योहान १० मध्ये, येशू स्वतःला एक चांगला मेंढपाळ असे वर्णन करतो. याचा अर्थ काय आहे?
चांगला मेंढपाळ, येशू हा मेंढरांप्रती समर्पित आहे.
समर्पित असणे म्हणजे जबाबदार असणे. पूर्वीच्या दिवसात, मेंढपाळ असणे हे सोपे काम नव्हते. त्यास नेहमी मेंढरांना हिरव्या कुरणाजवळ घेऊन जायचे असते,म्हणजे त्यांचे पोट भरावे आणि ते उपाशी राहू नये. याचा अर्थ लांबचा प्रवास करावयाचा असतो (उत्पत्ति ३७: १७). त्यांस जंगली जनावरे, जसे, लांडगा, अस्वल, सिंह इत्यादी पासून त्यांचे संरक्षण करावयाचे असते. (१ शमुवेल १७: ३७)
जर एवढे पुरेसे नाही, तर त्यास हरवलेल्या मेंढरांना शोधावयाचे असते जे भटकले गेले आहेत (यशया ५३: ६). मेंढपाळाला अक्षरशः मेंढरांबरोबर राहावयाचे असते. ते एक कठीण कार्यअसे. आणि ज्यासाठी धन्यवाद सुद्धा मिळत नसे.
आजच्या आधुनिक जगात राहून आपण हे समजू शकणार नाही की एक मेंढपाळ असणे म्हणजे काय परंतु येशू ला हे पूर्णपणे ठाऊक होते की तो काय बोलत आहे जेव्हा त्याने स्वतःला आपला मेंढपाळअसे घोषित केले.
चांगला मेंढपाळ, येशू ची मेंढरे स्वतःची आहेत
त्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडतो; मेंढरे त्याची वाणी ऐकतात आणि तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नांवाने हाक मारितो व त्यांना बाहेर नेतो. जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे, ज्याचीस्वतःची मेंढरे नाहीत तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून त्यांची दाणादाण करितो. (योहान १०: ३, १२)
'नावाने त्याच्या स्वतःच्या मेंढरांना बोलावितो' हे घनिष्ठ संबंधा विषयी बोलते. 'त्यांना बाहेर घेऊन जातो' हे दिशा आणि मार्गदर्शन विषयी बोलते. तुम्ही आज, ज्या कशाचा सामना करीत आहात, हे जाणा की तुम्ही त्याचे आहात आणि तो तुमची काळजी घेईल.
अंगीकार
प्रभु येशू ख्रिस्त हा माझा मेंढपाळ आहे आणि म्हणून मला काहीही पुरवठा किंवाआपूर्ती कमी पडणार नाही. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● व्यसनांना संपवून टाकणे● देवाच्या प्रकारची प्रीति
● योग्य पाठपुरावा अनुसरण
● दिवस २०: ४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● आत्म्याची नांवे आणि शीर्षक: पवित्र आत्मा
● बीभत्सपणा
● देवाचे वचन काय तुम्हाला अडखळवू शकते?
टिप्पण्या