पूर्वी अब्राहामाच्या वेळी दुष्काळ पडला होता तसा दुसरा दुष्काळ आतां देशांत पडला, तेव्हा इसहाक हा पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, खाली मिसरास जाऊ नको; मी सांगेन त्या देशात राहा. त्या देशात उपरी असा राहा; मी तुजबरोबर असेन, आणि तुला आशीर्वादित करीन; कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राहाम याशी वाहिलेली शपथ खरी करीन.
मी आकाशांतील ताऱ्यांइतकी तुझी संतति वाढवीन, हे सर्व देश तुझ्या संततीस देईन, आणि पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील; कारण अब्राहामाने माझा शब्द मानिला, माझे सांगणे ऐकले, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळिले. तेव्हा इसहाक गरारात वस्ती करून राहिला. (उत्पत्ति २६:१-६)
इसहाक च्या वेळी तेव्हा इस्राएल मध्ये दुष्काळ होता. तेव्हा मग असे दिसत होते, की योग्य गोष्ट जी केली पाहिजे होती ती ही की मिसर मध्ये जावे जेथे संपन्नता होती. परंतु परमेश्वराने इसहाक ला तेथे जाण्यास मनाई केली, आणि त्याऐवजी त्याने जे आश्वासन त्याचा पिता अब्राहाम बरोबर केले आहे त्यास धरून राहावे असे म्हटले. इसहाक ला त्यावर विश्वास ठेवणे कठीण होते की खरेच परमेश्वर हे बोलत आहे, परंतु त्याने तसे केले.
त्याने देवाच्या वचनाचे पालन केले व देवाने जे सांगितले होते तेथे तो राहिला. दुष्काळाच्या मध्ये त्याच्या आज्ञापालनाच्या परिणामामुळे, त्यास शंभर पट आशीर्वाद मिळाला!
इसहाकाने त्या देशांत धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी शंभरपट पीक मिळाले, आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. (उत्पत्ति २६:१२).
काना येथील लग्नाच्या ठिकाणी द्राक्षारस संपला होता. मरीयेने चाकरांना सांगितले, "जे काही तो (येशू) तुम्हाला सांगेल ते करा." चाकारांसाठी ते ऐकणे अवघड होते परंतु त्यांनी त्याचे त्वरित आज्ञापालन केले. त्यांनी जर प्रभु येशूचे चे शब्द पालन करण्यात उशीर केला असता, तर मग विवाह सोहळ्यात तेथे गोंधळ झाला असता.
त्यांच्या आज्ञापालनास पुरस्कार मिळाला जेव्हा नंतरचा द्राक्षारस हा पहिल्यांदा दिलेल्या द्राक्षारस पेक्षा उत्तम होता. आज्ञापालनात उशीर ही अवज्ञा आहे. देवाचे वचन त्वरित पाळणे हे तुम्हाला अधिक धक्कादायक परिस्थिती व संकटातून वाचवेल कारण मी ते व्यवहारिकरित्या शिकले आहे.
प्रार्थना
पित्या, मला ते अंत:करण दे जे त्वरित तुझे आज्ञापालन करते व तुझ्या वचनाप्रति ते सौम्य आहे, कारण आज्ञापालन हे अर्पणा पेक्षा उत्तम आहे. येशूच्या नांवात. आमेन.
Most Read
● तुमच्या मनाला शिस्त लावा● चला आपण परमेश्वराकडे वळू या
● देवाच्या सान्निध्यासह ओळखीत होणे
● लहान तडजोडी
● प्रेमाद्वारे प्रेरित व्हा
● यशाची परीक्षा
● ख्रिस्ता मधील तुमच्या दैवी नियतीमध्ये प्रवेश करणे
टिप्पण्या