डेली मन्ना
दिवस १० : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
Sunday, 1st of December 2024
30
27
313
Categories :
उपास व प्रार्थना
दैवी मार्गदर्शनाचा आनंद घेणे
"मी तुला बोध करीन; ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन; मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद सांगेन." (स्तोत्रसंहिता ३२:८)
देवाने आपल्याला अंधारात सोडले नाही. आपल्याला योग्य मार्गावर नेण्यासाठी तो पूर्णपणे समर्पित आहे. जर आपली इच्छा असेल की, त्याने आपल्याला मार्गदर्शन करावे, तर आपण "इच्छूक आणि आज्ञाधारक" राहिले पाहिजे (यशया १:१९). तो आपल्यावर दबाव आणणार नाही की त्याच्या मार्गाचे अनुसरण करावे कारण त्याने आपल्याला स्वतंत्र नैतिक एजंट म्हणून निर्माण केलेले आहे. आपल्याकडे पर्याय आहेत आणि प्रत्येक निवडीचे परिणाम किंवा आशीर्वाद आहेत.
पर्याय निवडण्यासाठी आपल्या सर्वांना दैवी दिशा मिळण्याची गरज आहे; दैवी निर्देशशिवाय आपण उत्तम मार्गाची निवड करू शकत नाही. आपल्याला योग्य जीवनसाथी निवडण्यासाठी, व्यवसाय निवेश करण्यासाठी, आणि आपले दैनंदिन जीवन जगण्यासाठी दैवी मार्गदर्शनाची गरज आहे. दैवी मार्गदर्शन नसल्यामुळे अनेक जण मृत्युच्या सापळ्यात अडकले आहेत. विमान अपघातातून बचावलेल्या लोकांबद्दल मी अनेक कथा ऐकलेल्या आहेत कारण त्यांना विमान सोडायला लावले होते.
दैवी निर्देश तुम्हाला हे होण्यास कारणीभूत होईल
- योग्य ठिकाणी असावे
- योग्य वेळी
- योग्य गोष्टी करणे
- योग्य व्यक्तींना भेटणे
दैवी दिशेचे कोणते लाभ आहेत?
१. तुम्ही मृत्यू व वाईट गोष्टींपासून वाचाल
"मृत्यूच्छायेच्या दरींतूनही मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला भिणार नाही, कारण तू माझ्याबरोबर आहेस; तुझी आंकडी व तुझी काठी मला धीर देतात." (स्तोत्रसंहिता २३:४)
२. तुम्हाला गुप्त धनाकडे नेण्यात येईल.
"तुला अंधारातील निधि व गुप्त स्थळी लपविलेले धन देईन, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्राएलाचा देव आहे." (यशया ४५:३)
३. तुम्ही मोठया अधिकारात कार्य कराल.
दैवी अग्रगण्य स्थानांबद्दलचे आपले आज्ञापालन आपल्याला अधिकारी व्यक्ति म्हणून स्थान देते. तुम्ही अधिकाराखाली नसल्यास, तुम्ही अधिकाराचा वापर करू शकत नाही. जेव्हा आपण देवाच्या अधीन असतो तेव्हा सैतान आपला अधिकार ओळखतो. याकोब ४:७; मत्तय ८:९-११
दैवी मार्गदर्शनाचा आनंद आपण कसा घेऊ शकतो?
१. तुम्हांला देवाच्या अधीन असले पाहिजे.
"जर कोणी माझ्यामागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे." (लूक ९:२३)
"मला स्वतः होऊन काहीं करिता येत नाही; जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करितो; आणि माझा निवाडा यथार्थ आहे; कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो." (योहान ५:३०)
"तर मी आपले शरीर कुदलतो व त्याला दास करून ठेवतो; असे न केल्यास मी दुसऱ्यांस घोषणा केल्यावर कदाचित मी स्वतः पसंतीस न उतरलेला असा ठरेन." (१ करिंथ. ९:२७)
२. आपल्या योजना देवाला सोपवा आणि त्याची वाट पाहा
तुम्हाला ऐकायचे असेल तर तुम्ही वाट पाहण्यास शिकले पाहिजे. तुम्ही देवाला बोलण्यासाठी घाई करू शकत नाही. जेव्हा जेव्हा देव त्याच्या उत्तरास उशीर करतो, तेव्हा तुमच्या संयमाची परीक्षा असते. शौलाने घाईने कार्य केले कारण त्यास वाटले की देव त्याचे उत्तर देण्यात अत्यंत मंद आहे, ज्याने त्याचा नकार करण्यात देखील भर घातली. (१ शमुवेल १३:१०-१४)
"मनुष्याचे मन मार्ग योजीते, पण परमेश्वर त्याच्या पावलांस मार्ग दाखवितो." (नीतिसूत्रे १६:९)
३. आत्म्याने प्रार्थना करा
आपल्यातील एक कमकुवतपणा म्हणजे आपल्याला पाहिजे तसे कळत नाही. जेव्हा जेव्हा आपण अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो, तेव्हा आपण त्या गोष्टींसाठी पवित्र आत्म्याच्या साहाय्यावर अवलंबून असतो, ज्या आपले ज्ञान व समजेपलीकडे आहेत. जेव्हा जेव्हा तुम्हांला दैवी मार्गदर्शनाची गरज लागते, तेव्हा आत्म्यामध्ये प्रार्थना करण्यात वेळ घालवा, तुमच्या आध्यात्मिक मनुष्यास स्पष्टता दिली जाईल.
"२६ तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो; कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही; पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कण्हण्याने मध्यस्थी करितो; २७ पण अंतर्यामे पारखणाऱ्याला त्या आत्म्याचा मनोभाव काय हे ठाऊक आहे, कारण हा आत्मा पवित्रजनांसाठी देवाच्या मर्जीप्रमाणे मध्यस्थी करितो." (रोम. ८:२६-२७)
देव आपल्याला विविध मार्गांनी मार्गदर्शन करू शकतो
- वचन
देवाचे वचन हे त्याच्या मार्गदर्शनाचे प्राथमिक स्त्रोत आहे. लिखित वचन हे प्रथम बोलले गेलेले वचन होते. देवाने ते लेखकाच्या हृदयात सांगितले. लिखित वचन हे बोलले गेलेल्या वचनाइतकेच शक्तिशाली आहे. लिखित वचनाचा अभ्यास करा आणि तुमचा आत्मा प्रकट गेलेल्या वचनास प्राप्त करील (रीमा). (योहान १:१)
- आंतरिक साक्ष आणि पवित्र आत्म्याची वाणी
निर्णय जो तुम्ही आता घेणार आहात त्यासंबंधात आंतरिक साक्ष ही तुमच्या आत्म्यामध्ये आश्वासन आहे. आंतरिक साक्ष ही तुमच्या आत्म्यामध्ये हिरवा प्रकाश, पिवळा प्रकाश आणि लाल प्रकाशासारखे आहे. काहीवेळा, तुम्हांला निर्णयासंबंधी शांत वाटेल; इतर वेळी तुम्हांला भीति वाटेल किंवा निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला त्यासाठी वेळ घ्यावा असे वाटेल. यापैंकी बऱ्याच गोष्टींना "आंतरिक साक्ष" असे म्हणतात. आंतरिक साक्षीला जाणणे व त्यानुसार चालण्यासाठी तुमच्या स्वतःला शिकण्याची प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
'आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची मुले आहो." (रोम. ८:१६)
"कारण जितक्यांना देवाचा आत्मा चालवीत आहे तितके देवाचे पुत्र आहेत." (रोम. ८:१४)
- सुज्ञ सल्ला
इथ्रो ने मोशेला सुज्ञ सल्ला दिला, आणि लोकांची व्यवस्था करण्याच्या दैनंदिन तणावावर विजय मिळविण्यात त्याने साहाय्य केले.
"तर आता माझे ऐक, मी तुला सल्ला देतो, आणि देव तुझ्याबरोबर असो; ह्या लोकांचा देवापाशी तूं मध्यस्थ हो आणि ह्यांची प्रकरणे
देवापाशी ने." (निर्गम १८:१९)
- देवदूताचे प्रकट होणे
देवदूत हे प्रसंगानुसार प्रकट होतात की दिशा दाखवावी, परंतु देवदूतांच्या प्रकट होण्याचा धावा करण्याबाबत आपण काळजी घेतली पाहिजे.
प्रमुख मार्ग ज्याद्वारे देवाला आपल्याला मार्गदर्शन करण्याची इच्छा आहे ते त्याचे वचन व त्याच्या आत्म्याद्वारे आहे. देवदूतांचे कोणत्याही प्रकारे प्रकट होणे हे देवाच्या वचनाच्या अधिकाराच्या अधीन असे केले पाहिजे. देवदूताने जे म्हटले आहे ते जर देवाच्या वचनानुसार नसेल, तर आपण अलौकिक प्रकटीकरणाचा त्याग करावा आणि वचनाशी बांधील राहावे. देवदूत आपल्याला दिसतील की नाही हे ठरविणारा परमेश्वर आहे, आपण देवदूतांच्या प्रकटीकरणासाठी किंवा मार्गदर्शनासाठी प्रार्थना करीत नाही.
" ३ त्याने दिवसाच्या सुमारे तिसर्या प्रहरी दृष्टान्तात असे स्पष्टपणे पाहिले की, आपणाकडे देवाचा दूत येत असून “कर्नेल्या,” अशी आपणास हाक मारत आहे. ४ तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, “काय महाराज?” त्याने त्याला म्हटले, “तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत. ५ तर आता यापोस माणसे पाठव आणि शिमोन नावाच्या माणसाला बोलावून आण; त्याला पेत्रही म्हणतात. ६ तो शिमोन नावाच्या कोणाएका कातडे कमावणार्या चांभाराच्या येथे उतरला आहे; त्याचे घर समुद्राच्या किनार्यास आहे. [तुला काय करावे लागेल हे तो तुला सांगेल.]” ७ जो देवदूत त्याच्याबरोबर बोलत होता तो निघून गेल्यानंतर त्याने आपल्या घरच्या दोघा चाकरांना व आपल्या हुजरातीतल्या एका भक्तिमान शिपायाला बोलावले. (प्रेषित १०:३-७)
- स्वप्ने व दृष्टांत
जेव्हा आपला आत्मा त्याच्याशी सुसंगत असतो तेव्हा आपण देवाकडून दैवी मार्गदर्शन प्राप्त करू शकतो.
"यानंतर असे होईल की मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या वृद्धांस स्वप्ने पडतील, तुमच्या तरुणांस दृष्टांत होतील." (योएल २:२८)
आजपासून, तुम्ही येशूच्या दैवी मार्गदर्शनाचा अनुभव घेऊ शकता.
पुढील अभ्यासासाठी: अनुवाद ३२:१२-१४; नीतिसूत्रे १६:२५
Bible Reading Plan: Luke 5 - 9
प्रार्थना
१. हे परमेश्वरा, तुझा आत्मा येशूच्या नावाने मला काय म्हणत आहे हे ऐकण्यासाठी माझे कान उघड.
२. पित्या, मला तुझा शहाणपणा आणि प्रकटीकरणाचा आत्मा दे, जेणेकरून मी तुला येशूच्या नावाने अधिक ओळखू शकेन.
३. परमेश्वरा, येशूच्या नावाने माझ्या जीवनात तुझी इच्छा पूर्ण होऊ दे.
४. परमेश्वरा, मला अनुसरण करण्याचा योग्य मार्ग दाखव. (दोन पर्यायांबद्दल चौकशी करा आणि तुम्हीं जे पाहता किंवा ऐकता ते लिहा.)
५. परमेश्वरा, तुझ्या इच्छेच्या बाहेर असलेले कोणतेही चुकीचे निर्णय किंवा दिशानिर्देशापासून वळण्यास मला येशूच्या नावात साहाय्य कर.
६. परमेश्वरा, माझे आध्यात्मिक डोळे व कान उघड जेणेकरून माझ्या जीवनातील चांगले आणि वाईट पर्यायांची पारख करू शकावे.
७. माझी दिशाभूल करू इच्छिणाऱ्या आणि मला देवापासून दूर वळविणाऱ्या चुकीच्या आत्म्याच्या कार्यांना मी पंगु करितो.
८. पित्या, ज्या कोणत्याही क्षेत्रात मी तुझ्या वाणीची अवज्ञा केली असेन त्यासाठी मला कृपा करून क्षमा कर.
९. माझ्या स्वप्नाचे जीवन, येशूच्या नावात वास्तविक होवो.
१०. माझ्या स्वप्नाच्या जीवनाच्या सैतानी हेराफेरीस मी येशूच्या नावाने थांबवतो.
११. पित्या, कृपाकरून, मला दैनंदिन ख्रिस्ती जीवनासाठी शहाणपण व विवेकबुद्धीचा आत्मा दे.
१२. जे काही माझ्या ऐकण्यासाठी अडथळा होत आहे त्यास येशूच्या नावाने काढून टाक.
१३. दैवी मार्गदर्शन करण्यासाठी गोंधळ व हट्टीपणाच्या भावनेचा येशूच्या नावात मी प्रतिकार करतो.
१४. परमेश्वरा, तुझ्या प्रकाशाने, येशूच्या नावात माझ्या पावलांना माझ्या आशीर्वादाच्या ठिकाणी जाण्यास आदेश दे.
१५. हे परमेश्वरा, सैतानाने ज्या कोणास माझ्या आयुष्याभोवती योजिले आहे जे माझी दिशाभूल करतील त्यांस येशूच्या नावाने उपटून टाक.
२. पित्या, मला तुझा शहाणपणा आणि प्रकटीकरणाचा आत्मा दे, जेणेकरून मी तुला येशूच्या नावाने अधिक ओळखू शकेन.
३. परमेश्वरा, येशूच्या नावाने माझ्या जीवनात तुझी इच्छा पूर्ण होऊ दे.
४. परमेश्वरा, मला अनुसरण करण्याचा योग्य मार्ग दाखव. (दोन पर्यायांबद्दल चौकशी करा आणि तुम्हीं जे पाहता किंवा ऐकता ते लिहा.)
५. परमेश्वरा, तुझ्या इच्छेच्या बाहेर असलेले कोणतेही चुकीचे निर्णय किंवा दिशानिर्देशापासून वळण्यास मला येशूच्या नावात साहाय्य कर.
६. परमेश्वरा, माझे आध्यात्मिक डोळे व कान उघड जेणेकरून माझ्या जीवनातील चांगले आणि वाईट पर्यायांची पारख करू शकावे.
७. माझी दिशाभूल करू इच्छिणाऱ्या आणि मला देवापासून दूर वळविणाऱ्या चुकीच्या आत्म्याच्या कार्यांना मी पंगु करितो.
८. पित्या, ज्या कोणत्याही क्षेत्रात मी तुझ्या वाणीची अवज्ञा केली असेन त्यासाठी मला कृपा करून क्षमा कर.
९. माझ्या स्वप्नाचे जीवन, येशूच्या नावात वास्तविक होवो.
१०. माझ्या स्वप्नाच्या जीवनाच्या सैतानी हेराफेरीस मी येशूच्या नावाने थांबवतो.
११. पित्या, कृपाकरून, मला दैनंदिन ख्रिस्ती जीवनासाठी शहाणपण व विवेकबुद्धीचा आत्मा दे.
१२. जे काही माझ्या ऐकण्यासाठी अडथळा होत आहे त्यास येशूच्या नावाने काढून टाक.
१३. दैवी मार्गदर्शन करण्यासाठी गोंधळ व हट्टीपणाच्या भावनेचा येशूच्या नावात मी प्रतिकार करतो.
१४. परमेश्वरा, तुझ्या प्रकाशाने, येशूच्या नावात माझ्या पावलांना माझ्या आशीर्वादाच्या ठिकाणी जाण्यास आदेश दे.
१५. हे परमेश्वरा, सैतानाने ज्या कोणास माझ्या आयुष्याभोवती योजिले आहे जे माझी दिशाभूल करतील त्यांस येशूच्या नावाने उपटून टाक.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दिवस २६:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना● देवाला प्रथम स्थान देणे # 1
● क्षमाहीनता
● तुम्ही कशा साठी वाट पाहत आहात?
● दिवस ०५: ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● मध्यस्थी वर एक भविष्यात्मक शिकवण १
● भावनात्मकदृष्टया वाहवत जाऊन बळी पडणे
टिप्पण्या