"यास्तव इस्राएलाचा देव परमेश्वर म्हणतो, तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे मजसमोर निरंतर चालू राहील असे मी म्हटले होते खरे, पण आतां परमेश्वर म्हणतो, असे माझ्या हातून न घडो; कारण जे माझा आदर करितात त्यांचा मी आदर करीन आणि जे मला तुच्छ मानतात त्यांचा अवमान होईल." (१ शमुवेल २:३०)
सन्मानचा अर्थ मोठया आदराने पाहावे. दुर्दैवाने, आपण त्या काळात जगत आहोत जेथे सन्मानाचा सिद्धांत हा मागे टाकून दिला आहे. तरुण मुले त्यांच्या आई-वडिलांचा अनादर करतात आणि जर त्यांना शिस्त लावली तर पोलिसाला देखील बोलवितात. आपल्या संस्कृतीसाठी आपल्याला काहीही किंमत नाही आणि पवित्रशास्त्राच्या सीद्धातांना देखील नाही. जे काही दस्तावेजमध्ये दिलेले आहे त्याऐवजी आपण गोष्टींना आपल्या मनासारखे करण्यास पाहत असतो. आजच्या काळात, सन्मानाची भाषा ही आपल्याला अनोळखी वाटते.
तथापि, एस्तेरने सन्मानाचा सिद्धांत समजला होता. ती अनाथ होती, तरीही तिने तिच्या चुलत्याच्या उपदेशाचे पालन केले. ती तिच्या चुलत्यापेक्षा अधिक समजते असे तिने दाखविले नाही जेव्हा ती तरुण होती. तिने तरीही त्याचा आदर केला आणि त्याच्या उपदेशानुसार केले. तुम्ही माझ्याबरोबर सहमत व्हाल की हा तिच्या चुलत्याचा विचार होता की तिने सिंहासनाच्या स्पर्धेमध्ये सामील व्हावे. ती म्हणू शकली असती की तिला त्यात रस नाही आणि हे की तिच्या जीवनासाठी तिच्या स्वतःच्या योजना आहेत, पण नाही. तिने तिच्या चुलत्याच्या इच्छेचा आदर केला आणि त्यासाठी तयार झाली. तसेच, जेव्हा ती राजवाडयात होती, तिने राजवाडा आणि राजाच्या रुढींचा आदर केला. होय, ती यहूदी होती, परंतु तिने गोष्टींना तिच्या स्वतःच्या मार्गाने करण्यावर भर दिला नाही. एका प्रसंगी, तिने राजाच्या खोजाला सांगितले की जे त्यास प्रसन्न करते ते त्याने तिला दयावे.
एस्तेर २:८-९ मध्ये बायबल म्हणते, "राजाची आज्ञा व त्याचा ठराव प्रसिद्ध झाल्यावर बहुत कुमारी शूशन राजवाडयात हेगेच्या हवाली करण्यात आल्या; एस्तेर हिलाही राजमंदिरातील स्त्रियांचा रक्षक हेगे याच्या ताब्यात दिले. ती तरुण स्त्री त्याला पसंत पडली व तो तिजवर प्रसन्न झाला; त्याने काहीएक विलंब न लाविता तिच्या शुद्धतेच्या वस्तू, तिचे भोजन-पदार्थ आणि तिला सजतील अशा सात सख्या राजवाड्यातून दिल्या आणि तिला व तिच्या सख्यांना तेथून नेऊन अंत:पुरात सर्वांहून उत्तम जागा राहण्यास दिली." एस्तेरने खोजासमोर सन्मानीय आणि आदरणीय वृत्ति दाखविली असेन ज्याने त्याला या स्त्रीला प्राधान्य दयावयास लावले. कोणास उद्धट व गर्विष्ठ स्त्री आवडेल?
म्हणून, आपण आपल्या अंत:करणापासून सन्मानाचे जीवन जगावे. एस्तेर केवळ नशिबाने एक शेतकरी मुलीपासून राणी होण्यापर्यंत परिवर्तीत झाली नाही; तिने तिच्या सिंहासनापर्यंत जाण्याच्या मार्गाचा सन्मान केला. तिला इतका आदर होता की जो कोणी तिच्या संपर्कात आला त्याने तिला पसंत केले. आदराच्या उलट हे अहंकार आहे. ही वेळ आहे की तुमच्या अंत;करणापासून लोक, कायदे व पद्धतींचा आदर करावा. तुम्हांला सर्व काही माहीत आहे हे सिद्ध करावयाचे नाही कारण येथे नेहमीच काहीतरी आहे की इतरांकडून शिकावे. एस्तेला राजवाड्याची रूढ ठाऊक नव्हती, परंतु राजाच्या खोजाला ठाऊक होते, म्हणून ती हुशार होती की त्याच्या अधीन असावे.
मित्रा, आपण जेव्हा गौरवाच्या राजाजवळ जातो, तेव्हा आपल्याला त्याची स्तुति करावी आणि त्यास धन्यवाद देण्याची गरज आहे. सन्मानाची ती रूढी आहे. येशू कोण आहे यासाठी नासरेथ येथील लोक सन्मान करू शकत नाहीत किंवा करणार नाहीत- त्यांनी त्यास पुन्हा एकदा त्याच्या बालपणाच्या पातळीवर ओढून आणण्याच्या प्रयत्नावर भर दिला म्हणजे ते त्यास त्यांच्या समान करू शकतील. समस्या ही आहे की तो राजा होता, जो उदाहरण किंवा समानता असल्यावाचून असलेला शासक होता. येशूने म्हटले, "संदेष्ट्यांचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या देशात, त्याच्या आप्तेष्टांत अथवा त्याच्या घरच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो" (मार्क ६:४).
ज्याचा तुम्ही आदर करता ते तुमच्याकडे आकर्षिले जाईल, आणि ज्याचा तुम्ही अनादर करता ते तुमच्याकडून निघून जाईल. जेव्हा आपण लोकांबरोबर बोलतो, आपल्याला आदराची संस्कृती आत्मसात करण्याची गरज आहे. तुमच्या पास्टर पेक्षा तुम्हाला अधिक ठाऊक आहे हे सिद्ध करावयाचे नाही; केवळ त्यांचा आदर करावा. तुम्ही कदाचित तुमच्या आई-वडिलांपेक्षा अधिक शिक्षित आणि धनवान असाल, पण तरीही तुम्हांला त्यांचा आदर करण्याची गरज आहे म्हणजे आयुष्यात तुमचे कल्याण व्हावे आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळावे. हे अशाप्रकारे सन्मान हा शक्तिशाली आहे. ही वेळ आहे की तुमच्या पावलांना पुन्हा वळण दयावे आणि तुमच्या अंत:करणातून अहंकार आणि उद्धटपणाच्या भावनेस देवाला काढू दयावे म्हणजे तुम्ही खऱ्या परिवर्तनाचा अनुभव करू शकावा.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की तू माझे अंत:करण नम्रतेच्या आत्म्याने भरून टाक. मी प्रार्थना करतो की माझ्या अंत:करणातून प्रत्येक अहंकार तू काढून टाक आणि तुझ्या नम्र आत्म्यास आत्मसात करण्यास मला साहाय्य कर. मी फर्मान काढतो की आतापासून जे माझ्यापेक्षा मोठे आहेत मी त्यांचा सन्मान करीन, आणि कोणालाही कमी लेखणार नाही. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● फसवणुकीच्या जगात सत्याची पारख करणे● रागावर उपाय करणे
● स्तुति वृद्धि करते
● मध्यस्थी वर एक भविष्यात्मक शिकवण १
● टिकणारे बदल तुमच्या जीवनात कसे आणावे – २
● तुमची सुटका ही येथून पुढे थांबविली जाणार नाही
● दिवस २४:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
टिप्पण्या