english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. महानतेचे बीज
डेली मन्ना

महानतेचे बीज

Tuesday, 22nd of August 2023
18 12 927
Categories : शिष्यत्व सेवा करणे
तेव्हा परमेश्वर मोशेला म्हणाला, नूनाचामुलगा यहोशवा ह्याला घेऊन त्याच्यावर आपला हात ठेव; त्याच्या ठायी माझा आत्मा वसत आहे. एलाजार याजक व सर्व मंडळी ह्यांच्यासमोर त्याला उभे करून त्यांच्यादेखत त्याला अधिकारारूढ कर. (गणना २७: १८-१९)

मोशे त्याच्या पुढारीपणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आला होता. इस्राएली लोक आश्वासित भूमीच्या किनाऱ्यावर पोहचले होते आणि मोशे च्या आज्ञा न पाळण्या मुळे परमेश्वराने त्यास त्यात प्रवेश करू दिला नाही.

मोशेला देवाने आज्ञा दिली की सर्व लोकांसमक्ष यहोशवा वरआपले हात ठेव हे दाखविण्यासाठी की आता यहोशवा पुढारी झाला आहे.

तसेच, नवीन करारामध्ये जेव्हा डिकन हे निवडले गेले (प्रेषित ६:६), त्यांना प्रेषितांपुढे आणण्यात आले, ज्यांनी प्रार्थना केली आणि त्यांच्यावर हात ठेवले. जुना करार आणि नवीन करार या दोन्हीमध्ये हा प्रकार सारखाच आहे. पवित्र आत्मा हा ह्या लोकांत कार्य करीत होता आणि हात ठेवणे ह्याने केवळ ह्या वास्तविकतेला शिक्कामोर्तब केलेकी देवाचा हात सरळपणे त्यांच्यावर होता.

प्रेषित पेत्र आपल्याला हे म्हणत प्रेरणा देतो, "म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा, ह्यासाठीकी, त्याने योग्य वेळी तुम्हांस उंच करावे. (१ पेत्र ५:६) येथे लीन ह्या शब्दाला ग्रीक शब्द जो आहे त्याचा अर्थ हा, की एका दिन सेवका सारखे आचरण असावे.

यहोशवाने मोशे ची सेवा केली जे काही थोडे वर्ष त्यास त्याचा सहवास मिळाला होता आणिमग योग्यवेळी, तो परमेश्वराची मोठया गोष्टींमध्ये सेवा करण्यास तयार होता.

तीच गोष्ट अलीशा ची होती ज्याने महान संदेष्टा एलीयाची सेवा केली होती. अलीशा ला नेहमी असे ओळखले जाते की ज्याने, "एलीयाच्या हातावर पाणी ओतले होते" (२ राजे ३:११). ही त्याची केवळ ओळखपत्रे होती. त्याने कशाचाही अपेक्षा न करता सेवा केली होती. आज, काही लोकांना त्रास होतो, जेव्हा त्यांचा आदर केला जात नाही किंवा स्टेज वर त्यांचा उल्लेख केला जात नाही. ते चर्च किंवा उपासनेला सुद्धा येण्याचे सोडतात जर त्यांना सार्वजनिकपणे स्वीकारले गेले नाही.

अलीशा अवश्य देवाचा एकमहान सेवक झाला, परंतु त्याने त्याचे प्रशिक्षण एक सेवक म्हणून प्राप्त केले होते!  असे केवळ खरे आध्यात्मिक पुढारी हे बनविले जातात. दुसऱ्यांची सेवा करण्याद्वारे स्वतःला नम्र करणे आणि त्याकडून शिकणे ज्यांची आपण सेवा करतो हे त्यात समाविष्ट आहे. कोणीतरी म्हटले आहे, "आपणतसे करण्याद्वारे पुढारीपण देण्यास तयारी करू शकतो." हे महत्वाचे नाही की आपले कार्य हे किती लहान किंवा किती मोठे आहे परंतु आपल्या हृदयाच्या समर्पणाचे आचरण.

तुम्हाला पुढच्या स्तरावर जायचे आहे काय? तर मग तुमची पाण्याची घागरी घेऊन तयार राहा आणि रांगेत व्हा, तुम्हीपुढीलअलीशा, पुढील यहोशवा होऊ शकता?
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.

व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
मी स्वतःला देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन करेन म्हणजे तो मला योग्यवेळी उंच करेन. येशूच्या नांवात. आमेन.

कौटुंबिक तारण
धन्यवादीत पवित्र आत्म्या, माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांना सुवार्ता कशी सांगावी हे मला विशेषकरून दाखव. मला समर्थ कर, हे परमेश्वरा. योग्य क्षणी, तुझ्याबद्दल सांगण्यासाठी संधी प्रगट कर. येशूच्या नांवात. आमेन.

आर्थिकतेचा नवीन मार्ग
प्रत्येक बी जे मी पेरले आहे ते परमेश्वराच्या सिंहासनासमोर बोलेल. परमेश्वरा, माझ्या वतीने तुझे देवदूत मोकळे कर कि मोठया आर्थिक वर्षावास चीथवावे. येशूच्या नावात.

केएसएम चर्च वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मी प्रार्थना करतो कीहजारो लोक प्रत्येक मंगळवार/गुरुवार/शनिवारी केएसएम चे प्रत्यक्ष प्रसारण पाहण्यास जुडतील.त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना तुझ्याकडे वळीव परमेश्वरा. त्यांना तुझे चमत्कार अनुभवू दे. त्यांना साक्ष देण्यास प्रवृत्त कर म्हणजे तुझे नांव हे उंचाविले व गौरविले जाईल.

देश
पित्या,येशूच्या नांवात मी प्रार्थना करतो की भारत देशाच्या कानाकोपऱ्यात तुझा आत्मा सामर्थ्याने प्रवाहित कर, ज्याचा परिणाम चर्च ची सातत्याने वाढ व प्रगती होत राहो.

Join our WhatsApp Channel


Most Read
● परमेश्वराकडून सल्ल्याची गरज
● धोक्याची सुचना
● वनातील मानसिकतेवर प्रभुत्व करणे
● कालच्यास सोडून द्यावे
● स्वैराचाराच्यासामर्थ्यास मोडून काढणे-१
● धार्मिक सवयी
● दिवस ०९ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन