डेली मन्ना
तुमच्या पदोन्नतीसाठी तयार राहा
Monday, 30th of January 2023
26
20
975
Categories :
एस्तेरचे रहस्य: मालिका
"जागा झालेल्या मनुष्याला जसे स्वप्न निरर्थक वाटते, तसे हे प्रभू, तू सज्ज होताच त्यांचे ते स्वरूप तुच्छ मानिशील." (स्तोत्र. ७३:२०)
आपल्या सभोवती, आपण अधर्मी समृद्धि पाहत आहोत. अचानकपणे आपल्या मनात विचार येतो: "येथे मी उपासना करीत आहे, जिवंत देवाची सेवा करीत आहे, तरीही मी समृद्ध होत नाही-का?" ही परिस्थिती कार्यालये व व्यवसायात अधिक स्पष्ट आहे. परमेश्वर झोपलेला नाही. परंतु काही वेळा, तो तसे करीत आहे असे वाटते. पण तेव्हा काय घडते जेव्हा देव झोपलेला आहे असे दिसणाऱ्या स्थितीतून कार्य करतो? अधर्मी मनुष्य, जो इतका बुद्धिमान व समृद्ध असा दिसत असतो, तो एका स्वप्नासारखा अदृश्य होतो. जणू काही तो भूत किंवा भ्रम होता.
"कारण उन्नति ही पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून नव्हे, व अरण्याकडूनही नव्हे, तर न्याय करणारा देव आहे; तो एकाला खाली पाडितो व दुसऱ्याला वर चढवितो." (स्तोत्र. ७५:६-७)
तुमच्या पदोन्नतीसाठी मला दोन व्यवहारिक किल्ल्या सांगू दया:
१. नेहमीच योग्य गोष्ट करा.
एस्तेरच्या पुस्तकातील शीर्षकांपैकी एक हा योग्य गोष्ट करणे आहे जरी जेव्हा ती लोकप्रिय नाही. आपण एस्तेरचे धाडसाचे एक कृत्य पाहतो जेव्हा ती तिच्या लोकांसाठी राजाकडे विनंती करते जरी जेव्हा ते तिच्यावर उलटले असते, परंतु देवाच्या दृष्टीसमोर व तिच्या यहूदी लोकांसाठी तसे करणे योग्य होते.
राजाचा घात करण्याची योजना जेव्हा मर्दखयाने जाणली तेव्हा त्याबद्दल तो बोलला. त्या योजनेमागे शक्तिशाली ताकत होती जी कार्य करीत होती परंतु त्यावेळेस ती योग्य गोष्ट करण्याची वेळ होती कारण त्याने राजाप्रती त्याचा एकनिष्ठपणा दाखविला. परिणामस्वरूप, शास्त्र्यांनी राजेशाही नोंदीमध्ये त्याच्या कृत्याबद्दल लिहिले. आणि देवाने योग्यवेळी राजाच्या ते निर्दशनात आणून दिले (एस्तेर ३:२१-२३; ६:१-३). एस्तेरने मर्दखयास राजासमोर सादर करण्याच्या वेळेअगोदर, तो उत्कृष्टता, एकनिष्ठ व नेतृत्वाबद्दल ख्याती प्राप्त होता.
२. तुमच्या पदोन्नतीमध्ये आत्मविश्वासाने पाऊल टाका
पदोन्नती झाल्यावर, मर्दखयाचे पहिले कार्य हे शत्रूच्या फर्मानाविरुद्ध कार्य करण्याचे होते-एक जे देवाच्या लोकांची कत्तल करण्याबद्दल होते-त्याविरुद्ध एक नवीन फर्मान जारी करावे. त्याने नवीन फर्मान शास्त्र्यांना सांगितला आणि त्यांनी तो लिहिला.
तो राजाची मुद्रा वापरून, राजाच्या नावाने आदेश देत होता. आणि ते फर्मान दूर दूरच्या देशाला पाठविण्यात आले. शेवटी, या दैवी मध्यस्थीने, यहूदी लोकांनी त्यांच्या शत्रूंवर वर्चस्व केले आणि त्यांचा विलाप आनंदात बदलून गेला! पवित्र शास्त्र म्हणते, "तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लाविले आहे; तू माझे गोणताट काढून मला हर्षरूपि वस्त्र नेसाविले आहे." (स्तोत्र. ३०:११)
महान सिकंदरविषयी शाळेमध्ये इतिहासाच्या वर्गात सांगितलेले तुम्हांला आठवते काय? एके काळी तो सर्वात महान सेनापति होता आणि ज्ञात असलेल्या जवळजवळ संपूर्ण जगावर विजय मिळविला होता. तुम्हांला हे ठाऊक आहे काय त्याच्याविषयी बायबलमध्ये संदर्भ दिला आहे? पवित्र शास्त्रामध्ये त्याचे नाव लिहिलेले तुम्हांला सापडणार नाही, परंतु त्याच्याविषयी संदर्भ हा दानीएलाच्या पुस्तकात पाहिला जाऊ शकतो. पाहा, बायबल त्यास काय म्हणते-"एक बकरा" (दानीएल ८:५-८). देवाचा एक माणूस ते अशा प्रकारे मांडतो. "तो जो जगासाठी महान सिकंदर होता तो देवासाठी एक बकऱ्यापेक्षा अधिक काहीही नव्हता. जेव्हा देव उभा राहतो, तेव्हा महान हे शून्य होतात. उपासना व वचनामध्ये चांगला वेळ घालविण्याद्वारे देवाला तुमच्या जीवनात कार्य करू दया. तुमच्या दान देण्याने त्याचा सन्मान करा. असे करण्याने कधीही निराश होऊ नका.
हामान, ज्याने मर्दखयासाठी मोठा खांब तयार केला होता, त्यावर त्याच्या स्वतःलाचा टांगण्याने त्याचा शेवट झाला. "राजाच्या तैनातीस असलेल्या खोजांपैकी हर्बोना नावाचा एक खोजा म्हणाला, पाहा, हामानाच्या येथे पन्नास हात उंचीचा एक फाशी देण्याचा खांब उभा केलेला आहे; ज्या मर्दखयाने राजाच्या हिताची खबर दिली त्याला टांगण्यासाठी हामानाने तो उभा केला आहे, राजाने म्हटले, त्याच खांबावर यास फाशी दया" (एस्तेर ७:९). दुष्टांना उंच करण्यात येते म्हणजे सर्व पाहू शकतील की त्यांचे पतन हे किती मोठे आहे आणि देवाची स्तुति करावी. तुमच्या पदोन्नतीसाठी तयार व्हा.

प्रार्थना
पित्या, मी तुझे आभार मानतो की तू देव आहेस, जो केवळ शक्तिमान नाही तर सर्वशक्तिमान आहे. त्यामुळे, मी सर्व परिस्थिती तुझ्या हातात समर्पित करतो. जर तू माझ्या पक्षाचा आहेस, तर कोण माझा विरोधी होऊ शकतो? येशूच्या नावाने. आमने.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आध्यात्मिक नियम: संबंधाचा नियम● पवित्र शास्त्राच्या संपन्नतेचे रहस्य
● येशूचे प्रभुत्व कबूल करणे
● आशीर्वादाचे सामर्थ्य
● तुमच्या समस्या व तुमचा दृष्टीकोन
● देवाचे ७ आत्मे: ज्ञानाचा आत्मा
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-१
टिप्पण्या