डेली मन्ना
परमेश्वर तुमच्या शरीरा विषयी काळजी करतो काय
Friday, 23rd of August 2024
24
21
341
Categories :
कार्यवाही
शांतीचा देव स्वतः तुम्हांस परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. (१ थेस्सलनी ५:२३)
परमेश्वराने आपल्याला आत्मा जीव व शरीर असे बनविले आहे. ख्रिस्ती लोकांसाठी हे तिन्हीही समानपणे अत्यंत महत्वाचे आहेत. आत्म्याने-भरलेले खिस्ती हे नेहमीच परिश्रम घेतात की आत्मा व जीवाच्या घटकाची काळजी घ्यावी परंतु कसे तरी शरीर सांभाळण्यास कमी ठरतात.
प्रेषित पौल लिहितो, "तुमच्या स्वतःला ईश्वरीयपणाकडे (भक्तिमानते) प्रशिक्षित करा, [तुमच्या स्वतःला आध्यात्मिकदृष्टया व्यवस्थित ठेवा]. कारण शारीरिक कसरत ही काही कामाची आहे (थोडक्या गोष्टीविषयी उपयोगी) (१ तीमथ्यी ४:७-८ ऐम्पलीफाईड भाषांतर). दोन्ही प्रकारचे प्रशिक्षण हे महत्वाचे आहे- शारीरिक व आध्यात्मिक प्रशिक्षण. अनेक जण ह्या सत्याला पाहण्यात चुकतात.
येथे काही लोक आहेत जे केवळ आध्यात्मिक दृष्टिकोनावर पूर्णपणे लक्ष ठेवतात व त्यांच्या शरीरिक शरीरावर दुर्लक्ष करतात. दुसऱ्या अर्थाने, काही लोक हे त्यांच्या शारीरिक शरीरावर प्रकार व आकार वर अधिक लक्ष देतात की ते आध्यात्मिक वाढ व परिपक्वतेकडे दुर्लक्ष करतात. येथे संतुलन असले पाहिजे.
कसरत करण्यात लाभ आहे काय आणि ख्रिस्ती लोक करू शकतात काय? होय!
१. आपण आपल्या शरीराची काळजी घेण्याद्वारे देवाचा आदर करतो.
१ करिंथ ६:१९-२०, "तुमचे शरीर, तुम्हांमध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हांला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हांस ठाऊक नाही काय? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही; कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा; कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहा; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा."
परमेश्वर अपेक्षा ठेवतो की मी माझ्या शरीराची काळजी घ्यावी कारण आपण आपल्या शरीराचे मालक नाहीत. आपण केवळ त्याची व्यवस्था ठेवीत आहोत. व्यवस्थापन साठी बायबल मध्ये शब्द हा भांडारी आहे. माझ्या शरीराची काळजी घेणे हा आध्यात्मिक भांडारीपणाचा विषय आहे.
२. कसरत करणे आपल्या शरीराला काही अंशा पर्यंत शिस्तबद्ध करण्यास साहाय्य करते.
परंतु [मुष्टियोद्ध्या प्रमाणे] मी माझ्या शरीराला कुदलतो [त्यास अस्तव्यस्तपणे हाताळतो आणि काठीणपणे शिस्तीत आणतो] आणि त्यास अधीन करतो, कारण इतरांना शुभवर्तमान सांगणे व त्यासंबंधाने सर्वकाही घोषणा केल्यानंतरची भीति की, मी स्वतः अयोग्य ठरू नये [परीक्षेला योग्यपणे सामोरे जाऊ नये, अमान्य होऊ नये व नकली म्हणून अस्वीकार केला जाऊ नये.] ( १ करिंथ ९:२७ ऐम्पलीफाईड भाषांतर)
३. कसरत आपल्याला सुदृढ ठेवते की देवाची इच्छा पूर्ण करीत राहावी
प्रियजनहो, मी प्रार्थना करतो की तुम्ही सर्व प्रकारे संपन्न व्हावे [की तुमचे शरीर सुद्धा] हे चांगले राहावे, जेव्हा तुमचा जीव वाढत जातो व संपन्न होत असतो [मला ठाऊक आहे] (३ योहान २). कसरत तणाव व थकवा ला काही अंशा पर्यंत कमी करते.
सर्वांचा सारांश केला तर, तर कसरत करण्यात आपले ख्रिस्ती ध्येय हे नाही असले पाहिजे की लोकांनी आपल्याकडे लक्ष दयावे व आपली प्रशंसा करावी. त्याऐवजी कसरत चे ध्येय हे आपले शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी असले पाहिजे म्हणजे आपण अधिक आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त करू की परमेश्वराने ते सर्व करण्यासाठी जे आपल्याला बोलाविले आहे ते येथे पृथ्वीवर पूर्ण करावे.
प्रार्थना
पित्या, माझ्या शरीरासाठी मी तुला धन्यवाद देतो. माझ्या शरीराला आरोग्य दे, परमेश्वरा. आज सादर केलेले सत्य स्वीकारण्यात व आचरणात आणण्यासाठी मला साहाय्य कर.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवासाठी आणि देवाबरोबर● अडथळ्यांची भिंत
● दिवस २६:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● आपल्या निवडींचा प्रभाव
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-४
● चांगले हे उत्तमतेचे शत्रू आहे
● प्रभु येशू ख्रिस्ताचे अनुकरण कसे करावे
टिप्पण्या