इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला तेव्हा त्याने त्यांच्यासाठी कालेबाचा धाकटा भाऊ कनाज याचा मुलगा अथनिएल ह्याला सोडविणारा म्हणून उभे केले आणि त्याने त्यांची सुटका केली. (शास्ते ३: ९)
तुम्ही कधी एक मनुष्य ज्याचे नाव अथनिएल याबद्दल ऐकले आहे काय?
शक्यतो नाही.
तो कालेबाचा भाचा होता. जेव्हा इस्राएल लोक आश्वासित प्रदेशांत गेले, ते यहोशवा आणि कालेब यांच्या धैर्यशाली प्रयत्नाने विजयी झाले होते. जसे ही पीढी वृद्ध होत गेली, एक नवीन पीढी निर्माण होऊ लागली. इस्राएल मूर्तींची पूजा करण्याद्वारे पुन्हा एकदा पापात पडले. परमेश्वराचा क्रोध इस्राएल विरोधात उफाळून आला, आणि त्याने त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या शत्रुंद्वारे गुलाम असे बनवू दिले. तथापि, लोक आक्रोश करू लागले आणि परमेश्वराने त्यांचे ओरडणे ऐकले.
जेव्हा देवाचे लोक परमेश्वराकडे आक्रोश करतात, जेव्हा ते खरेच पश्चातापी होतात तेव्हा तो त्यांचे ऐकतो. तो त्यांना उभे करण्याद्वारे प्रत्युत्तर देतो ज्यांना अशा वेळेकरिता त्यानेतयार केले आहे. प्रत्येक सैनिक त्यादिवसासाठी पाहत असतो की जे प्रशिक्षण त्याने घेतले आहे ते तो उपयोगात आणू शकतो.
परमेश्वर त्याच्या भाच्याला अशा प्रसंगासाठी तयार करीत होता. त्याच्याकडे तोच जोश होता, जसे त्याचा अंकल कालेब कडे होते.
त्याच्यावर परमेश्वराचा आत्मा उतरला व तो इस्राएलाचा शास्ता झाला; तो लढाईला निघाला तेव्हा परमेश्वराने अरामाचा राजा कुशन-रीशाथईम ह्याला त्याच्या हाती दिले व त्याच्यावर त्याचे वर्चस्व झाले. त्यानंतर चाळीस वर्षे देशाला स्वास्थ लाभले. मग कनाजाचा मुलगा अथनिएल मृत्यू पावला. (शास्ते ३: १०-११)
नाकारलेले, निराश आणि काहीही उपयोगाचे नाही असे स्वतःला समजू नको. ते असे असू शकते, की परमेश्वर तुम्हांला अशा वेळेकरितातयार करीत आहे जेव्हा तुम्ही देवाच्या लोकांना सोडविण्यासाठी किंवा त्यांना काही प्रकारे साहाय्य करण्यास बोलाविले जाल.
आजतुमचे"काही नाव नाही" परंतुजेव्हा देवाचा आत्मा तुमच्यावर उतरेल, तुम्ही मग पूर्णपणे एक वेगळे व्यक्ति व्हाल.
कळकळीने प्रार्थना करा की देवाचा आत्मा तुमच्यावर उतरावा.
परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दीनांस सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला; त्याने मला पाठविले आहे; तें अशांसाठी की, धरून नेलेल्यांची सुटका व अंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ ह्यांची घोषणा करावी, ठेचले जात आहे त्यांस सोडवून पाठवावे; परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी.
प्रार्थना
मला बोलाविण्यात आले आहेकी महान कार्ये करावी कारण परमेश्वराचा आत्मा माझ्यावर उतरला आहे, येशूच्या नावांत. आमेन.
Join our WhatsApp Channel

Most Read
● दिवस २४:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना● दिवस २९:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● काठी ज्यास अंकुर आले
● तुमचा कमकुवतपणा परमेश्वराला दया
● देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
● भावनात्मकदृष्टया वाहवत जाऊन बळी पडणे
● २१ दिवस उपवासः दिवस १५
टिप्पण्या