भिऊन ओरडले.(मत्तय १४:२४-२६)
विज्ञान मध्ये जरी इतकी प्रगती केली आहे, तरी आपण पाण्यावर चालू शकत नाही. येथे येशू पाण्यावर चालत होता.
एक मोठा चमत्कार त्यांच्या डोळ्यादेखत होत होता आणि वाऱ्या मुळे, वादळ व लाटा, यामुळे ते येशूला पाण्यावर चालत आहे हे पाहण्यास चुकले. वारा व लाटा हे अडथळे होते त्यांनी त्यांस येशू त्यांच्या जीवनात, ह्या जगात कार्य करीत आहे हे पाहण्यापासून रोखले होते.
Bible Reading: Ezekiel 43-44
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात,अद्भुत सामर्थ्याचा निरंतर पुरवठ्यासाठी मी तुला मागत आहे की प्रत्येक अडथळ्यांना उधळून लाव. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● दिवस ३१:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना● दिवस ३९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● निंदा संबंधाला नष्ट करते
● आध्यात्मिक अभिमानावर मात करण्याचे ४ मार्ग
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -३
● जिवासाठी देवाचे औषध
● सुवार्ता पसरवा
टिप्पण्या