डेली मन्ना
मित्राची विनंती: प्रार्थनापूर्वक निवडा
Saturday, 17th of April 2021
23
19
1484
Categories :
प्रार्थना
प्रभु येशूने म्हटले, "ह्या जगात तुम्हांला क्लेश होतील, तरी धीर धरा; मी जगाला जिंकले आहे" (योहान १६:३३). परमेश्वराला ठाऊक होते की ह्या जगात जगणे हे इतके सोपे होणार नाही, म्हणून त्याच्या दये मध्ये, त्याने आपल्यासाठी साहाय्य पद्धती दिली जी आपल्याला आपल्या जीवन प्रवासात साहाय्य करेल व समाधान देईल. देवाने-दिलेली एक साहाय्य पद्धती जी आपल्यासाठी उपलब्ध आहे ते भक्तिमान मित्र आहे.
जे मित्र तुम्ही बनविता त्यांजविषयी हेतुपूर्वक असणे हे फारच महत्वाचे आहे. ही ती प्रत्येक संगती नाही ज्यामध्ये तुम्ही असलेच पाहिजे. हेतुपूर्वकता तुमच्यामध्ये त्या इच्छेसह येते की त्यांना मित्र ठेवावे जे तुमचा आवेश, ध्येय किंवा स्वप्ना सह जुळलेले आहेत. नाहीतर, असे लोक जे तुमच्या सभोवती आहेत त्यांच्यामुळे तुम्ही स्वतःला कदाचित दु:खवू शकता. आणि अर्थातच, परमेश्वराला हे नाही पाहिजे की तुम्ही दु:खवले जावे कारण त्यास नेहमीच त्याच्या लेकरांसाठी उत्तम ते हवे असते.
देवाच्या एका महान स्त्री ने एकदा म्हटले, "सर्व काही शक्य आहे जेव्हा तुमच्या सभोवती योग्य लोक आहेत की तुम्हाला साहाय्य करावे."
एस्तेरच्या पुस्तकात हामान चे वृत्त आपल्याला बरेच काही सांगते. हामान हा यहूद्यांचा शत्रू होता व त्यांना जिवंत मारण्यास संधी पाहत होता. मर्दखय चा तो द्वेष करीत होता, जो एक यहूदी ज्यांस इतर यहूद्यांबरोबर बंदिवासात नेले होते. हामानास राजाच्या मेजवानीस आमंत्रित केले होते व त्याने त्याविषयी त्याची पत्नी व इतर मित्रांस सांगितले. ते इतरांना सांगत असताना त्याने वाईट भावनेने मर्दखय च्या नांवाचा उल्लेख देखील केला. हामान ची पत्नी व मित्रांनी त्यास काय सल्ला दिला ते तुम्हाला ठाऊक आहे काय?
एस्तेर ५:१४ हे आपल्याला सांगते, "तेव्हा त्याची स्त्री जेरेश व त्याचे सर्व मित्र त्यांस म्हणाले, पन्नास हात उंचीचा फाशी देण्याचा एक खांब उभा करावा आणि उद्या सकाळी राजास विनंती करा की मर्दखयास त्यावर फाशी दयावे; मग तुम्ही आनंदाने राजाबरोबर मेजवानीस जा. ही गोष्ट हामानास पसंत वाटून त्याने फाशीचा खांब तयार करविला."
केवळ कल्पना करा, जर हामानास भक्तिमान मित्र असते तर; असे क्रूर शब्द त्यांच्या मुखातून पडले असते काय? बायबल आपल्याला सावधानीचा इशारा देते की, "फसू नका, कुसंगतीने नीति बिघडते" (१ करिंथ १५:३३).
देवाबरोबर तुमच्या चालण्या मध्ये, भक्तिमान मित्र ठेवणे यावर अधिक भर दिला जाऊ शकत नाही. जेव्हाकेव्हा तुम्हाला अधिक थकलेले व हताश असे वाटते, तुम्हाला कोणी एक असा आहे काय ज्याबरोबर तुम्ही प्रार्थना करू शकता? जितके अधिक तुम्ही प्रत्येकाबरोबर प्रीति करता व हसता व आनंद करता, हे समजा की तुम्हाला कोणाची तरी गरज आहे, काही लोकांची की तुमच्या विचारांवर उघडपणे चर्चा करावी व ते तुम्हाला सांगावे. नीतिसूत्रे २७:९ म्हणते की, "तेल व सुंगंधी द्रव्ये मनाला आल्हाद देतात, त्याप्रमाणे मनापासून मसलत देणाऱ्या मित्राचे माधुर्य होय."
हिशोबदेही असण्यासाठी, तुम्हाला भक्तिमान मित्रांची गरज आहे. तुम्हाला कोणाची तरी गरज लागते की कोणीतरी तुमची कृत्ये प्रामाणिकपणे व पूर्णपणे तपासावी, देवाच्या वचनाच्या भिंग द्वारे. जेव्हा सत्य कटू असे दिसते, तेव्हा तुम्हाला कोणीतरी पाहिजे की प्रीति मध्ये सत्य बोलण्याद्वारे ते तुमच्यासमोर बोलून दाखवावे. तुम्हाला चांगला सल्ला व शब्दाची गरज आहे जे तुमच्या जीवनावर सकारात्मकपणे परिणाम करेल. जर हनन्या च्या पत्नी ने चांगला सल्ला दिला असता तर हे अगदी शक्य झाले असते की हनन्या ने त्याचे विचार बदलले असते आणि भूमि विकण्याच्या किंमती विषयी खोटे बोलला नसता. परंतु दोघांनीही ते करण्यास संगनमत केले होते जे वाईट होते.
म्हणून, जेव्हा जीवनाच्या मार्गात चालत असतो, तुम्हाला त्या आत्म्याने-भरलेल्या मित्रतेची गरज लागेल जे तुम्हाला पुन्हा एकदा योग्य मार्गावर आणेल व तुम्हाला निरंतर योग्य मार्गावर ठेवेल.
प्रार्थना
पित्या, मी तुला धन्यवाद देतो कारण तूं नेहमीच माझे ऐकतो. मी प्रार्थना करतो की भक्तिमान मित्र हे माझ्या मार्गात निरंतर यावेत. मी हे सुद्धा मागतो की माझ्या मार्गात ते लोक यावेत जे तुझ्या मार्गाच्या समन्वयात आहेत. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● परमेश्वराचा धावा करा● एक स्थान ज्यास स्वर्ग म्हणतात
● यहूदाच्या पतनापासून ३ शिकवणी
● दिवस २९:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● कर्जामधून बाहेर या: किल्ली# १
● बेखमीर अंत:करण
● बीज चे सामर्थ्य-१
टिप्पण्या