कारण आम्ही विश्वासाने (विश्वास ठेऊन)चालतो, डोळ्यांनी(पाहण्याने)दिसते त्याप्रमाणे चालत नाही. (२ करिंथ ५:७)
तुमच्या हृदयाच्या नेत्रांनी जे तुम्ही पाहता त्यामध्ये मोठे सामर्थ्य आहे. हेएक कारण होते जेव्हा प्रेषित पौलाने इफिस येथील मंडळी साठी प्रार्थना केली: "त्यामुळे तुमचे अंत:चक्षु प्रकाशित होईल" (इफिस १:१८).
काही वर्षांपूर्वी मी एका मनुष्यासाठी प्रार्थना केली होती ज्याने मला म्हटले होते की तो कसा त्याच्या परदेशाच्या नोकरीतून ही योजना करून परत आला आहे की त्याच्या बायकोला आश्चर्यचकित करावे. जेव्हा त्याने दरवाजा उघडला, त्याने तिला दुसऱ्या पुरुषाबरोबर पाहिले. तो पूर्णपणे दु:खी झाला परंतु तरीही त्याच्या लेकारांमुळे विवाह बंधनात राहिला. तो नेहमी मला लिहित असे, हे बोलत, "तो कसे आत्महत्त्या करू पाहत होता परंतु केवळ येशू मधील त्याच्या विश्वासामुळे, त्याने तसे केले नाही."
अनेक वेळेला, माझ्याकडे शब्द नव्हते की त्याचे सांत्वन करावे. तथापि, पवित्र आत्म्याने एके दिवशी मला काहीतरी सामर्थ्यशाली सांगितले. "त्या मनुष्याला सांग की त्याच्या नैसर्गिक नेत्रांनी ते पाहू नको परंतु त्याच्या आध्यात्मिक नेत्रांनी.
त्यास हे सांग की त्याची पत्नी आणि लेकरे चर्च मध्ये प्रार्थना करीत आणि देवाचा धावा करीत आहे हे पाहा." आता हे खरेच होते कीह्या स्त्री ने कधीही प्रार्थना केली नसती आणि लेकरांना सुद्धा कधी चर्च ला जाऊ दिले नसते.
जेव्हा मी त्यास हे वचन देवाकडून सांगितले, तो कळवळून रडला परंतु वचनाने काय सांगितले होते ते करण्याचे आश्वासन दिले. तोहे(दृष्टांत) पाहत होता की त्याची पत्नी आणि लेकरे त्याच्यासोबत चर्च मध्ये प्रार्थना करीत आहेत. तो ते सुद्धा बोलत असेजे तो पाहत होता. असे त्याने 4 महिने केले.
एके दिवशी, असामान्य असे घडले. कारण तो चर्च मध्ये सेवा करीत होता, तो सामान्यपणे लवकर आला. काही वेळा नंतर, त्याची पत्नी लेकरांसोबत तेथे आली, त्याच्या बाजूला बसली आणि तिच्या चेहऱ्यावरून अश्रूओघळतअसताना उपासना करीत होती. त्या दिवशी, जसे मी लोकांना सुटकेसाठी पुढे बोलाविले, तीपुढे आली आणि परमेश्वरा द्वारे गौरवाने तारण पावली.
जे काही तिच्यामध्ये त्यादिवशी सुरु झाले होते ते विश्वासाकडून विश्वासाकडे आणि गौरवाकडून गौरवाकडे सतत वाढत गेले (२ करिंथ ३: १८). मी केवळ कल्पना करीत होतो, तर काय झाले असते जर ह्या व्यक्तीने तिच्या पत्नी विषयी आशा सोडून दिली असती? हे आपल्यापैकी अनेकांना इशारा आहे.
प्रथम, त्यालोकांवरून आशा सोडून देऊ नका ज्यांना तुम्ही इतके सहजपणे प्रेम करता.
दुसरे, आध्यात्मिक नेत्रांनी पाहण्या द्वारे तुमच्या विश्वासाला मोकळे करा.
तुमच्या जीवनात देवाने काय करावे म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवीत आहात? विश्वासाच्या नेत्रांनी पाहण्यास सुरुवात करा की तुमच्या प्रार्थना ह्या उत्तरीत केल्या आहेत (इब्री ११:१) आणि मग तीच गोष्ट उघडपणे बोलून दाखवा. देवाच्या गौरवाकरिता ते होईल.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पित्या, येशूच्या नांवात, मला साहाय्य कर की तुझ्या वचनावर मनन करावे जोपर्यंत ते माझा हिस्सा होत नाही. माझे नेत्र उघड की आध्यात्मिक क्षेत्रात माझ्या प्रार्थना ह्या उत्तरीत केल्या जात आहे ते पाहावे. आमेन.
कौटुंबिक तारण
येशूच्या नांवात, मी आदेश देतो की मी, माझ्याकुटुंबाचे सदस्य, व माझे चर्च हे सिद्धांतांचे प्रत्येक वारे व मनुष्याच्या कपट योजनासह गडबडणार नाही किंवा त्याने भारावून जाणार नाही.
येशूच्या नांवात, मी आदेश देतो की मी, माझ्याकुटुंबाचे सदस्य, व माझे चर्च हे फसवणुकीच्या कपटयुक्त योजनांच्या धूर्त लबाडीच्या विरोधात संरक्षित केले जावो आणि आम्ही स्पष्टपणे लपलेले असत्य पाहावे व त्यास पूर्णपणे अस्वीकार करावे.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
ख्रिस्त येशू द्वारे माझा पिता गौरवाच्या द्वारे माझी व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांची सर्व गरज पुरवेल.
केएसएम चर्च वाढ
पित्या, पास्टर मायकल व त्याच्या संघाच्या सदस्यांना तुझ्या आत्म्याद्वारे नवीन अभिषेक कर ज्याचा परिणाम तुझ्या लोकांमध्ये चिन्हे व चमत्कार व सामर्थ्याची कार्ये होवो. ह्याद्वारे लोकांना तुझ्या राज्यात आण. येशूच्या नांवात.
देश
पित्या, येशूच्या नांवात मी प्रार्थना करतो की भारत देशाच्या प्रत्येक शहर व राज्यातील लोकांची अंत:करणे तुझ्याकडे वळो. त्यांनी त्यांच्या पापाचा पश्चाताप करावा व तुला प्रभु व तारणारा म्हणून स्वीकारावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आदर आणि मूल्य● तुमच्या सुटकेला कसे राखून ठेवावे
● दिवस १५ :४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● देवाचे ७ आत्मे: पराक्रमाचा आत्मा
● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला
● वेदी व देवडी
● त्याच्या सिद्ध प्रितीमध्ये स्वतंत्रता प्राप्त करणे
टिप्पण्या