english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. अप्रसिद्ध नायक
डेली मन्ना

अप्रसिद्ध नायक

Thursday, 1st of October 2026
16 14 91
Categories : मुले
मला शिक्षकांसाठी मोठा आदर आहे आणि प्रत्येक दिवशी ते सामोरे जाणाऱ्या आव्हानांना समजतो. माझ्या जीवनात एकेकाळी शाळेच्या शिक्षक होतो आणि तरुण लेकरांना आदर्श लावण्यात आवश्यक असलेले समर्पण आणि संयम पहिल्या प्रथम समजतो. शिकवणे हे केवळ व्यवसाय नाही, ते एक पाचारण आहे जे करूणा आणि प्रीती आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणाच्या प्रगतीसाठी अटळ कटिबद्धतेची मागणी करते.

प्रथम शिक्षक म्हणून आई-वडिलांची भूमिका 
जरी औपचारिक शिक्षण हे महत्वाचे असले तरी, आईवडील त्यांच्या मुलांना आधारभूत कौशल्ये आणि शिष्टाचार शिकवण्यात मुलभूत भूमिका बजावतात. शिक्षक म्हणून त्यांना नेहमी दुर्लक्षिले जाते, परंतु मुलांच्या विकासावर त्यांचा प्रभाव हा गहन असतो. ज्या क्षणापासून बाळाचा जन्म होतो, तेव्हापासून आईवडील हे त्याचे प्रथम शिक्षक असतात, त्यांना आयुष्याच्या प्रारंभीच्या टप्प्यापासून मार्गदर्शन करीत असतात.
नीतिसूत्रे २२:६ मध्ये देवाचे वचन आईवडिलांच्या शिकवणीच्या महत्वावर भर देते, “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.” हे वचन आपल्याला स्मरण देते की आपले आईवडील टिकणारा प्रभाव निर्माण करतात, त्यांच्या मुलांचे चरित्र आणि भविष्याला वळण देत असतात.

शिक्षक म्हणून पवित्र आत्मा 
पृथ्वीवरील शिक्षकांपेक्षा, आपण दैवी शिक्षक, पवित्र आत्म्याला मानले पाहिजे. योहान १४:२६मध्ये, येशूने म्हटले, “तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हांला सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हांला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हांला आठवण करून देईल.” पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करतो, आपल्या मानवी क्षमतेपलीकडील शहाणपण आणि समज प्रदान करतो. ही दैवी शिकवण आपल्याला जीवनाच्या जटीलतेतून जाण्यासाठी चालण्यासाठी साहाय्य करते, जे आध्यात्मिक समज आणि स्पष्टता प्रदान करते.

शिक्षकांचा त्याग
शिक्षक हे कर्तव्याच्याही पलीकडे जातात, त्यांच्या विद्यार्थ्यांच्या लाभासाठी वेळ आणि शक्तीचा त्याग करतात. ते केवळ शिक्षक नाहीत, परंतु सुधारक, सल्लागार आणि आदर्श असे आहेत. शिक्षक त्यांच्या भविष्यात निवेश करतात, धड्यांची तयारी करणे, गृहपाठांवर गुण देणे आणि अतिरिक्त साहाय्य देण्यासाठी नेहमी अधिक कार्य करत असतात.
१ करिंथ. १५:५८मध्ये, आपल्याला अशा समर्पणाच्या मुल्याबद्दल स्मरण करून दिले आहे, “म्हणून, माझ्या प्रिय बंधूंनो, प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे तुम्ही जाणून आहात; म्हणून तुम्ही स्थिर व अढळ व्हा आणि प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक तत्पर असा.” जर तुम्ही एक शिक्षक आहात तर मला तुम्हांला प्रोत्साहन द्यायचे आहे आणि तुमचे श्रम व्यर्थ नाहीत हे मला तुम्हांला सांगायचे आहे; तुम्ही उत्तम भविष्यासाठी पाया निर्माण करत आहात.

आपल्या जीवनात शिक्षक
माझ्या स्वतःच्या अनुभवांवर चिंतन करत, ज्या शिक्षकांनी माझ्या जीवनावर प्रभाव टाकला आहे त्यांच्यासाठी मी कृतज्ञ आहे. त्यांनी माझ्या जीवनात शिकण्याच्या प्रीतीची आवड निर्माण केली आणि माझ्या स्वप्नांना साकार करण्यासाठी मला प्रोत्साहन दिले आहे. विशेषेकरून, रविवार शब्बाथ शाळेच्या माझ्या शिक्षकांनी, माझ्यावर कायमचा प्रभाव टाकलेला आहे. त्यांनी मला प्रीती, आदर आणि विश्वासाबद्दल अशा प्रकारे शिकवले आहे  जे व्यस्त ठेवणारे आणि सहज प्राप्त करता येणारे आहे. मत्तय १९:१४ आपल्याला अशा शिकवणींच्या महत्वाबद्दल स्मरण करून देते, “येशू म्हणाला, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना मनाई करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.

बाइबल वाचन : योना २-४; नहुम १-३
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, शिक्षकांच्या बक्षीसाबद्दल मी तुझे आभार मानतो. त्यांना शहाणपण, संयम आणि शक्तीने आशीर्वादित कर जेव्हा ते भविष्यातील पिढीला घडवत राहतात. त्यांची प्रशंसा केली जात आहे असे त्यांना वाटावे आणि त्यांचे परिश्रम हे कधीही व्यर्थ जाणार नाही हे त्यांनी ओळखावे. येशूच्या नावाने. आमेन.


Join our WhatsApp Channel


Most Read
● वेळेवर आज्ञापालन करणे
● सार्वकालिक निवेश
● यहूदाच्या पतनापासून ३ शिकवणी
● इतरांवर कृपा करा
● मध्यस्थी वर एक भविष्यात्मक शिकवण १
● २१ दिवस उपवासः दिवस ०५
● बीज चे सामर्थ्य - ३
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2026 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन