डेली मन्ना
19
16
200
देवाचे वचन काय तुम्हाला अडखळवू शकते?
Saturday, 27th of September 2025
Categories :
अपमान
जेव्हा येशूने स्वयं हे जाणले की त्याच्या शिष्यांनी याविषयी तक्रार केली आहे, तो त्यास म्हणाला, "हे तुम्हाला अडखळवते काय? (योहान 6:61)
योहान 6 मध्ये, येशूने स्वतः बद्दल स्वर्गातील भाकर असे म्हटले आहे. तो हे सुद्धा बोलला की त्याचे मांस व रक्त हे व्यक्तीच्या सार्वकालिक जीवनासाठी भोजन असे आहे. जेव्हा परुशी आणि सदुकी लोकांनी हे ऐकले, ते हे समजू शकले नाही आणि त्यामुळे ते अडखळले. त्यांनी येशूला एक पाखंडी असे म्हटले ज्याने चुकीचे शिकविले आहे.
ह्याक्षणी, त्याचे अनेक शिष्य सुद्धा, जेव्हा त्यांनी हे ऐकले, ते म्हणाले, "हे वचन कठीण आहे, हे कोण ऐकून घेऊ शकतो? ह्यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाहीत. (योहान 6:60, 66)
त्याच्याघनिष्ठ संबंधातील शिष्य सुद्धा अडखळण्याच्या स्थितीत आले. ह्याच वेळी येशूने त्यांना विचारले, "ह्याने तुम्ही सुद्धा अडखळत आहा काय?"
सत्य हे आहे की येथे वचनात नेहमीच काहीतरी असेन जे तुम्हाला अडखळण असे होईल. मला आठवते मी एक वेळी क्षमे वर संदेश देत होतो आणि तेथे मंडळी मध्ये एक मनुष्य होता जो माझी चेष्टा करीत होता. तथापि, वचन जे मी त्यादिवशी प्रचार केला त्यावर त्याचा विश्वास बसला आणि त्याने त्याचे जीवन प्रभूला समर्पित केले. आज, हा मनुष्य आमच्या चर्च चा सभासद आहे.
जेव्हा कोणीतरी वचन प्रचार करतो जे आपल्या परंपरा किंवा भावना याबरोबर योग्यपणे समन्वय साधत नाही मग ते आपल्याला अडखळण असे होते आणि आपल्याला दुख:वते.
येशू हा शब्द देही झाला होता आणि ऐका त्याने काय म्हटले, "धन्य आहे ते जे माझ्यासंबंधाने अडखळत नाही" (मत्तय 11:6). जेव्हा तुम्ही वचनाने तुम्हाला अडखळवू देत नाही पण त्याऐवजी वचनास तुम्हाला वळण लावू देता, तेव्हा तुम्ही धन्य आहात.
Bible Reading: Hosea 11-14; Joel 1
अंगीकार
पित्या, येशूच्या नांवात, मी घोषणा करतो की माझ्या आयुष्याच्यासर्व दिवस मी स्वास्थ्यपूर्ण व सामर्थ्यात चालेन. देवाने जे माझ्यावर सोपविले आहे ते मी सन्मानाने व संपूर्ण क्षमतेत आनंदाने पूर्ण करेन. ह्याजिवंताच्या भूमीत मी देवाचा आशीर्वाद व चांगुलपणाचा आनंद घेईन. न अडखळता माझ्या आयुष्यभर मी प्रभूची सेवा करेन. (स्तोत्रसंहिता ११८:१७; ९१:१६)
Join our WhatsApp Channel

Most Read
● कोणाच्या वार्तेवर तुम्ही विश्वास ठेवाल● परिपूर्ण ब्रँड व्यवस्थापक
● रागाची समस्या
● देवासाठी आणि देवाबरोबर
● मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा
● महानतेचे बीज
● कृपेचे प्रगट होणे
टिप्पण्या