डेली मन्ना
जीवनाचे मोठे खडक ओळखणे आणि प्राथमिकता देणे
Friday, 3rd of March 2023
32
19
1361
Categories :
प्राधान्यक्रम
वेळ व्यवस्थापन तज्ञ नेहमी "रांजण मध्ये एक मोठा खडक" या कल्पनेचा विचार करतात की एका व्यक्तीला जीवनात प्राथमिकतेविषयी विचार करण्यास साहाय्य करावे. ही कल्पना एका तत्वज्ञानी शिक्षकाने दर्शविली ज्याने एक काचेच्या रांजणाचा उपयोग केला की त्याच्या वर्गाला शिकवावे. मोठे दगड रांजणात भरण्याद्वारे त्याने सुरुवात केली आणि वर्गाला विचारले की रांजण भरले काय. जरी, ते सहमत झाले, तरी शिक्षकाने स्पष्ट केले की ते भरले नाही. मग तो त्या रांजणात लहान खडे भरू लागला आणि त्यास हालवू लागला, की त्यास खडकांमधील मोकळ्या जागेत जाऊन भरू दयावे, आणि पुन्हा विचारले, की ते आता भरले काय. वर्गाने एकमताने म्हटले, की ते आता भरले आहे, परंतु शिक्षकाने म्हटले, ते अजूनही भरले नाही. पुढे, तो त्या रांजणात वाळू भरू लागला, त्यास रांजणाच्या तोंडापर्यंत भरले, आणि पुन्हा विचारले आता भरले काय. पुन्हा, विद्यार्थी उत्तर देण्यास बिचकले. शेवटी शिक्षकाने रांजणात पाणी भरले, त्यास पूर्णपणे भरले आणि विचारले, की आता ते भरले काय.
काचेच्या रांजणाचे उदाहरण जीवनात प्राथमिकता देण्याबद्दल एक महत्वपूर्ण धडा शिकविते. रांजणात प्रथम लहान वस्तू भरल्या असत्या, तर मग तेथे मोठे खडक बसण्यासाठी पुरेशी जागा राहिली नसती. त्यामुळे कथा मोठया गोष्टी, जीवनातील महत्वाच्या गोष्टींविषयी प्राथमिकता देण्याच्या महत्वावर जोर देते. ज्यावेळेस, येथे लहान गोष्टींना त्यांची जागा असते, तेव्हा त्यांद्वारे आपल्या जीवनास पूर्णपणे भरल्याने महत्वाच्या गोष्टी ज्यांना प्राप्त करण्याची गरज आहे त्यासाठी काहीही जागा उरत नाही. म्हणून, लहान गोष्टींसाठी संतुलन करणे महत्वाचे आहे आणि जीवनात मोठ्या गोष्टींना प्राथमिकता दयावी की आपल्या वेळेचा सदुपयोग करावा आणि आपले ध्येय प्राप्त करावे.
जीवनात काय महत्वाचे आहे त्यासाठी प्राथमिकता देणे आणि ते निश्चित करणे हे महत्वाचे आहे. मोठे खडक, गोष्टी ज्या आपल्याकडे असल्या पाहिजेत, किंवा आपण केल्या पाहिजेत, त्यांस सुरुवातीपासून प्राथमिकता दिली पाहिजे. कमी महत्वाच्या विषयांवर आपला वेळ वाया घालविणे हे आपल्याला आपले ध्येय प्राप्त करण्यास साहाय्य करणार नाही. हा सिद्धांत आपल्या आध्यात्मिक जीवनास देखील लागू होतो. आपल्याकडे काही महत्वाच्या प्राथमिकता आहेत ज्या पूर्ण केल्या पाहिजेत, जसे प्रार्थना, देवाचे वचन वाचणे, उपासना, चर्चला जाणे आणि ख्रिस्तासाठी साक्षीदार होणे.
तथापि, आपल्या जीवनास क्षुल्लक गोष्टींनी भरून टाकणे हे महत्वाच्या आध्यात्मिक कार्यांना काहीही जागा ठेवू शकणार नाही. त्यामुळे, संतुलन ठेवणे हे महत्वाचे आहे, आणि जीवनातील उत्तम गोष्टींपासून चांगल्या गोष्टींनी आपल्याला अडथळा करू देऊ नये. जीवनाच्या महत्वाच्या दृष्टीकोनास प्राथमिकता देण्याद्वारे, आपण आपल्या वेळेचा अधिकतर सदुपयोग आणि आपला उद्देश पूर्ण करू शकतो.
२ तीमथ्यी ४:१३ मध्ये, पौल पास्टर तीमथ्याला विनंती करीत आहे की तो तुरुंगात असताना त्याने त्यास येऊन भेटावे. त्याची मर्यादा ओळखून, पौल त्याची विनंती तीन महत्वाच्या गोष्टींवर मर्यादित करीत आहे. तो त्याचे घडयाळ आणण्यास सांगत आहे, जे त्रोआस मध्ये कार्पाकडे राहून गेले, तसेच त्याची पुस्तके, विशेषतः चर्मपत्रे. जरी, आपल्याला ती पुस्तके, व चर्मपत्रांचा विशेष मजकूर ठाऊक नाही, तरी आपल्याला हे ठाऊक आहे की पौलासाठी त्याच्या जीवनाच्या त्या क्षणी त्या महत्वाच्या होत्या. त्याच्या तुरुंगवासादरम्यान त्याच्या रांजणामध्ये ह्या तीन वस्तू मोठे खडक होते.
जेव्हा आपण पौलाच्या प्राथमिकतेवर विचार करतो, तेव्हा आपण आपल्या मोठया खडकांचा विचार केला पाहिजे. आपल्या जीवनात कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ज्यांस आपल्याला प्राथमिकता देण्याची गरज आहे? ते आपले कुटुंब, आरोग्य, कारकीर्द, शिक्षण, आध्यामिकता किंवा जीवनाचे इतर कोणतेही क्षेत्र असेल जे अत्यंत महत्वाचे असेल. आपली मोठी खडके ओळखून आणि त्यांना आपल्या रांजणात प्रथम ठेवून, आपण आपल्या वेळेचा सदुपयोग आणि आपले उद्देश प्राप्त करू शकतो. आपल्या प्राथमिकता निश्चित करणे हे महत्वाचे आहे आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी काय महत्वाचे आहे त्यावर लक्ष केंद्रित करावे.
प्रार्थना
प्रेमळ पित्या, मी आज तुझ्यासमोर ज्ञान व मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी येत आहे जेव्हा मी माझ्या जीवनात मोठया खडकांना प्राथमिकता देण्यास पाहत आहे. जे खरेच महत्वाचे आहे त्याची पारख करण्यास मला साहाय्य कर आणि त्या प्राथमिकता पूर्ण करण्यासाठी माझा वेळ व शक्तीवर केंद्रित राहावे. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● परिवर्तनाची किंमत● केवळ इतरत्र धावू नका
● २१ दिवस उपवासः दिवस ०५
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-२
● गुणधर्म ज्याने दावीद ला राजासमोर उभे राहण्यास समर्थ केले
● २१ दिवस उपवासः दिवस ०३
● येशूचे नांव
टिप्पण्या