डेली मन्ना
14
10
83
परमेश्वराने आई ला विशेष असे बनविले आहे
Sunday, 11th of May 2025
Categories :
मातृ दिन
"परमेश्वर सर्वत्र राहू शकत नाही, म्हणून त्याने आई ला बनविले." जरी हे वाक्य ईश्वरविज्ञानदृष्टया अचूक असे असणार नाही, ही जुनी यहूदी म्हण, आई जी महत्वाची भूमिका आपल्या जीवनात पूर्ण करते त्याचे योग्यपणे वर्णन करते.
परमेश्वर जेव्हा त्याची प्रीति त्याचे लोक इस्राएल साठी वर्णन करतो, तेव्हा तो आई चे रूपक उपयोगात आणतो की त्याच्या प्रीतीचे वर्णन करावे. मला हे फारच अद्भुत असे वाटते.
जसे एखाद्याची आई त्याचे सांत्वन करिते तसे मी तुमचे सांत्वन करीन. (यशया ६६:१३)
जेव्हा पौलाला हे दाखवावयास पाहिजे होते की तो थेस्सलनी येथील मंडळीला किती प्रेम करतो, त्याने त्याच्या प्रीतीची तुलना आई च्या प्रीतीशी केली.
परंतु आम्ही जेव्हा तुमच्यामध्ये होतो तेव्हा सौम्यपणे वागलो, जसे एक समर्पित आई तिच्या लेकरांचे पोषण करते व त्यांच्यामध्ये आनंद करते. (१ थेस्सलनी २:७ ऐम्पलीफाईड भाषांतर)
एका भक्तिमान आई चा विश्वास एक वारसा निर्माण करू शकतो, जे येणाऱ्या अनेक पिढ्यांवर प्रभाव करते. परमेश्वर व त्याच्या वचनामध्ये ती विश्वास ठेविते आणि मग तीच मूल्य तिच्या लेकारांमध्ये बिंबवते. मला खातरी आहे की एका प्रार्थना करणाऱ्या आई मुळे आपण आज खंबीर असे उभे आहोत.
जर तुम्ही आई आहात आणि कदाचित असा विचार करीत असाल की तुमच्या प्रार्थनांचे तुमच्या लेकरांवर व कुटुंबावर जास्त काही प्रभाव पडला नसेल, तर मग मला तुम्हांला खातरी देऊ दया. चांगले कार्य चालू राहू दया. तुम्ही लवकरच सुगी पाहाल. आशा सोडू नका, लक्षात ठेवा, परमेश्वर विश्वसनीय आहे.
आणि चला आपण उदारमनाने काम करीत व चांगले ते करीत धैर्य सोडू नये, कंटाळा करू नये, व खचू नये, कारण योग्य वेळी, निश्चित अशा वेळी आपण लाभ प्राप्त करू. जर आपण कांटाळ केला नाही, व आपले धैर्य सोडले नाही व खचलो नाही. (गलती ६:९ ऐम्पलीफाईड भाषांतर)
वर्षाचा तो विशेष दिवस, मायवार हा आज, ११ मे ला आहे. अशा विचित्र महामारीच्या कठीण परिस्थितीत सुद्धा कृपा करून वेळ काढा व आपल्या आईचे आभार माना. कोणतीही आई परिपूर्ण नाही परंतु मग आई होणे सुद्धा तितकेच सोपे देखील नाही. अनेक आई प्रमाणे तिने सुद्धा अनेक गोष्टींचा त्याग केला असेन ज्याविषयी तुम्हाला जरा सुद्धा कल्पना नसेल. का नाही तिच्या साठी प्रार्थना व उपास करावा?
आणि येथे असणाऱ्या सर्व आईंना मी म्हणत आहे. तुम्ही देवा साठी व आमच्या साठी विशेष असे आहात. पिढ्यांमध्ये तुम्ही संबंध जोडणारे आहात. तुम्ही जे सर्व करता त्यासाठी तुमचे आभार. परमेश्वर तुमचा सन्मान करो व तुम्हाला मोबदला देवो. (रुथ २:१२)
येथे काहीतरी आहे जे मायवार शी संबंधित आहे. सर्व आईंना हा मायवार सुखाचा होवो.
"That kiss is how the mom and pup recognize each other" pic.twitter.com/Mmq8Pr01ME
— National Geographic (@NatGeo) May 4, 2021
Bible Reading: 2 Kings 19-20
प्रार्थना
पित्या, माझ्या आई च्या मौल्यवान दाना बद्दल मी तुला धन्यवाद देतो. कृपा करून तिला चांगले आरोग्य व शांति दे. मला साहाय्य की तीचा सन्मान करावा व तुझ्या नांवाचे गौरव करावे. येशूच्या नांवात.
Join our WhatsApp Channel

Most Read
● परिस्थितीच्या दयेखाली कधीही जाऊ नये● ख्रिस्ता द्वारे विजय मिळवणे
● दिवस ०१ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● वचनाची सात्विकता
● धैर्यवान राहा
● योग्य पाठपुरावा अनुसरण
● उत्कृष्टतेसाठी प्रयत्न कसा करावा
टिप्पण्या