डेली मन्ना
त्याच्या सिद्ध प्रितीमध्ये स्वतंत्रता प्राप्त करणे
Saturday, 18th of March 2023
36
24
625
संकटे व कठीण परिस्थितींना सामोरे जाताना तुम्हांला कधी भीतीने हतबल झालो आहो असे वाटले काय? तो एक सामान्य मानवी अनुभव आहे, परंतु सुवार्ता ही आहे की आपल्याला भीतीमध्ये अडकून राहावयाचे नाही. भयावर विजय मिळविण्यासाठी किल्ली ही सिद्ध प्रीति आहे.
प्रेषित योहान आपल्याला याची आठवण देतो की, "प्रीतीच्या ठायी भीति नसते; इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीति भीति घालवून देते; भीतीमध्ये शासन आहे आणि भीति बाळगणारा प्रितीमध्ये पूर्ण झालेला नाही." हे सामर्थ्यशाली स्मरण करून देणे आहे की भय आणि प्रीति एकत्र राहू शकत नाही. जेव्हा आपण प्रितीमध्ये मुळावलेले आहोत, तेव्हा भयाने पळ काढला पाहिजे.
सिद्ध प्रीति काय आहे, हे कदाचित तुम्ही विचाराल? हेल्लेणी शब्दानुसार प्रीतीसाठी "अगापे" शब्द आहे, म्हणजे सिद्ध प्रीति ही पूर्ण प्रीति आहे. ही अशा प्रकारची प्रीति आहे जी समजते की आपण आपल्या स्वर्गीय पित्याबरोबर कराराच्या संबंधात आहोत आणि हे की आपण त्याचे प्रिय पुत्र व कन्या आहोत. जेव्हा आपण हे खरेच समजतो, तेव्हा आपण भरवसा ठेवू शकतो की देव आपली काळजी घेतो आणि तो नेहमीच आपल्याबरोबर आहे, मग याची पर्वा नाही की आपण कशाचा सामना करीत आहोत.
संकटाच्या वेळी, आपल्यासाठी देवाची प्रीति आणि काळजीबद्दल प्रश्न विचारण्याच्या सापळ्यामध्ये सापडणे सोपे आहे. आपल्याला कदाचित असे देखील वाटेल की त्याने आपल्याला सोडले आहे. परंतु अशा प्रकारचे विचार हे सिद्ध प्रितीमध्ये मुळावलेले नाही. जेव्हा आपण म्हणू शकतो, "मला ठाऊक नाही की असे का घडत आहे, परंतु मला ठाऊक आहे की देव याद्वारे अचंभित झालेला नाही. तो माझ्याबरोबर आहे, आणि तो माझा त्याग करणार नाही, "तेव्हा आपण सिद्ध प्रीतीचे स्तर आणि आपल्या पित्या वरील भरवशामध्ये कार्य करीत आहोत.
"२८ तसेच वस्त्राविषयी का चिंता करत बसता? रानातील फुले पाहा, ती कशी वाढतात? ती कष्ट करत नाहीत व सूत कातत नाहीत; २९ तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोन देखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता. ३० जे रानातले गवत आज आहे व उद्या भट्टीत पडते त्याला जर देव असा पोषाख घालतो, तर, अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेषेकरून तुम्हांला पोषाख घालणारा नाही काय?" (मत्तय ६:२८-३०)
बायबल आपल्याला याची आठवण देते की देव त्याच्या संपूर्ण सृष्टीची काळजी करतो, लहान चीमण्यांपासून ते रानातील फुलांपर्यंत. आणि जर तो ह्या गोष्टींची काळजी करतो, तर आपण जे त्याची प्रिय लेकरे आहोत, त्यांची तो किती अधिक काळजी करील? जेव्हा आपण आपल्यासाठी देवाची प्रीति व काळजीवर भरवसा ठेवतो, तेव्हा आपल्याला कोणत्याही वादळात शांति मिळू शकते.
सिद्ध प्रीतीचा अनुभव करण्याबरोबरच, आपल्याला परिवर्तीत मनाचे देखील आश्वासन दिले आहे. जेव्हा आपण देवाच्या प्रीतीला आपणांस पूर्णपणे बदलू देतो, तेव्हा आपण नवीन व शिस्तबद्ध मनाचा अनुभव करू शकतो. याचा अर्थ हा आहे की आपण आपल्या विचारांचे रक्षण करू शकतो आणि भय व नकारात्मकते ऐवजी सत्यावर केंद्रित राहण्याची निवड करू शकतो.
सिद्ध प्रीति ही भयावर प्रभुत्व मिळविण्याची किल्ली आहे. जेव्हा आपण आपल्यासाठी देवाची प्रीति समजतो आणि त्यावर भरवसा ठेवतो, तेव्हा आपल्याला कोणत्याही वादळात शांति मिळू शकते. म्हणून चला आपण आपल्या हृदयात व मनात सिद्धी प्रीति निर्माण करण्याचा प्रयत्न करू, आणि देवाला आपणांस आत्मविश्वासी, धाडसी आणि विश्वासू लोक असे परिवर्तीत करू देऊ जसे असावे म्हणून त्याने आपणांस निर्माण केले आहे.
प्रार्थना
प्रेमळ पित्या, तुझ्या सिद्ध प्रीतीसाठी तुझे आभार जे भयास काढून टाकते. प्रार्थना, उपासना आणि तुझ्या वचनाचे मनन करण्याद्वारे माझे अंत:करण व मनात या प्रीतीला निर्माण करण्यास मला साहाय्य कर. मी नेहमीच याचे स्मरण ठेवावे की मी तुझे प्रिय लेकरू आहे आणि हे की प्रत्येक परिस्थितीमध्ये तू मजबरोबर आहेस. येशूच्या नावाने, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आपल्यामध्येच खजिना● शाश्वतसाठी आसुसलेले असा, तात्पुरत्यासाठी नाही
● एक मृत व्यक्तिजिवंत व्यक्तींसाठी प्रार्थना करीत आहे
● तुम्ही मत्सरास कसे हाताळाल
● देवाने एवढी प्रीती केली की त्याने दिला
● भेट देणे व प्रकटीकरण देण्यामध्ये
● देव आज मला पुरवठा करू शकतो काय?
टिप्पण्या