जेव्हा मी एका अति स्थिर व्यक्तीला शुभवर्तमान सांगत होतो, मी उल्लेख केला की प्रभु येशू ख्रिस्त त्यास शांति देऊ शकतो जे इतर कोणीही देऊ शकत नाही! त्याने त्याचे नाक कुत्सितपणे वेडेवाकडे केले जसे काही तो म्हणत आहे, "शांति, ही इतकी कंटाळवाणी आहे." हीच ती "शांती" जी तुम्हाला हताश होण्यापासून थांबवू शकते! कार्य वेळेच्या आत पूर्ण करावयाचे आहे, आर्थिक ध्येय प्राप्त करण्यात संघर्ष, आणि नातेसंबंध जे तुम्हाला तुमच्या शांति पासून पूर्णपणे हिरावून घेऊ शकते आणि तुम्हाला निराशेत बुडवून टाकते." काही क्षणाकरिता तो स्तब्ध राहिला आणि मग सहमत झाला.
सर्व मनोरंजन जे उपलब्ध आहे, ते असताना सुद्धा, येथे जगामध्ये इतके हताश लोक पूर्वी कधी नव्हते जितके आता आहेत.
शांतीने भरलेले जीवन हे जीवनात अचानकपणे घडत नाही, येथे काही निवडी आहेत ज्या आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात करावयाच्या असतात. त्याच्याकडे येण्याची दररोजची निवड. एक दररोजची निवड की आपले मन त्याच्या वचनावर स्थिर करावे. आपल्याभोवती काय घडत आहे याची पर्वा न करता त्याजवर भरवंसा ठेवण्याची दररोजची निवड.
जसे मी अगोदर उल्लेख केला आहे की, शांति ही स्वाभाविकपणे येणार नाही. यामुळेच वचन आपल्याला आवाहन करते की, "शांतीचा शोध घ्या व त्याच्या पाठीस लागा" (स्तोत्र ३४:१४). आता कदाचित काही असा सल्ला देतील हे म्हणत, "काही दिवस त्या कार्यापासून दूर जा, आराम करा, सुट्टी घ्या व तणावपूर्ण कार्याबद्दल विचार करू नका वगैरे," यामध्ये काहीही चूक नाही परंतु तुम्ही पाहा हे केवळ तात्पुरते उपाय आहेत आणि ते कायम राहणार नाहीत. शांति जी परमेश्वर देतो, ती वेगळी आहे-ती कायमची, व खरी आहे.
जेव्हा परमेश्वर जी शांति तुम्हाला देत आहे त्यामध्ये तुम्ही दररोज चालता, युद्ध ज्यामध्ये तुम्ही आहात ते लवकरच संगतीचे भोजन होईल जे तुमचे पोषण करेल व तुम्हाला वाढवेल. स्त्रोत्र २३ मध्ये, तो स्वतः "मृत्यूच्या सावलीत" उभा राहिला, तरीही, तो "कोणत्याही अरिष्टाला" घाबरला नाही. नंतर तो म्हणतो, "माझ्या शत्रूंच्या देखत तूं मजसाठी ताट वाढितो."
प्रभु येशू हा शांतीचा राजकुमार आहे. तर मग प्रतिदिवशी सकाळी त्याचा धावा करण्यास का नाही वेळ काढावा; तेव्हा मग जे काही तुमच्या समोर येते त्यास आत्मविश्वासाने तोंड देण्यास तुम्ही समर्थ व्हाल.
अंगीकार
शांतीचा राजकुमार स्वतः मला पूर्णपणे शुद्ध करतो. आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या येण्याच्या वेळेस माझे शरीर, जीव व आत्मा हे निष्कलंक असे जतन केले जाईल. (१ थेस्सलनी ५:२३)
Join our WhatsApp Channel

Most Read
● देवाचे 7 आत्मे: परमेश्वराचा आत्मा● देवासारखा विश्वास
● यहूदाच्या विश्वासघाताचे खरे कारण
● पूल बनवणे, अडथळे नाहीत
● शांति तुम्हाला कसे बदलते ते शिका
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
● अद्भुततेस जोपासणे
टिप्पण्या