डेली मन्ना
विचार करण्यास वेळ घ्या
Thursday, 22nd of February 2024
28
18
1028
Categories :
ध्यान
प्रतिबिंबित करा
अनेक लोक हे ते "करण्यात" व्यस्त आहेत की ते वचनावर विचार करण्यास वेळ देत नाही आणि ते मग त्यांच्या जीवनाशी कसे संबंधित असते.
आता कृपा करून जे मी म्हटले आहे ते समजा: तुमचे विचार करणे हे वचनाच्या संबंधात असले पाहिजे. जर तुम्ही केवळ तुमच्या जीवना विषयी सामान्यपणे विचार करता, त्यास वचनाशी न जोडता, तर शेवटी तुम्ही अधिक भयात व चिंतेत राहाल. तथापि, जर तुम्ही तुमचे जीवन देवाच्या वचनाशी जोडण्यास सुरुवात कराल, तर तुम्ही योजना, क्रियाशील कल्पना वगैरे घेऊन याल.
"आणि मरीये ने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या, तिच्या अंत:करणात त्यावर ती विचार करीत राहिली" (लूक २:१९). जेव्हा मरीया जी येशू ची आई हिने जीवन बदलणारा संदेश देवदूत गैब्रिएल कडून प्राप्त केला, तिने वचनावर आणि ते तिच्या जीवनावर कसे प्रभाव करेल यावर विचार केला. जे वचन तिने प्राप्त केले होते त्यावर जितके अधिक ती विचार करीत राहिली तितकेच अधिक ते वचन तिच्यामध्ये अक्षरशः वाढले.
आज, पहिली गोष्ट लोक करतात जेव्हा ते आरामदायक क्षणाचा विचार करतात ते हे की ते त्यांच्या स्मार्टफोन कडे जातात. हे विचार करण्यावर घाला घालते. तेव्हा मग तुम्ही महत्वपूर्ण समज प्राप्त करण्यात चुकता जे तुम्हाला एक संपूर्ण नवीन स्तरावर नेऊ शकते.
तुमच्या मनाची अवस्था सर्व काही निश्चित करते. ते वेळेला थांबणे, विचार करणे, व ताजेतवाने होण्यासाठी किंमत भरते.
अनेक वेळेला दिवसाच्या शेवटी जेव्हा मी प्रार्थना करतो, मी विचार करतो की मी दिवस कसा घालविला. अशा प्रकारे मी पाहतो की कधी कधी मी माझ्या पत्नीच्या प्रति उद्धट होतो आणि मग मी त्यास कृपा मागतो. जेव्हा मी दिवसभरात मानसिकदृष्टया चालतो, मी पाहतो की प्रभूने मला कसे साहाय्य केले आणि त्यासाठी मी त्यास धन्यवाद देतो. हे येथेच प्रभु नवीन योजना, बदल, वगैरे, प्रगट करतो. असा प्रयत्न करा!
येथे काही प्रश्न आहेत जे तुम्ही विचारू शकता जेव्हा तुम्ही त्याच्या उपस्थिती मध्ये विचार करीत आहात.
आजचा दिवस मी देवाच्या वचनानुसार घालविला [गोष्टी ज्या मी केल्या] काय? कोणत्या गोष्टी मला बदलण्याची गरज आहे? कोणत्या गोष्टी मी चांगल्या केल्या आणि त्यासाठी प्रभूला धन्यवाद दिला पाहिजे? कोणते दीर्घकालीन परिणाम आहेत जर जे मी करीत आहे ते केले आणि जर मी ते बदलले?
टीप: तुमच्याकडे चांगले संदर्भ आहेत काय, काही चांगली उदाहरणे किंवा आजच्या संदेशासाठी सुद्धा संबंधित वचन. ते सुचना सेक्शन मध्ये पाठवा. ते मला साहाय्य करेल.
प्रार्थना
पित्या परमेश्वरा, माझ्या जीवनाच्या प्रत्येक दिवशी तुझ्या आत्म्याचा प्रकाश मजमधून प्रकाशु दे. पित्या, असे होवो की प्रभु येशूचे चारित्र्य हे माझ्या जीवनात येशूच्या नांवात प्रगट होवो. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● येशू खरेच तरवार आणण्यासाठी आला होता काय?● तीन महत्वाच्या परीक्षा
● सुवार्ता घेऊन जाणारे
● मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा
● वातावरणावर महत्वाची समज - १
● दबोरा च्या जीवनाकडून शिकवण
● त्याच्या सामर्थ्याचा उद्देश
टिप्पण्या