"आणखी तो म्हणाला, "परमेश्वराचे राज्य असे आहे की, जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी झातो, दिवसा उठतो, आणि ते बी रुजते व वाढते, पण हे कसे होते हे त्याला कळत नाही." (मार्क ४:१६-२७)
देवाचे वचन बीजासारखे आहे जे आपल्या हृदयात रोवले पाहिजे की ते वाढावे व फळ द्यावे (लूक ८:११). ज्याप्रमाणे एक बी जमिनीत कोणत्याही अडथळ्यावीणा राहिले पाहिजे, त्याप्रमाणे आपण देखील देवाच्या वचनाला त्याच्या आश्वासनामध्ये विश्वास आणि भरवसा द्वारे आपल्या जीवनात मूळ धरू द्यावे. बायबल आपल्याला सांगते की देवाचे वचन त्याच्याकडे रिकामी परत जाणार नाही परंतु त्याचा उद्देश पूर्ण करील (यशया ५५:११). वचनाच्या परिवर्तनीय सामर्थ्याचा अनुभव करण्यासाठी, आपण वेळ व अवकाश दिला पाहिजे की त्याने आपल्या हृदयात कार्य करावे.
तथापि, प्रत्येक दिवशी बायबल काही मिनिटांसाठी वाचणे पुरेसे नाही, तर वचनाच्या शिकवणीनुसार आपले विचार, शब्द व कृती समरूप होण्यासाठी आपण जे काही शक्य आहे ते केले पाहिजे. जसे याकोब १:२२ आपल्याला आठवण देते, "वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका; अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करता." जर आपण वचनामध्ये केवळ थोडासा वेळ घालविला, पण दिवसाचा उरलेला वेळ त्याच्या शिकवणी विरोधात घालविला, तर आपण बी ला वाढण्याची संधी देण्याअगोदर खणून काढीत आहोत.
उदाहरणार्थ, चला असे म्हणू या की तुम्ही प्रतिदिवशी सकाळी वचनात पाच मिनिटे घालवीली आहे, जे इतरांबरोबर दयाळूपणे बोलण्याच्या महत्वाविषयी बोलते (इफिस ४:२९). तरीही, संपूर्ण दिवसभर, तुम्ही निर्दयी बोलणे आणि निंदा करण्यामध्ये सतत वेळ घालविला आहे. अशा प्रकारची वागणूक तुमच्या जीवनात देवाच्या वचनाच्या कार्याला अडथळा करते, आणि आध्यात्मिक फळाच्या वाढीला अडथळा करते. (गलती. ५:२२-२३)
या पद्धतीचा प्रतिकार करण्यासाठी, देवाच्या वचनावर मनन करणे हे महत्वाचे आहे. यहोशवा १:८ आपल्याला प्रोत्साहन देते की देवाच्या वचनावर दिवस-रात्र मनन करावे म्हणजे त्यात जे काही लिहिलेले आहे त्याचे आपण पालन करू शकावे. पवित्र शास्त्रात आपल्याला आढळणाऱ्या सत्यांचा आपण जेव्हा सखोल विचार करतो, तेव्हा आपण त्यास आपले विचार, भावना, निर्णय व कृतींवर प्रभाव करू देतो.
मत्तय १३:३-९ मधील पेरणाऱ्याच्या दाखल्याचा विचार करा. प्रभू येशू देवाच्या वचनाच्या विविध प्रत्त्युतराच्या फरकाबद्दल शिकवीत आहे. बी जे चांगल्या जमिनीत पडते त्यांचे प्रतिनिधित्व करते जे देवाचे वचन ऐकतात, त्यास समजतात आणि फळ देतात. चांगल्या जमिनीसारखे होण्याकरिता, आपण वचनाला आत्मसात केले पाहिजे आणि त्यास आपल्या दैनंदिन जीवनावर प्रभाव करू द्यावे.
वचनामधून एखाद्या विशेष सत्यावर मनन करण्यासाठी प्रतिदिवशी वेळ काढा. उदाहरणार्थ, सकाळच्या तुमच्या भक्तीबद्दल जर देव तुम्हांला क्षमेबद्दल बोलत आहे (मत्तय ६:१४-१५), तेव्हा त्यास तुम्हांला साहाय्य करण्यास विनंती करा की संपूर्ण दिवसभर ते सत्य स्मरणात ठेवावे आणि लागू करावे. जेथे क्षमेची गरज आहे अशा परिस्थितीला जेव्हा तुम्ही सामोरे जाता, तेव्हा वचनास तुमच्या प्रत्त्युतरास मार्गदर्शन करू द्या.
त्यासोबत, हे महत्वाचे आहे की तुम्ही स्वतःला ईश्वरी प्रभावाच्या सानिध्यात ठेवावे, जसे नीतिसूत्रे २७:१७ स्पष्ट करते, "तिखे तिख्याला पाणीदार करते, तसा मनुष्य आपल्या मित्रांचा चेहरा पाणीदार करतो." इतर विश्वासणाऱ्यांसोबत संगतीमध्ये राहणे हे वचनाच्या सत्यास प्रभावीपणे कार्य करू देण्यास साहाय्य करू शकते आणि तुम्हांला तुमच्या विश्वासाने जगण्याचा प्रयत्न करत असताना जबाबदारी प्रदान करते.
विचारपूर्वक प्रयत्न करा की तुमच्या कृतीने देवाच्या वचनास प्रतिबिंबित करावे. कलस्सै. ३:१७ आपल्याला सल्ला देते, "आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुति करा." याचा अर्थ हा आहे की आपल्या जीवनाचा प्रत्येक पैलू हा देवाचे वचन आणि त्याच्या इच्छेशी समरूप असला पाहिजे.
तर मग, आपल्या जीवनात देवाच्या वचनाचा पूर्ण प्रभाव अनुभविण्यासाठी, आपण केवळ ज्ञान प्राप्त करण्याच्याही पलीकडे गेले पाहिजे. आपण वचनावर मनन केले पाहिजे आणि त्यास आपले विचार व कृतींना वळण लावू द्यावे. असे केल्याने, आपण खरेच ख्रिस्ता-समान होऊ शकतो (रोम. ८:२९) आणि आध्यात्मिक फळ निर्माण करू शकतो ज्याची परमेश्वर आपल्या जीवनात इच्छा बाळगतो. (योहान १५:५)
स्तोत्र, ११९:१०५ स्मरण करा, "तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे." अंधाराने भरलेल्या जगामध्ये देवाचे वचन तुमच्या मार्गावर प्रकाशासारखे होवो आणि मग तुम्ही तुमच्या जीवनात परिवर्तन व वाढ अनुभवाल.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तुझ्या वचनाच्या बक्षीसासाठी तुझे आभार, जे आमच्या जीवनात मार्गदर्शक प्रकाश म्हणून कार्य करते. केवळ त्यास वाचू नये परंतु त्यावर खरेच मनन करावे आणि त्याच्या शिकवणीस आमचे विचार, शब्द व कृतींवर लागू करावे म्हणून आम्हांला साहाय्य कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या वाणीवर विश्वास ठेवण्याचे सामर्थ्य● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 4
● चेतावणीकडे लक्ष दया
● त्वरित आज्ञापालनाचे सामर्थ्य
● मत्सराच्या आत्म्यावर प्रभुत्व मिळविणे
● काठी ज्यास अंकुर आले
● योग्य पाठपुरावा अनुसरण
टिप्पण्या