english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. वाईट विचारांवरील युद्ध जिंकणे
डेली मन्ना

वाईट विचारांवरील युद्ध जिंकणे

Thursday, 27th of August 2026
17 16 133
Categories : मनाचे विचार सुटकेच्या
त्यांच्या विचारांचे फळ (यिर्मया ६:१९)
देव आपल्या विचारांबद्दल अधिक काळजी करतो.
एक मुख्य कारण यासाठी हे आहे की जे सर्व काही आपण करतो त्यामागे विचार असतो-चांगल्यासाठी किंवा वाईटासाठी.

#१: विचार आपल्या जीवनाला नियंत्रित करतात
"सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे" (नीतिसूत्रे ४:२३).

तुम्ही जेव्हा लहान बालक किंवा तरुण व्यक्ति होता, कोणीतरी तुम्हाला वारंवार अपयशी असे म्हटले, कोणत्याही कामासाठी चांगला नाही. जर तुम्ही तो विचार स्वीकारला असता, जरी तो चुकीचा होता, तरी त्याने तुमच्या जीवनास वळण दिले असते.

#२: आपले मन हे खरे युद्धाचे स्थळ आहे
कोणीतरी योग्यपणे म्हटले आहे, "ख्रिस्ती जीवन हे खेळाचे मैदान नाही तर युद्धाचे स्थळ आहे." हे युद्धाचे स्थळ हे कोणती राष्ट्रे नाहीत पण ते प्रत्यक्षात आपल्या मनात आहे. अनेक जण हे मानसिकदृष्टया थकलेले व निराश असे आहेत, धैर्य सोडून देण्याच्या काठावर आलेले आहेत प्रामुख्याने याकारणासाठी की ते तीव्र मानसिक संघर्षातून जात आहेत. तुमचे मन हे सर्वात मोठा ठेवा आहे, आणि सैतानाला तुमचा सर्वात मोठा ठेवा हवा आहे!

लक्षात घ्या, की प्रभु येशूने मनुष्यांच्या अंत:करणातून सर्वात पहिल्या गोष्टी ज्या बाहेर पडतात त्यांची वाईट विचार अशी नोंद केली आहे, जे मनुष्याला विटाळविते.

"कारण आतून म्हणजे माणसाच्या अंत:करणातून वाईट विचार निघतात; जारकर्मे, चोऱ्या, खून, व्यभिचार, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, हेवा, शिव्यागाळी, अहंकार, मूर्खपणा. ह्या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर निघतात व माणसाला भ्रष्ट करितात." (मार्क ७:२१-२३)

#3: तुमचे मन हे शांतीसाठी किल्ली आहे  
ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्यास तू पूर्ण शांति देतोस, कारण त्याचा भाव तुजवर असतो" (यशया २६:३).

लक्षात घ्या की सिद्ध शांति ही प्रत्यक्षता होते जेव्हा आपले विचार हे आपल्या परिस्थितीपेक्षा त्याजवर स्थिर असतात. प्रार्थना व उपासनेद्वारे तुम्ही तुमचे मन त्याजवर स्थिर ठेवू शकता.

तसेच, मनाचे युद्ध जिंकण्यासाठी, तुमचे मन त्या गोष्टींद्वारे भरा जे देवाला प्रसन्न करतात. यामुळेच हे महत्वाचे आहे की वचन वाचावे व त्यावर मनन करावे. कोणीतरी मला विचारले की त्याने दररोज किती अध्याय वाचावे? जेव्हा जवळ चांगले भोजन आहे, आपल्यापैकी बऱ्याच लोकांना जोपर्यंत आपण समाधानी होत नाही तोपर्यंत खावेसे वाटते. त्याप्रमाणेच देवाच्या वचनाच्या बाबतीत तुम्ही केले पाहिजे. तोपर्यंत वाचा जोपर्यंत आत्म्यामध्ये तुम्हांला भरले आहोत असे वाटत नाही.

तुमचे संपूर्ण जीवन-ज्यामध्ये तुमचे मन देखील आहे, ते येशू ख्रिस्ताला समर्पण करण्याद्वारे आजच सुरुवात करा. तुम्ही विजयात चालाल.

बाइबल वाचन : यिर्मया ४६-४८
अंगीकार
येशूच्या रक्ताद्वारे मी माझ्या विचारांना आच्छादित करितो. प्रत्येक शक्ती जी वाईट विचारांना आणू देते, मी तुम्हांला येशूच्या नावात बांधीत आहे. कोणतीही शक्ती जी मला दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहे ती येशूच्या नावात अग्निद्वारे भस्म होवो. देवाच्या वचनावर मी दररोज चिंतन करीन. माझ्या मनाला वचनाने मी भरू देईन. येशूच्या नावात. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● ठेसचा (नाराजी) लपलेला सापळा
● दबोरा च्या जीवनाकडून शिकवण
● वातावरणावर महत्वाची समज - १
● अनिश्चिततेच्या काळात उपासनेचे सामर्थ्य
● मोठी कार्ये
● दिवस ३६:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● पृथ्वीचे मीठ
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन