ख्रिस्ती म्हणून आपल्याला इतरांवर प्रीति करण्यासाठी पाचारण झालेले आहे, ज्याप्रमाणे ख्रिस्ताने आपल्यावर प्रीति केली आणि आपल्यासाठी स्वतःला समर्पित केले. तथापि, आपण सेवा करीत असताना, आपल्या स्वतःची ओळख आणि प्रसिद्धीच्या सापळ्यामध्ये अडकू शकतो. पद व प्रशंसा प्राप्त करून घेणे हे परीक्षेत पाडू शकते, विशेषतः त्या जगात जेथे यश व स्वतःच्या ओळखीला अधिक महत्त्व दिले जाते.
परंतु स्तोत्र ११५:१ आपल्याला स्मरण देते:
हे परमेश्वरा आमचे नको,
आमचे नको, तर आपल्या नावाचे गौरव कर."
"आमचे नको" हे दोनदा उल्लेखिले आहे. पुन्हा पुन्हा म्हणणे हे एक शक्तिशाली स्मरण करविते की गौरवाचे श्रेय आपल्याला नाही दिले पाहिजे, परंतु त्याऐवजी ते देवाचे आहे.
पास्टर, पुढारी आणि ते जे प्रभूमध्ये सेवा करीत आहेत, कृपा करून मला तुम्हांला सांगू दया. सेवाकार्यात, अनेक वेळेला, आपल्या स्वतःला कदाचित इतरांकडून अपमानास्पद आणि दुर्लक्षित केल्यासारखे वाटेल. आपल्याला कदाचित असे वाटेल की आपल्या प्रयत्नांकडे लक्ष दिले गेलेले नाही आणि मग कदाचित आपली ओळख प्राप्त करण्यासाठी स्वतःला बढावा देण्याच्या परीक्षेत पडू शकतो. परंतु आपण काळजी घेतली पाहिजे की केवळ मनुष्यांना दिसावे म्हणून तसे करू नये. आपल्याला हे स्मरण ठेवले पाहिजे की आपला अंतिम उद्देश हा आपल्या स्वतःला, नाही तर देवाची सेवा करावी आणि त्यास गौरव देण्याचे आहे.
मत्तय ५:१६ मध्ये, प्रभु येशू देखील देवाला गौरव देण्याच्या महत्वावर जोर देतो. "तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू दया की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे." येथे येशू आपल्याला सांगत आहे की जेव्हा आपण चांगली कृत्ये करतो, तेव्हा आपण ती आपल्या स्वतःच्या ओळखीसाठी करू नयेत परंतु देवाच्या गौरवाकरिता करावे. आपण आपली जीवने अशा प्रकारे जगावी की जे चांगले आपण करीत आहोत ते इतरांनी पाहावे आणि देवाचे गौरव करावे.
माणसांनी पाहावे ह्या हेतूने तुम्ही आपली चांगली कृत्ये करू नये, नाहीतर तुमच्या स्वर्गातील पित्याकडून तुम्हांला कोणतेही पुरस्कार मिळणार नाही. (मत्तय ६:१)
येशूने त्याच्या शिष्यांना चेतावणी दिली की इतरांनी पाहावे म्हणून तुम्ही त्यांच्यासमोर तुमचे धर्माचरण करू नये. त्याने त्यांना स्मरण करून दिले की जे काही गुप्तपणे केले जाते ते त्यांचा स्वर्गातील पिता पाहतो आणि त्यानुसार तो तुम्हांला पुरस्कार देईल. (मत्तय ६:४). आपण हे स्मरण ठेवले पाहिजे की आपला खरा पुरस्कार हा देवाकडून येतो, इतरांच्या ओळखीतून नाही.
आपल्या स्वतःसाठी पदे आणि प्रसिद्धी प्राप्त करण्याऐवजी, आपण नम्र अंत:करणाने इतरांची सेवा करण्यासाठी लक्ष केंद्रित केले पाहिजे, जसे ख्रिस्ताने केले. आपण बाप्तिस्मा देणाऱ्या योहानाचे अनुसरण करावे, ज्याने येशूविषयी म्हटले, "त्याची वृद्धि व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे" (योहान ३:३०). आपण जे सर्व काही करतो त्यामध्ये त्यास गौरव व सन्मान देण्यास आपण शिकले पाहिजे, जरी त्याचा अर्थ पद किंवा ओळखीशिवाय सेवा करणे असेल.
सेवेमध्ये आपल्या हेतूबद्दल आपण विचार केला पाहिजे. हे लक्षात ठेवा की हे आपल्या स्वतःला बढावा देण्यासाठी नाही, परंतु देवाला व त्याच्या राज्यास बढती देण्यासाठी आहे.
प्रार्थना
पित्या, जेव्हा मी तुझी सेवा करण्यास पाहतो, मी विनंती करतो की तू माझे अंत:करण चाळून पाहा आणि कोणतेही स्वार्थी हेतू प्रगट कर जे माझ्या मनात लपलेले असतील. मला साहाय्य कर की हे माझ्या स्वतःला बढती देण्यासाठी नाही परंतु केवळ तू आणि तुझ्या राज्यासाठी आहे. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमची मनोवृत्ती तुमची उंची ठरवते● अद्भुततेस जोपासणे
● दिवस १५ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● कालच्यास सोडून द्यावे
● योग्य पाठपुरावा अनुसरण
● सार्वकालिकता मनात ठेवून जगणे
● लोकांचे पाच गट येशूला भेटले # 1
टिप्पण्या