जेव्हा इस्राएलींनी आश्वासित देशात प्रवेश केला, त्यांना देवाने आज्ञा दिली होती की तो प्रदेश ताब्यात घ्यावा आणि त्या देशावर नियंत्रण करावे. तथापि, हे सोपे कार्य नव्हते कारण देशात अनेक मूर्तिपूजक वंश राहत होते ज्यांचा काहीही हेतू नव्हता की तो देश सोडावा.
"जो देश वतन करून घेण्यासाठी तू जात आहेस तेथे तुझा देव परमेश्वर तुला नेईल आणि तुमच्यापेक्षा मोठी आणि समर्थ अशी पुष्कळ राष्ट्रे म्हणजे हित्ती, गिर्गाशी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी ही सात राष्ट्रे तुमच्यासमोरून घालवून देईल; २ आणि तुझा देव परमेश्वर त्यांना तुझ्या हवाली करील व तू त्यांचा पराभव करशील, तेव्हा त्यांचा समूळ नाश कर; त्यांच्याशी करारमदार करू नकोस व त्यांच्यावर दया करू नकोस." (अनुवाद ७:१-२)
सात मूर्तिपूजक राष्ट्रे ज्यांस इस्राएली लोकांना पराभूत करण्याचे कार्य दिले होते:
१. हित्ती
२. गिर्गाशी
३. अमोरी
४. कनानी
५. परिज्जी
६. हिव्वी
७. यबूसी
हे वंशज मूर्तीपूजा, अनैतिकता आणि क्रूर पद्धती, जसे मानव बळी देणारे म्हणून ओळखले जात होते. देवाने इस्राएली लोकांना चेतावणी दिली होती की जर त्यांनी या विरोधक राष्ट्रांना हाताळले नाही, तर ते त्यांच्या व्यवहार पद्धतींद्वारे भ्रष्ट होतील आणि शेवटी त्यांना स्वतःला त्या देशातून हाकलून दिले जाईल.
"पण तुम्ही त्या देशातल्या रहिवाशांना तुमच्यासमोरून घालवून न दिल्यास ज्यांना तुम्ही तेथे राहू द्याल ते तुमच्या डोळ्यांना कुसळासारखे आणि तुमच्या कुशीला काट्यांसारखे होतील, आणि तुम्ही वस्ती कराल त्या देशात तुम्हांला त्रास देतील." (गणना ३३:५५)
आज आपल्याला, आध्यात्मिक आणि भौतिक दोन्हीही दृष्टीने ही चेतावणी व्यवहारिकदृष्टया लागू आहे. व्यवहारिक लागुकरणाकडून, तुमचे आध्यात्मिक नेत्र खोटयापासून सत्याची पारख करण्यासाठी वापरले जातात आणि चुकीची शिकवण व विश्वास आपल्या जीवनात राहू देणे हे आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी अडथळा होऊ शकते.
शास्तेच्या पुस्तकातील शेवटचे वचन म्हणते: "त्या काळी इस्राएलाला कोणी राजा नव्हता; ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी." (शास्ते २१:२५) हे मूर्तिपूजक लोकांविषयी बोलत नाही जे इस्राएल राष्ट्राभोवती होते –हे देवाच्या लोकांविषयी बोलते! ते प्रामाणिकपणे योग्य ते करण्याचा प्रयत्न करीत होते परंतु ते पूर्णपणे ध्येय चुकले होते आणि त्यांना हे देखील हे कळत नव्हते की ते काहीतरी चुकत आहेत. त्यांनी विचार केला की जे ते करीत आहे ते योग्य आहे!
"परमेश्वराचे विधी सरळ आहेत, ते हृदयाला आनंदित करतात; परमेश्वराची आज्ञा चोख आहे, ती नेत्रांना प्रकाश देते" (स्तोत्र १९:८). केवळ तुमच्या भौतिक नेत्रांवरच भरवसा ठेवू नका- ते कदाचित तुम्हांला भलतीकडे नेऊ शकतात. जे काही देवाच्या वचनाच्या विरोधात जाते असे काहीही काढून टाकण्यासाठी आपण दक्ष असले पाहिजे आणि त्याच्या सत्यावर केंद्रित असले पाहिजे.
शारीरिकदृष्टया, बाजूचा किंवा कमरेचा भाग हा पळणे किंवा चालण्यासाठी महत्वाचा आहे आणि या भागात कोणतीही दुखापत किंवा अशक्तपणा हा मोठया प्रमाणात अडथळा निर्माण करू शकतो. त्याचप्रमाणे, आपल्या जीवनात, अशक्तपणा किंवा दुर्बलतेचा कोणताही भाग आपण ओळखावे आणि त्यावर लक्ष दिले पाहिजे जे कदाचित आपल्या प्रगतीला अडथळा करू शकते. मग ते वाईट सवय, घृणास्पद संबंध किंवा आपल्या दैनंदिन कार्यात शिस्तीचा अभाव काहीही असो, असे अडथळे दूर करण्यासाठी आपण कार्य केले पाहिजे आणि आपल्या ध्येयावर केंद्रित असावे.
प्रार्थना
मौल्यवान स्वर्गीय पित्या, मी आज तुझ्यासमोर पारख करण्याचे दान मागण्यासाठी येतो. खोटयापासून सत्य पाहणे आणि समजण्यासाठी माझे नेत्र उघड म्हणजे मी शत्रूच्या योजनेद्वारे फसविला जाऊ नये. अशक्तपणा किंवा दुर्बलतेचा कोणताही भाग ओळखण्यास मला साहाय्य कर जे कदाचित माझ्या प्रगतीला अडथळा करू शकेल. येशूच्या नावाने. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● व्यसनांना संपवून टाकणे● गुणधर्म ज्याने दावीद ला राजासमोर उभे राहण्यास समर्थ केले
● ते खोटेपण उघड करा
● दिवस ०६ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● त्याचे दैवी दुरुस्तीचे दुकान
● आत्म्याची नावे आणि शीर्षक: देवाचा आत्मा
● दिवस ०३: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या