तिसऱ्या दिवशी पर्यंत , बायबल मधील निवास मंडपाच्या वर्णनानुसार, काहीतरी असामान्य घडते.मोशेने देवाच्या आज्ञेप्रमाणे अचूकपणे सर्व काही केले—तंबू उभारला, प्रत्येक वस्तू योग्य क्रंमां अनुसार ठेवल्या आणि दिलेल्या सूचनेप्रमाणे त्याचे अभिषेक केले. तेव्हा पवित्र शास्त्रात एक अद्भुत क्षण नोंदवला आहे:
“मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने (महिमेने )भरून गेला” (निर्गम 40:34).
देवाने केवळ मोशेच्या आज्ञापालनाची दखल घेतली नाही - तर त्याला आपल्या महिमेने प्रतिसाद दिला.
यातून एक सामर्थ्यशाली सत्य प्रकट होते: देव साठी तयार केलेले तो ते भरतो.
आज्ञापालनाने निवासस्थान तयार होते
मोशेने तंबू स्वतःच्या कल्पनें नुसार किंवा आवडीनुसार निर्माण नाही केले. पवित्र शास्त्रात वारंवार सांगते त्याने सर्व काही “जसे परमेश्वराने आज्ञा दिली तसेच केले” (निर्गम 40:16). आज्ञापालन नंतर प्रकट होते .
प्रभु येशूनेही हाच नियम,शिकवले, जेव्हा तो म्हणाला:
“जर कोणी माझ्यावर प्रीति करतो तर तो माझी शिकवण पाळील, माझा पिता त्याच्यावर प्रीति करील. आम्ही त्याच्याकडे येऊ व त्याच्याबरोबर राहू.” (योहान 14:23).
देवाची महिमा गोंगाट किंवा कार्य ने आकर्षित होत नाही - तर जो कोणी त्याच्याशी आणि त्याच्या वचनाशी अनुरूप (एकरूप) होतो त्या कडेच आकर्षित होते.
ती महिमा ज्याने प्रवेश बदलतो
जेव्हा तंबू महिमेने (तेजाने )भरून गेला,तेव्हा एक अनपेक्षित गोष्ट घडली:
“दर्शनमंडपावर मेघ राहिला म्हणून मोशेला आत जाता येईना.” (निर्गम 40:35).
ज्याने तो तंबू उभारले होते, तो सुद्धा सहजपणे आत जाऊ शकत नव्हता. का? कारण आपण देवाजवळ कसे येतो हे हेदेखील महिमेने बदलते. ओळखीचे रूपांतर आदरात होते.
स्तोत्र 24:3–4 आपल्याला आठवण करून देते:
“परमेश्वराच्या पर्वतावर कोण चढेल? … ज्याचे हात निर्मळ आहेत आणि ज्याचे हृदय शुद्ध आहे तो.”
हे नवीन वर्ष पुढे जात असताना, देव तुमच्यामध्ये त्याचे कार्य अधिक खोल (दृढ )करू शकतो—ते सोपे करून नाही, तर अधिक पवित्र करून.
बाहय (बाहेरच्या) महिमे पासून अंतर्गत वास्तविकता
जेथे एकेकाळी तंबू भरलेला होता, तेथे विश्वासू असे:
“ख्रिस्त येशू जो तुम्हांमध्ये आहे —महिमेची आशा” (कुलैकर 1:27).
2026 मध्ये देवाची इच्छा फक्त तुमच्या जीवना भेट देण्याची नाही,
तर ते पूर्णपणे वास्तव्य करण्याची आहे—तुमचे विचार, निर्णय, शब्द, सवयी आणि हेतू.
प्रेषित पौल आपल्याला आठवण करून देतो:
“तुम्ही देवाचे मंदिर आहात, हे तुम्हाला माहीत नाही काय?” (1 करिंथकर 3:16).
प्रश्न हा नाही की, देव आपली महिमा ओतणार का?
खरा प्रश्न हा आहे की, ते सामावून घेण्यासाठी आपल्या आत जागा तयार आहे का?
एक भविष्यवाणीची हाक
तयारी उपस्थितीला आमंत्रित करते.उपस्थिती महिमा प्रकट करते.महिमा जीवन बदलते.
दावीदाने ही तळमळ ओळखली होती, म्हणून तो प्रार्थना करत
म्हणाला,” मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे.
“मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे…….आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या….. (स्तोत्र 27:4).
वर्ष जसजसे पुढे सरकेल, तुमचे जीवन केवळ सुव्यवस्थित नसो - पण पवित्र केले असो – केवळ कार्यक्षम नसो तर वाचन अनुरूप (एकरूप) असो.
जेव्हा देव घरात वास करतो, तेव्हा काहीही पूर्वीसारखे राहत नाही.
Bible Reading: Genesis 8-11
प्रार्थना
पिता, मला महिमे शिवाय रचना नको आहे. मी तुमच्यासाठी तयार केलेली प्रत्येक जागा भरून टाक. माझ्या जीवनात तुझी उपस्थिती कायम राहो.येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● २१ दिवस उपवासः दिवस २०● वेदीवर अग्नी कसा प्राप्त करावा
● परमेश्वराचा आनंद
● अद्भुततेच्या क्षेत्रात प्रवेश मिळविणे
● काही अतिरिक्त भार घेऊ नये
● एका उद्देशाने जन्म घेणे
● संदेष्टा अलीशा चे जीवन-आध्यात्मिक-III
टिप्पण्या
