हे देवा, राष्ट्रे तुझी स्तुति करोत;
सर्व राष्ट्रे तुझी स्तुति करोत.
भूमीने आपला उपज दिला आहे;
देव, आमचा देव, आम्हांला आशीर्वाद देवो. (स्तोत्रसंहिता ६७: ५-६)
काळजीपूर्वक लक्षात घ्या, हे केवळ तेव्हाच जेव्हा देवाचे लोक त्याची स्तुति करतात, हे केवळ तेव्हाच पृथ्वी ही अधिक उपज देईल.
आपण आपली वृद्धि होण्यापर्यंत देवाची स्तुति करण्यासाठी वाट पाहू नये, त्याऐवजी,ते अनुभविण्याअगोदर आपण त्याचीस्तुति केली पाहिजे. कारणस्तुतीवृद्धीला कारणीभूत आहे.
ते जे सतत कुरकुर व तक्रार करतात ते ह्या वृद्धीचा अनुभव करू शकणार नाही जे परमेश्वरापासून येते. कुरकुर आणि तक्रार करणे हे वृद्धीला अडथळा असे आहे. दैवी पुरवठा हा नेहमीच देवाच्या लोकांच्या स्तुतीला प्रत्युत्तर देईल.
जेव्हा येशूने पित्याला धन्यवाद आणि स्तुति दिली आणि भाकर व मासे आशीर्वादित केले, त्याची वृद्धि होण्याच्या चमत्काराने हजारोंना तृप्त केले.
नंतर त्याने (येशूने) लोकांना जमिनीवर बसावयास सांगितले, त्या सात भाकरी घेतल्या उपकारस्तुति करून त्या मोडल्या व वाढण्याकरिता आपल्या शिष्यांजवळ दिल्या; आणि त्यांनी लोकांना वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते; त्यांस त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढावयास सांगितले. ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात पाट्या त्यांनी भरून घेतल्या. (मार्क ८: ६-८)
त्याप्रमाणेच, जर आपल्याला आपल्या जीवनात वृद्धि किंवा वाढ पाहिजे आहे, तर मग जे आपल्याकडे आहे त्यासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद आणि स्तुति देण्यास शिकले पाहिजे.
योएल ३: १३ म्हणते, "विळा चालवा, पीकतयार आहे....."
तुम्ही विळा शिवाय उपज आणू शकत नाही. उपज च्या वेळी तेथे नेहमीच आनंद आहे (यशया ९: ३). स्तुति आणि आनंद हे एकत्र चालतात. त्यामुळे, स्तुति हा विळा आहे जो उपज काढण्यास वापरला जातो.
आजपासून, ह्या प्रकटीकरणासह परमेश्वराची स्तुति करा आणि अद्भुत परिणाम प्राप्त करा.
अंगीकार
सर्व वेळेला मी परमेश्वराची स्तुति करेन; त्याचीस्तुति ही नेहमीच माझ्या ओठावर असेन. म्हणून माझे शोक हे हर्ष करण्यात आणि माझे क्लेश हे येशूच्या नांवात आनंदात बदलतील.
Join our WhatsApp Channel
Most Read
● वातावरणावर महत्वाची समज- ४● दिवस ११ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● दुष्टात्म्यांच्या प्रवेशाची ठिकाणे बंद करणे- १
● विश्वासाद्वारे प्राप्त करणे
● दिवस ३९:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● स्वयं-गौरवाचा सापळा
● स्वतःवर लागू केलेल्या शापापासून सुटका
टिप्पण्या