english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. एक गोष्ट: ख्रिस्तामध्ये खरा खजिना शोधणे
डेली मन्ना

एक गोष्ट: ख्रिस्तामध्ये खरा खजिना शोधणे

Monday, 19th of January 2026
6 5 32
Categories : परिवर्तन
प्रत्येक व्यक्तीच्या हृदयात काहीतरी अधिक शोधण्याचा प्रयत्न असतो, हे समजून घेणे की जीवनाचा अर्थ आपल्यासमोर जे काही स्पष्टपणे आहे त्यापेक्षा गहन अर्थ असणे आवश्यक आहे. हा शोध प्रभू येशू आणि श्रीमंत तरुण शासक यांच्या भेटीत स्पष्टपणे व्यक्त केला आहे. तरुण माणसाकडे संपत्ती, प्रतिष्ठा, नियमशास्त्राचे पालन करणे होते  आणि तरीही त्यास माहित होते की काहीतरी चुकलेले आहे-सार्वकालिक जीवनाचा त्याला अभाव होता.

माणसाच्या शोधासाठी येशूचे उत्तर हे गहन होते. 

“अद्यापि तुझ्यात एक गोष्ट उणी आहे; तुझे असेलनसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ती मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये” (लूक १८:२२). 

मार्क १०:२१ मध्ये, येशू प्रेमाने भरलेल्या नजरेने ही आव्हानात्मक आज्ञा देताना आपण पाहतो. हे दारिद्रतेसाठी पाचारण नव्हते तर खऱ्या श्रीमंतीसाठी होते- खजिना ह्या जगाचा नाही तर हृदयाचा आणि स्वर्गाचा खजिना.

तो माणूस जगाच्या मानकानुसार यशस्वी झाला होता, पण त्याला त्याचे यश रिकामी वाटले. जसे एका महान माणसाने एकदा लिहिले होते, “आपला प्रभू नैसर्गिक सद्गुणांना कधीच दुरुस्त करत नाही, तर तो आतून संपूर्ण माणसाची पुनर्रचना करतो.” तरुण शासकाचे कायद्याचे बाह्य पालन त्याच्या अंतर्गत दारिद्र्याला लपवू शकले नाही. येशूने एका गोष्टीकडे त्याचे लक्ष वेधले जी त्याच्या शिष्यत्वात अडथळा होती-त्याची संपत्ती, जी त्याच्या हृदयात मूर्ती झाली होती.

ज्याप्रमाणे येशूने तरुण माणसाचे अडथळे ओळखले, त्याप्रमाणेच तो आपल्याला आपले हृदय तपासण्यासाठी आणि पूर्ण शिष्यत्वामध्ये काय अडथळा आणते ते ओळखण्यासाठी बोलावतो. ती संपत्ती असू शकत नाही; ती महत्वाकांक्षा, नातेसंबंध, भीती किंवा सांत्वन असू शकते. ते काहीही असो, हे अडथळे प्रकट करण्यासाठी आणि दूर करण्यासाठी तारणकर्त्याची प्रेमळ नजर आणि त्याचा कोमल पण खंबीर हात लागतो.

बायबल आपल्याला मूर्तीविषयी चेतावणी देते, आपल्या जीवनात काहीही जे देवाचे स्थान घेते,

“कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल” (मत्तय ६:२१).

कलस्सै. ३:२ मध्ये प्रेषित पौल आपल्याला स्मरण देतो, “वरील गोष्टींकडे मन लावा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका.” आपल्या प्राथमिकता आणि जिव्हाळ्याचे मुल्यांकन करण्यासाठी ही वचने आपल्याला प्रोत्साहन देतात.

शिष्यत्व स्वीकारणे म्हणजे येशूचे अनुसरण करण्यासाठी सर्वकाही समर्पित करणे. हे परिवर्तन आहे जे आतून सुरु होते आणि आपल्या विश्वासात कसे जगतो त्यामध्ये प्रकट होते. जसे याकोब २:१७ स्पष्ट करते, “ह्याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे.” खऱ्या शिष्यत्वामध्ये केवळ विश्वास नाही तर कृतीचा समावेश असतो- एक जीवन जे प्रीती आणि ख्रिस्ताच्या उदारपणास प्रतिबिंबित करते.

येशूचे श्रीमंत तरुणास आमंत्रण आपल्यासाठी देखील दिले आहे: “या आणि माझे अनुसरण करा.” हे विश्वासाच्या प्रवासासाठी आमंत्रण आहे जे वैयक्तिक आहे. आपल्या स्वतःसाठी जगण्यास हे पाचारण नाही परंतु त्याच्यासाठी ज्याने आपल्या स्वतःला आपल्यासाठी दिले आहे.

शिष्यत्वाचा प्रवास आयुष्यभराचा आहे आणि शरणागतीच्या क्षणांनी भरलेला आहे. आपली “एक गोष्ट” सोडण्यातच आपल्याला ख्रिस्तामध्ये खरे जीवन मिळते.

बायबल वाचन योजना: निर्गम ४–६
प्रार्थना
पित्या, समर्पित शिष्यत्वापासून रोखून ठेवण्यास जे अडथळे आहेत ते मागे सोडून देण्यास आम्हांला मदत कर. तुला सर्वांहून अधिक खजिना करण्यास आम्हांला शिकव आणि तुझ्या पावलांनी आम्हांला खऱ्या जीवनाच्या मार्गावर ने. येशूच्या नावाने. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-४
● महानतेचे बीज
● कृपेचे माध्यम होणे
● जर ते तुमच्यासाठी महत्वाचे असेल, तर ते देवासाठीही महत्वाचे आहे
● परमेश्वराला प्रथम स्थान देणे# २
● कृपेचे प्रगट होणे
● देवाच्या समर्थ हाताच्या पकडीत
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन