ईयोबाने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने ईयोबाच्या दु:खाचा परिहार केला; पूर्वी ईयोबाची मालमत्ता होती तिच्या दुप्पट परमेश्वराने त्याला दिली. (ईयोब ४२:१०)
ईयोबाची संपन्नता तेव्हा आली जेव्हा त्याने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना (मध्यस्थी) केली. हे मित्र नव्हते पण मित्र म्हणून शत्रू होते-शत्रू जे मित्रा चा सोंग घेतलेले होते. जेव्हा त्यास त्यांची अत्यंत गरज होती तेव्हा त्यांनी त्याची टीका केली, त्याचा गैरसमज केला, त्याचा न्याय केला होता. ईयोबाला त्याच्या वतीने अशा मित्रांसाठी (तथाकथित) प्रार्थना करण्यास सांगितले होते.
प्रभु येशूने तसाच विचार म्हणून दाखविला, "जे तुमचा द्वेष करतात, तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा." जेव्हा आपण असे करतो, आपण आपल्या स्वर्गातील पित्याप्रमाणे कार्य करीत आहोत. आपण देवाचा जो व्यवहार आहे तोच घेऊन असतो. (मत्तय ५:४४)
देवाची ही इच्छा आहे की सर्व पुरुष व स्त्रियांचे तारण व्हावे, कोणाचाही नाश होऊ नये. मी विश्वास ठेवतो को परमेश्वर प्रत्येक मध्यस्थी करणाऱ्यांच्या परिश्रमास पुरस्कार देईल. मी हा सुद्धा विश्वास ठेवतो की परमेश्वरापासून हा पुरस्कार हा केवळ भौतिक गोष्टीमध्ये नाही परंतु आध्यात्मिक आशीर्वादा मध्ये प्रगट होईल.
ह्याकारणासाठी मी लोकांना सांगतो की मध्यस्थी करणाऱ्या संघाशी जुळावे. अनेक लोक हे भविष्यात्मक मध्यस्थीस समजत नाहीत आणि त्यामुळे कुरकुर करतात आणि त्यामुळे त्यांचे आशीर्वाद गमावीत आहेत. अनेकांना असे वाटते की जेव्हा ते इतरांसाठी मध्यस्थी करीत आहेत तेव्हा ते काहीतरी गमावीत आहेत. वास्तवात, हे अगदी त्याच्या उलट आहे-तुम्ही प्राप्त करीत आहात.
तसेच, जेव्हा दानीएल ने त्याच्या राष्ट्रासाठी प्रार्थना केली, तेव्हा तो संपन्न झाला. "हा [मनुष्य] दानीएल दारयावेशाच्या कारकिर्दीत व कोरेश पारसी याच्या कारकिर्दीत भाग्यास चढला" (दानीएल ६:२८). आपण जेव्हा आपल्या सभोवती पाहतो, आणि पाहतो की आपल्या सभोवती काय घडत आहे, हे फार सोपे आहे की आपल्या राष्ट्राची टीका करावी. तथापि, आपल्याला आपल्या राष्ट्राकडे विश्वासाच्या नेत्रांनी पाहावयाचे आहे. चला आपण आपल्या राष्ट्रासाठी प्रार्थना करू की तिने देवाकडे वळावे. परमेश्वर खात्रीने तुम्हाला संपन्न करेल.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र कमीत कमी २ मिनिटे पुन्हा म्हणा
सात्विकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते; त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल. ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; ते दुष्काळाच्या दिवसांत तृप्त राहतील. (स्तोत्रसंहिता ३७:१८-१९)
त्या समयी असे होईल की तुझ्या खांद्यावरून त्याचा भार व तुझ्या मानेवरून त्याचे जूं निघेल आणि तुझ्या पुष्टतेमुळे ते मोडून जाईल. (यशया १०:२७)
मी पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेल्या झाडासारखा आहे. जे काही मी करेन त्यात संपन्न होईन. (स्तोत्रसंहिता १:३)
मी न खचलो तर यथाकाळी माझ्या पदरी पीक पडेल. (गलती ६:९)
ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे माझा देव आपल्या संपत्यनुरूप माझी सर्व गरज पुरवील. (फिलिप्पै ४:१९)
तुमच्या देशासाठी प्रार्थना करण्यास काही वेळ घ्या
१. आज उपासाचा ७वा दिवस आहे. आता अनेकांना ठाऊक आहे, की आपण ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात प्रत्येक आठवडयात (मंगळावर, गुरुवार व शनिवारी) उपास करीत आहोत. ह्या उपास करण्यास 5 महत्वाचे उद्देश आहेत.
२. प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी 3 मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
३. तसेच ह्या प्रार्थना मुद्द्यांना ज्या दिवशी तुम्ही उपास करीत नाहीत तेव्हा तुमच्या आध्यात्मिक वाढी साठी वापर करा.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
परमेश्वर पित्या, तुझ्या वचनात मला स्थिर कर, असे होवो की तुझ्या वचनाने माझ्या जीवनात फळ उत्पन्न करावे. शांतिदात्या परमेश्वरा, मला तुझ्या वचनाने शुद्ध कर, कारण तुझे वचन हेच सत्य आहे. येशूच्या नांवात. आमेन.
कुटुंबाचे तारण
परमेश्वर पित्या, मी तुला विनंती करीत आहे की माझ्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांवर कार्य कर की ख्रिस्ताचे सत्य स्वीकारावे. त्यांना असे हृदय दे की येशू ख्रिस्ताला प्रभु, परमेश्वर व तारणारा असे जाणावे. त्यांच्या संपूर्ण हृदयाने त्यांना तुझ्याकडे वळीव.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
मी तुला धन्यवाद देतो पित्या, कारण हा तो तूच आहे जो मला संपन्नता प्राप्त करण्यास सामर्थ्य देतो. संपन्नता निर्माण करण्याचे सामर्थ्य मजवर उतरो. येशूच्या नांवात. (अनुवाद ८:१८)
केएसएम चर्च
पित्या, पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, कर्मचारी व संघ सदस्य व प्रत्येक व्यक्ति जो करुणा सदन सेवाकार्याशी जुळलेला आहे त्यांस येशूच्या नांवात संपन्न कर.
देश
पित्या, तुझे वचन सांगते की हा तूच आहे जो शासनकर्त्यास आदराच्या उच्च पदावर नियुक्त करतो आणि हा तूच आहे जो पुढाऱ्यांना त्यांच्या उच्च पदावरून काढतो. हे परमेश्वरा, आमच्या देशाच्या प्रत्येक राज्यात, शहरात योग्य पुढारी निर्माण कर. येशूच्या नांवात. आमेन.

Join our WhatsApp Channel
Most Read
● येशूला पाहण्याची इच्छा● पुढच्या स्तरावर जाणे
● चांगल्या मार्गाचा चौकशी करा
● पृथ्वीवरील राजांचा अधिपती
● तुमची सुटका आणि स्वास्थ्याचा उद्देश
● बुद्धिमान व्हा
● मनुष्यांची परंपरा
टिप्पण्या