मरीयेने देवदूताला म्हटले, हे कसे होईल? कारण मला पुरुष ठाऊक नाही. देवदूताने उत्तर दिले, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परात्पराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील; ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र, असे म्हणतील. (लूक १: ३४-३५)
ही वचने दोन मार्गाचे वर्णन करतात ज्याद्वारे पवित्र आत्मा मरीयेचे जीवन कायमचे बदलेल. हे तुम्हाला सुद्धा होऊ शकते.
मरीये प्रमाणे, तुम्हाला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो: "हे कसे होऊ शकते?"
प्रथम, देवदूताने मरीयेला म्हटले, की"पवित्र आत्मा तिच्यावर येईल." देवाची उपस्थिती ही तिला प्रत्यक्ष होईल.
दुसरे, "परात्पराचे सामर्थ्यतिच्यावर छाया करील." ग्रीकशब्दाचा येथे अक्षरशः अर्थ हा की सावली टाकावी. जसे काही एका ढगा द्वारे वेढले जावे. हाच शब्द लूक ने वापरला आहे जेव्हा येशूच्या रूपांतराच्या अनुभवाचे वर्णन केले, जेव्हा एक ढग बनले आणि त्याने त्यास झाकले." (वाचा मार्क ९: २-९)
ही उदाहरणे आपल्याला हे पाहण्यास साहाय्य करतात जेव्हा पवित्र आत्मा आपल्या जीवनाला वेढतोतेव्हा आपण असामान्य कार्य करण्यास समर्थ होतो.
लक्षात ठेवा, परमेश्वर तुम्हाला कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही वेळेत उपयोगात आणू शकतो. जसे ते मरीयेला घडले, तुम्हांला सुद्धा भविष्यात्मक स्वप्ने, अगदी स्पष्ट दृष्टांत पाहण्याचा आध्यात्मिक अनुभव प्राप्त होईल, तुमच्या प्रार्थने द्वारे लोक स्वस्थ होतील, आणि दुष्ट आत्म्यापासून त्यांची सुटका होईल वगैरे.
मी समजू शकतो की आपल्या मानवी मनाला बऱ्याच वेळी असा विचार करणे अशक्य होते कीआपल्याद्वारे ते कार्य करण्यात पवित्र आत्मा समर्थ आहे. त्यामुळेच जर तुम्हाला पवित्र आत्म्याचे महान कार्य पाहावयाचे असेल तर तुम्ही तुमचे मन देवाचे वचन दररोज वाचण्याद्वारे नवीन केले पाहिजे.
रोम १२: २ म्हणते, "देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घावे, म्हणून ह्या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचे रुपांतर होऊ दया."
अशा प्रकारच्या रुपांतराच्या परिणामामुळे, परमेश्वराचा आत्मा आपल्याला समजदेईल जे आपले स्वतःचे नसेल. तुम्ही तुमच्या किंवा इतरांच्या जीवनाबद्दलअद्भुतरित्या प्रकटीकरणे प्राप्त कराल. ह्याविषयी तुम्हाला स्मरण देणे विसरू नका.
अशा समयाच्या वेळी, लोक जे तुमच्याभोवती आहेत ते तुम्हाला काहीतरी विशेष असे पाहतील परंतु वास्तविकता ही आणि ही नेहमी तशीच राहते की तुम्ही आणि मी हे केवळ मातीचे पात्र आहोत.
२ करिंथ ४: ७ म्हणते, "ही आमची संपत्ति मातीच्या भांडयात आहे, अशा हेतूने की, सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही, हे समजावे."
तुम्ही कदाचित, तरुण किंवा वृद्ध असाल, शिक्षित किंवा नाही, केवळ हे लक्षात ठेवा की त्याच्याद्वारे, येथे काही मर्यादा नाही.
प्रार्थना
पित्या,माझ्या जीवनात तुझ्या कार्या विषयी शंका घेण्यासाठीमला क्षमा कर. तूं जे सुरु केले आहे ते पूर्ण करण्यास तूं विश्वसनीय आहेस. माझ्या स्वतः बद्दल नकारात्मक शब्द बोलण्यासाठी मला क्षमा कर. मलानाविन्यपणे तुझ्या उपस्थितीने भर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-२● यहूदाच्या पतनापासून ३ शिकवणी
● स्वैराचाराच्या सामर्थ्यास मोडणे-२
● शर्यत धावण्यासाठी योजना
● दानधर्म करण्याची कृपा - ३
● दिवस ०२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● देवासाठी आणि देवाबरोबर
टिप्पण्या