डेली मन्ना
देवाच्या सान्निध्यासह ओळखीत होणे
Thursday, 25th of May 2023
25
24
980
Categories :
देवाच्या सान्निध्य
येशूच्या कुटुंबाने जेव्हा ऐकलेकी काय घडत आहे, ते त्याला तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होते, हे म्हणत, "त्याचे मन भानावर नाही" (मार्क ३:२१). केवळ याची कल्पना करा, जे त्याच्या इतके जवळचे होते त्यांनी विचार केला की त्याला वेड लागले आहे.
हे ते लोक होते जे त्याच्याबरोबर जगले होते, त्याची जोपासना करणारा पिता योसेफ बरोबर त्याच्या लहानपणी त्यांच्या सुताराच्या दुकानात त्यास काम करताना पाहिले होते. त्यांनी येशू ची अधिक प्रशंसाकरणारेव त्याच्या सेवाकार्याविषयी अधिक साहाय्य करणारे असले पाहिजे होते. शेवटी! त्यांच्या ओळखीने तो प्रत्यक्षात कोण आहे ही अद्भुतता गमाविली होती.
पुढील वचन वाचा: योहान ७:५
"कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास किंवा त्याशी सहमत किंवा त्यावर भरवंसा, किंवा त्याच्यावर निर्भर सुद्धा राहत नव्हते." (ऐम्पलीफाईड)
ही एक समस्या होती, केवळ येशूच्या दिवसांत नाही, परंतु तीच समस्या आज सुद्धा अस्तित्वात आहे. लोक हे इतके औपचारिक झाले आहेत जेव्हा ते त्याच्या समक्षतेमध्ये प्रवेश करतात.
आठवण करा जेव्हा प्रथम त्याच्या उपस्थितीने तुम्हीवाचविले गेला किंवा स्पर्श झाला? तुम्ही देवाच्या घरी आला, अपेक्षेचे गहन विचार ठेवून. तुम्ही याची खात्री केली की तुम्ही देवाच्या घरी वेळेवर जावे.
तुमच्या आत्म्यामध्ये आज सुद्धा त्याचअपेक्षेचा विचार अजूनही आहे काय? उपासनेला तुम्ही अजूनही वेळेवर येता काय? (अर्थातच,उशिरा येण्यासाठी येथे लाखो बहाणे असतील)
परमेश्वराच्याउपस्थितीच्या ओळखी संबंधी दु:खद परिणाम हा जुन्या करारात एक मनुष्य उज्जा याच्या जीवनाद्वारे चित्रित केला गेला आहे.
जुन्या करारातून पुढील उताऱ्यात, आपण पाहतो की दावीद व त्याचे लोक बेथलेहम येथून देवाच्या कराराचा कोश आणीत आहेत:
"नाखोनाच्या खळ्यापाशी ते आले तेव्हा बैलाने ठोकर खाल्ली म्हणून उज्जाने कोश हात लांब करून धरिला. तेव्हा परमेश्वराचा कोप उज्जावर भडकला; त्याच्या ह्या चुकीमुळे परमेश्वराने त्यास ताडन केले व तो तेथल्या तेथे देवाच्या कोशापाशी गतप्राण झाला." (२ शमुवेल ६:६-७)
तुम्ही पाहा देवाच्या कराराचा कोश (हा देवाच्या प्रत्यक्ष प्रगटउपस्थितीला प्रतिनिधित करतो) हा अबीनादाबच्या (उज्जा चा पिता) घरात २० वर्षे होता.
२० वर्षे हा मोठा कालावधी आहे आणि उज्जा ने देवाच्या कराराच्या कोशाला कदाचितदररोज पाहिले असेन आणि शक्यतो त्याच्याजवळून दररोज तो गेला असेन. देवाच्या कराराच्या कोशा शी त्याची इतकी ओळख असल्यामुळे, त्याने त्यासाठी आदर हा गमाविला होता.
म्हणून जेव्हा बैलाने ठोकर खाल्ली,देवाच्या कराराचा कोश खाली पडू नये म्हणून साहाय्य करण्यास उज्जाने औपचारिकपणे आपला हात पुढे केला. परमेश्वराच्याउपस्थिती विषयी त्याच्या ओळखीने उज्जाला असा विचार करावयास लावला की परमेश्वर सुद्धा इतर मूर्ति प्रमाणे आहे ज्यास पडण्यापासून मदतीची गरज आहे. उज्जाने हे ओळखले नाही की आपण देवाला घेऊन चालत नाही; तोआपल्याला घेऊन चालतो.तो अडखळत नाही, परंतु तोच आहे जो आपल्याला अडखळण्यापासून राखतो. उज्जाच्या ह्या औपचारिक आचरणाच्या कारणामुळे, परमेश्वराने त्यास ताडन केले व तो त्याच क्षणी मरण पावला.
एके दिवशी येशू त्याच्या स्वतःच्या गावी गेला आणि त्यास आश्चर्य वाटले की त्याचे योग्य स्वागत केले गेले नाही कारणअसे दिसते कीते त्यास त्याच्या बाळपणापासून ओळखत होते. ते अगदी जवळचे लोक होते आणि त्यांना त्याच्याकडून प्राप्त करण्याची ही एक महान संधी होती परंतु ते त्यांच्या ओळखीने व औपचारिकपणाच्या कारणामुळे चुकले होते. ओळखीचे असणे हे तुमच्या जीवनात देवाच्या सामर्थ्यास मर्यादित करते.
तेव्हा येशू त्यांना म्हणाला, संदेष्ट्याचा सन्मान (आदर व पूज्य)होत नाही असे नाही; मात्र त्याच्या (स्वतःच्या) देशांत, त्याच्या(स्वतःच्या)आप्तेष्टात अथवा त्याच्या (स्वतःच्या)घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो. थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यांस बरे केले, ह्याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्ये त्याला तेथे करता आले नाही.
त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले.(मार्क ६:४-६)
असे म्हटले जाते की"ओळख असणे हे अवमानास वाढविते".
पवित्र परमेश्वराबरोबर आपल्या चालण्यात, असे होवो की आपण असे कधीही इतके ओळखी मध्ये येऊ नये की आपण त्यास किंवा त्याच्या उपस्थितीला औपचारिकअसे पाहावे परंतु त्याच्या बरोबर दररोज गहन आदरात चालावे.
प्रार्थना
पेंटेकॉस्टच्या दिवशी, देवाचा आत्मा सामर्थ्याने साधारण लोकांवर आला आणि त्यांना शेवटच्या-समयाच्या पिकाचे सामर्थ्यशाली साधन म्हणून परिवर्तीत केले.
२८ मे २०२३ला, आम्ही कालिदास हॉल, मुलुंड, मुंबई येथे भविष्यात्मक सभा घेतली. देवाच्या महान कार्याच्या तयारीमध्ये, जसे आत्म्याने मार्गदर्शन केले, आम्ही २५ गुरुवार), २६ (शुक्रवार) आणि २७ (शनिवार) हे दिवस उपास व प्रार्थनेचे म्हणून घोषित केले. तुम्ही देखील, आमच्याबरोबर सहभागी व्हा आणि देवाच्या स्पर्शाचा अनुभव करा.
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासाठी कमीत कमी २ मिनिटे आणि अधिक वेळेकरीता प्रार्थना केली पाहिजे.
वैयक्तिक आध्यात्मिक वाढ
प्रभू येशू, तू देवाचा पुत्र आणि देवाकडे जाण्याचा एकमात्र मार्ग आहे. मी तुला माझा प्रभू व तारणारा म्हणून स्वीकारतो. माझ्यासाठी वधस्तंभावरील तुझ्या अनमोल बलिदानासाठी तुझे आभार. प्रभू तुला अधिक घनिष्ठतेमध्ये जाणण्याची माझी इच्छा आहे. या कृपेसाठी मी तुला विनंती करीत आहे. आमेन.
पित्या, मजवर आणि माझ्या कुटुंबाच्या सदस्यांवर तुझ्या आत्म्याचा नव्याने वर्षाव कर. तसेच, २८ मे रोजी पेंटेकॉस्टच्या सभेला हजर राहणाऱ्या प्रत्येकावर तुझ्या आत्म्याचा वर्षाव कर.
कुटुंबाचे तारण
मी कबूल करतो की मी आणि माझे घराणे तर तुझी सेवा करणार.
आर्थिक प्रगती
मी परमेश्वराच्या वचनांमध्ये हर्षित होतो; त्यामुळे मी आशीर्वादित आहे. संपत्ती आणि धन माझ्या घरात राहतील, आणि माझे नीतिमत्व सर्वकाळ टिकते. (स्तोत्र ११२:१-३)
केएसएम चर्च
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की प्रत्येक व्यक्ति जो केएसएम चर्चबरोबर जुळलेला आहे त्याची वचन आणि प्रार्थनेमध्ये वाढ व्हावी. त्यांना तुझ्या आत्म्याचा नव्याने अभिषेक होऊ दे.
राष्ट्र
पित्या, भारतातील प्रत्येक शहरात आणि राज्यात तुझ्या आत्म्याने आणि बुद्धीने भरलेले पुढारी निर्माण कर.
पित्या, तुझा आत्मा भारतातील प्रत्येक शहर आणि राज्यावर वाहू दे. येशूच्या नावाने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● ते लहान तारणारे आहेत● दानीएलाच्या उपासादरम्यान प्रार्थना
● तुम्ही देवाचे पुढील सोडविणारे होऊ शकता
● मनुष्याच्या प्रशंसेपेक्षा देवाच्या पुरस्काराचा धावा करा
● विसरण्याचा धोका
● संबंधामध्ये आदराचा नियम
● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?
टिप्पण्या