डेली मन्ना
येशू खरेच तरवार आणण्यासाठी आला होता काय?
Wednesday, 18th of September 2024
19
17
275
Categories :
अंतिम क्षण
मी पृथ्वीवर शांतता आणावयास आलो असे समजू नका; मीशांतता आणावयास नव्हे तर तरवार चालवावयास आलो आहे.35 कारण'मुलगा व बाप, मुलगी व आई, सून व सासू ह्यांच्यात फुट' पाडण्यास मी आलो आहे; आणि'मनुष्याच्या घरचेच लोक त्याचे वैरी होतील.' (मत्तय 10:34-36)
जास्त गैरसमजूत झालेल्या ह्या उताऱ्यात, येशू संदेष्टा मीखा (7:6)चा संदर्भ देत आहे. तसेच तरवार ज्याचा उल्लेख येशूने केला आहे हे शब्दश: नाही तर चिन्हात्मक आहे.
तुम्ही पाहा, जेव्हा पेत्राने तरवार उपसली की महायाजकाच्या सेवकाचा कान कापला की गेथसेमाने बागेत येशूचे संरक्षण करावे, तेव्हा येशूने त्यास झिडकारले आणि म्हटले तरवार बाजूला कर आणि म्हटले, "तरवार धरणारे सर्व जण तरवारीने नाश पावतील" (मत्तय 26:52). मग तो स्वेच्छेने त्याचे जीवन समर्पण करतो आणि संपूर्ण जगाच्या पापासाठी मरण पावतो.
अनेकांनी मला हा प्रश्न विचारला आहे, "तर मग का, येशूने म्हटले, "मी शांतता करावयास आलो नाही, परंतु तरवार चालवावयास आलो आहे? कोणत्या प्रकारची तरवार चालवावयास येशू आला आहे?
येशूचे एक नाव हे 'शांतीचा राजकुमार' असे आहे (यशया 9:6).
योहान 14:27 मध्ये येशूने म्हटले, "मी तुम्हांस शांति देऊन ठेवितो; मी आपली शांति तुम्हांस देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही, तुमचे अंत:करणअस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये."
वरील वचन आणि बायबल मधील तशी अनेक वचने हे स्पष्ट करतात की, येशूशांति आणण्यासाठी आला-मनुष्य आणि परमेश्वराबरोबरील शांति.
येशूने स्पष्टपणे उल्लेखिले आहे, "मीच मार्ग, मीच सत्य व मीच जीवन आहे. माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याजवळ कोणी जाऊ शकत नाही" (योहान 14:6). ते जे परमेश्वर आणि येशू द्वारे तारणाच्या एकच मार्गाचा नकार करतात तेस्वतःला परमेश्वराबरोबर सतत युद्धात पाहतील. परंतु ते जे त्याच्याजवळ पश्चातापी होऊन येतात ते स्वतःला परमेश्वराबरोबर शांति मध्ये पाहतील.
ह्या शेवटच्या समया दरम्यान, येथे चांगले आणि वाईट, ख्रिस्त आणि ख्रिस्त विरोधक,तेज्यांनी ख्रिस्ताला त्यांचा एकमेव तारणारा असे स्वीकारले आहे आणि ते ज्यांनी स्विकारीले नाही यामध्ये संघर्ष असेल. अनेक वेळेला हा गट कुटुंबाच्या आत अस्तित्वात असतो, जेथे कोणी विश्वासू आहेत आणि इतर हे नाहीत.
मत्तय 10:34-36 मध्ये येशूने म्हटले आहे, तो ह्या पृथ्वीवर आला आहे पृथ्वीवर शांति आणण्यासाठी आला नाही परंतु तरवार, एक शस्त्र जे विभाजन करते. त्याचे पृथ्वीवर येण्यामुळे,काही मुले त्यांच्या आई-वडिलां विरोधात होतील आणि मनुष्याचे वैरी हे त्यांचेच स्वतःच्या घरचे लोक असतील.
हे याकारणासाठी की ज्यांनी येशूच्या मागे चालण्याचे निवडले आहे त्यांस त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाच्यासदस्यांद्वारेनेहमी द्वेष केलाजातो.प्रभूच्या मागे खरेचचालण्याची ही किंमत आहे.प्रभु येशूने स्पष्टपणे उल्लेखिले आहे की आपल्या स्वतःच्या कुटुंबासाठी आपली प्रीति ही त्याच्यासाठी असणाऱ्या आपल्या प्रीति पेक्षा मोठी नसली पाहिजे (मत्तय 10:37 वाचा).
ते ज्यांनी ह्या उताऱ्यास संपूर्ण इतिहासातून हिंसेला न्यायी ठरविण्यासाठी वापरले आहे ते त्यास बदलत आहेत की त्यांच्या स्वतःच्या हिंसात्मक आकाक्षांना योग्य असे ठरवावे.
प्रार्थना
पित्या,स्पष्टता, प्रोत्साहन व आशा जे तुझे वचन माझ्यासाठी आणत आहे यासाठी मी तुलाधन्यवाद देतो.
पित्या, मला साहाय्य कर जेव्हा मी प्रतिदिवशी तुझे वचन वाचतोकी तुझ्याबरोबर माझे संबंध घनिष्ठ करावे.
पित्या, तुझ्यावचना द्वारे तुझ्या स्वतःला आणि तुझ्या इच्छेला मला प्रकट कर. मला साहाय्य कर की मी माझ्या स्वतःच्या समजेवर अवलंबून राहू नये. येशूच्या नांवात. आमेन.
पित्या, मला साहाय्य कर जेव्हा मी प्रतिदिवशी तुझे वचन वाचतोकी तुझ्याबरोबर माझे संबंध घनिष्ठ करावे.
पित्या, तुझ्यावचना द्वारे तुझ्या स्वतःला आणि तुझ्या इच्छेला मला प्रकट कर. मला साहाय्य कर की मी माझ्या स्वतःच्या समजेवर अवलंबून राहू नये. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● धन्य व्यक्ती● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-१
● परमेश्वराला विचारणे (चौकशी करणे)
● उपासनेला एक जीवनशैली बनवावे
● एक घुंगरू व एक डाळिंब
● अडथळ्यांची भिंत
● देवाचे वचन आपल्या अंतःकरणात रोपावे (लावावे).
टिप्पण्या