डेली मन्ना
२१ दिवस उपवासः दिवस १८
Wednesday, 29th of December 2021
55
8
1998
Categories :
उपास व प्रार्थना
तुमच्या सुटके साठी सामर्थ्यशाली उद्देश
परमेश्वर हा उद्धेशाचा परमेश्वर आहे. परमेश्वर उद्देशा शिवाय काहीही करीत नाही. त्याने पृथ्वीला उद्देशा साठी निर्माण केले.
येथे तुमच्या सुटके साठी सुद्धा उद्देश आहे.
त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. (कलस्सै १:१३)
अनेक ख्रिस्ती लोक त्यांची सुटका प्राप्त करण्यास किंवा तशीच जपण्यास चुकतात कारण ते त्यांच्या सुटकेचा उद्देश समजत नाहीत. तर मग तुम्ही पाहा की तुमच्या सुटकेचा उद्देश तुम्हाला समजणे हे किती महत्वाचे आहे.
नंतर येशू पेत्राच्या घरात गेल्यावर त्याची सासू तापाने पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तीचा ताप निघाला; आणि ती उठून त्याची सेवा करू लागली. (मत्तय ८:१४-१५)
ती आजारी होती, परंतु ज्याक्षणी ती बरी झाली, ती उठली व तिने त्यांच्या सेवा केली. 'त्यांची' म्हणजे केवळ येशूची नाही तर त्याच्याबरोबर जे लोक होते त्यांची सुद्धा सेवा केली. तुमच्या सुटकेचा उद्देश हा त्याची सेवा करणे होय.
मनन करण्यासाठी पवित्र शास्त्रातील वचने
स्तोत्र ३४ (हे मोठयाने वाचा)
गलती ५:१
स्तोत्र १०७:६-७
२ पेत्र २:९
तुमच्या स्वतःला, तुमच्या घराला, तुमच्या संपत्तीला व तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तेलाने अभिषेक करा. जरा तुमच्या घरात पाळीव प्राणी आहेत त्यांना सुद्धा तेलाने अभिषेक करा.
स्तुती व उपासने द्वारे सुरुवात करा. परमेश्वराची उपासना करीत काही वेळ (कमीत कमी १० मिनिटे) घालवा. (उपासनेची गीते गा किंवा सौम्यपणे संगीत वाजवा की तुम्हाला उपासना करण्यास साहाय्य करावे.)
४० दिवसांची बायबल वाचन योजना
यहूदा १; प्रकटीकरण १-९
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा.
१. मी सामर्थ्य प्राप्त करतो की माझा पाठलाग करणाऱ्यांचा पाठलाग करावा व माझ्यावर आक्रमण करणाऱ्यांवर आक्रमण करावे येशूच्या नांवात.
२. माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या विरोधात कोणताही सैतानी याजक वाईट वेदीजवळ कार्य करीत आहे, येशूच्या नांवात न्यायाचा अग्नि प्राप्त करो व जळून राख होवो.
३. हे परमेश्वरा माझ्या कुटुंबाचा इतिहास पुन्हा लिहिण्यासाठी येशूच्या नांवात माझा उपयोग कर.
४. माझे सर्व आशीर्वाद जे माझ्या पूर्वजांच्या आत्म्याने हिरावून घेतले आहेत, येशूच्या नांवात अग्निद्वारे ते मला पुन्हा प्राप्त होवोत.
५. अंधाराच्या राज्यात मला किंवा माझ्या कुटुंबाच्या सदस्यांना प्रतिनिधित करणारी कोणतीही वस्तू येशूच्या नांवात पेटून राख होवो.
६. पवित्र आत्म्याच्या अग्नि येशूच्या नांवात माझा पाया शुद्ध कर. येशूच्या रक्ता, येशूच्या नांवात माझ्या पायाला धुवून काढ.
७. तूं वाईटाच्या सामर्थ्या, येशूच्या नांवात मजवर व माझ्या कुटुंबावरील तुझी पकड सोडून टाक.
८. कोणतेही वाईट अन्न किंवा पेय ज्याने माझ्या शरीरात किंवा माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या शरीरात प्रवेश केला आहे ते येशूच्या नांवात पवित्र आत्म्याचे अग्निद्वारे शुद्ध केले जावो. (काही वेळ हे सतत बोलत राहा.)
९. माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवनात व भारत देशात सैतानाची प्रत्येक योजना जी देवाच्या कार्यास अडथळा करीत आहे, येशूच्या नांवात ती काढून टाकली जावो.
१०. २१ दिवसांचा प्रार्थना कार्यक्रम जे करीत आहेत त्या लोकांसाठी प्रार्थना करण्यात काही वेळ घालवा की ते वाईट बंधनातून सोडविले जावे की परमेश्वराची सेवा करावी.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सर्वांसाठी कृपा● त्याच्याद्वारे काही मर्यादा नाही
● ऐक्य आणि आज्ञाधारकपणाचा दृष्टांत
● महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते-२
● अन्य भाषे मध्ये बोला व आध्यात्मिकदृष्टया ताजेतवाने व्हा
● आर्थिकते मध्ये नवीन वाटचाल
● देवाच्या मंदिरातील स्तंभ
टिप्पण्या