english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. स्वतःवर लागू केलेल्या शापापासून सुटका
डेली मन्ना

स्वतःवर लागू केलेल्या शापापासून सुटका

Saturday, 10th of December 2022
44 15 1862
नीतिसूत्रे १८: २१ मध्ये त्याने लिहिले, "जिव्हेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहेत; तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात."
येथे जीभे मध्ये सामर्थ्य आहे जे मृत्यू आणि जीवन आणते.

रिबका, याकोबाची आई हिने एक सव्विस्तर योजना आखली की इसहाक ला याकोबाला आशीर्वाद देण्यास फसवावे. याकोब, घाबरला होता, जर ते कळले, तर इसहाक त्यास शाप देईल.

परंतु आई रिबका ने त्यास म्हटले, "माझ्या बाळा, तुला शाप मिळाल्यास तो मला लागो; माझे एवढे म्हणणे ऐक व करडे घेऊन ये." (उत्पत्ति २७: १३)

रिबका ने स्वतःवर शाप लावून घेतला-स्वतःवर लादलेला शाप. ह्या शापाचा परिणाम आपणतिच्या जीवनावर पाहतो.

तेव्हा रिबका इसहाकास म्हणाली, या हेथीच्या मुलींमुळे माझा जीव मला नकोसा झाला आहे; यांच्यासारखी, हेथीच्या मुलींतली, ह्या देशाच्या मुलींतली एखादी याकोबाने वरिली तर मला जगून काय लाभ? (उत्पत्ति २७: ४६)

रिबका ला तीचा जीव नकोसा झाला होता, आणि त्याचा परिणाम म्हणून, स्वतःवर ओढवून घेतलेल्या शापामुळे ती लवकरच मरण पावली.

स्वतःवर ओढवून घेतलेला शाप किंवा स्वतःवर लागू केलेल्या शापाचे आणखी एक उदाहरण
जेव्हा पिलाताने पाहिले की तो त्यामध्ये तग धरू शकत नाही परंतु त्याऐवजी तेथे कोलाहल हा वाढतच चालला होता, त्याने पाणी घेतले, आणि सर्व जमावासमोर आपले हात धुतले, हे म्हणत, "ह्या न्यायी व्यक्तीच्या रक्ता विषयी मी निर्दोष आहे. तुमचे तुम्ही पाहून घ्या."

आणि सर्व लोकांनी उत्तर दिले आणि म्हटले, "त्याचे रक्त हे आमच्यावर आणि आमच्या लेकरांवर येवो." (मत्तय २७: २४-२५)

इस्राएली लोकांनी भावनात्मक उन्माद च्या क्षणी त्यांनी केवळ त्यांच्यावरच शाप घोषित केला नाही परंतु त्याच्या लेकरांवर आणि लेकरांच्या लेकरांवर.

फ्लेवियस जोसेफ, एक प्रसिद्ध इतिहासकाराने लिहिले: "इसवीसन ७० दरम्यान, रोमन लोकांना यरुशलेम ची बाह्य भिंत फोडली, मंदिर नष्ट केले आणि नगराला आग लावून दिली.

विजयात, रोमी लोकांनी हजारो लोकांची कत्तल केली. जे मृत्युपासून वाचले: हजारो आणखी लोकांची कत्तल केली गेली आणि त्यांना गुलाम बनविले आणि त्यांना मिसरच्या खाणी मध्ये कठीण परिश्रम करण्यास पाठविले, संपूर्ण साम्राज्यभर इतरांना जवळच्या भागात विखरले आणि लोकांच्या मनोरंजनाकरिता त्यांची कत्तल केली. मंदिराची पवित्र पात्रे ही रोम नगराला नेण्यात आली जेथे विजयाच्या उत्सवात त्याचे प्रदर्शन करण्यात आले."

दुसऱ्याजागतिकमहायुद्धाच्या(२रे जागतिक महायुद्ध) शेवटी नाझी अत्याचाराची छावणी जी सापडली, त्याने हिटलरची यहूदी लोकांना नामशेष करण्याची जी भयावह दुष्ट योजना प्रकट केली. यहूदी लोकांची फार पद्धतीशीर कत्तल करण्याच्या माध्यमाच्या बातम्या अजूनही जगाला धक्का देऊन जातात.

आजही, ते जे शब्द बोलले गेले त्याचा परिणाम आपण पाहतो. 

हे तुम्हाला समज देते की इस्राएली लोकांना का इतक्या अकाल्पानिकहिंसेला आणि रक्तपाताला तोंड दयावे लागले. 

त्यांनी त्यांच्या स्वतःवर आणिज्या पीढीचा अजून जन्म देखील झालेला नव्हता त्यांच्यावर शाप बोलला होता. 

सर्वात वाईट प्रकारचा विनाश हा स्वतःला नाश करून घेणे आहे. हे उघडच आहे की आज अनेक लोक हे स्वतःवर लागू केलेल्या शापाच्या परिणामामुळे संकटात आहेत. अनेक हे ह्या असे म्हणण्याच्यासवयी मध्ये आहे, "मला मरावयाचे आहे, मला जगण्याचा कंटाळा आला आहे, मी निरुपयोगी आहे आणि असेच बरेच काही, आपण आपल्या स्वतःवर शाप लावून घेत आहोत.

लोक काय समजत नाही ते हे की जेव्हा लोक अशा प्रकारची नकारात्मक भाषा वापरतात, ते दुष्ट शक्तींना द्वार उघडत आहेत जोनाश निर्माण करू शकतो. हेच तर कारण आहे कीअनेक दुर्दैवी घटना जशी साथ लोकांमध्येयेते.

प्रश्न हा तसाच राहतो: स्वतःवर लागू केलेल्या शापाला तोडण्यासाठी मी काय करावे?
परमेश्वरासमोरप्रामाणिक पश्चाताप.

देवाचेअभिषिक्तपुरुष किंवा स्त्री किंवा उपास आणि प्रार्थने द्वारे सुटका शोधा.

योग्य शब्द कबूल करण्याद्वारे ती नकारात्मक वाक्ये बदला (यावर अधिक माहितीसाठी, नोहा ऐप वर दररोज च्या पापकबुली चा संदर्भ घ्या)
चला आपण पवित्र आत्म्याला अधिक संवेदनशील होऊ या म्हणजे तो आपल्याला नकारात्मक गोष्टीं ज्या आपण बोलल्या आहेत त्याविषयी दोषी ठरवेल आणि आपल्याला पश्चाताप आणि स्वस्थ करण्याकडे नेईल.

टीप: कृपा करून हे तुम्हाला ठाऊक असलेल्या कमीत कमी ५ लोकांना सांगा म्हणजे ते सुद्धा ही सुटका अनुभवतील. तुम्ही जेव्हा असे करता तेव्हा परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो.
प्रार्थना
मी जगेन आणि मी मरणार नाही.
मी ह्या पिढीला आणि पुढच्या पिढीला परमेश्वराचीकार्ये घोषित करेन येशूच्या नांवात. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● आत्म्याची फळे कशी विकसित करावी-2
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे
● आर्थिक संकटातून बाहेर कसे यावे # 2
● तुमच्या प्रार्थनेच्या जीवनास प्रोत्साहन देण्यासाठी व्यवहारिक पायऱ्या
● चांगल्या मार्गाचा चौकशी करा
● तुमची मनोवृत्ती तुमची उंची ठरवते
● ही एक गोष्ट करा
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन