"त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढवलेला कराराचा कोश होता; ह्या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या होत्या." (इब्री ९:४)
प्रेषित पौलानुसार, पवित्र कोशामध्ये तेथे तीन महत्वाच्या वस्तू होत्या ज्यांचे जतन करून ठेवले होते. ह्या वस्तूंमध्ये सुवर्णपात्र, कराराच्या पाट्या होत्या व कळ्या आलेली अहरोनाची काठी होती. ह्या वस्तू परम पवित्र स्थानातील तिसऱ्या खोलीमध्ये सापडल्या.
मान्ना, चमत्कारिक भाकर स्वर्गातून पाठविली गेली होती, ज्यावर इस्राएली लोक रानातील त्यांच्या चाळीस वर्षांच्या खडतर प्रवासात पोषण करणार होते, ज्याची नोंद गणना ११:६-९ मध्ये केलेली आहे. या दैवी अन्नाने इस्राएली लोकांचे पोषण केले, आणि त्याच्या निवडलेल्या लोकांसाठी देवाचा पुरवठा आणि काळजी करण्याचे स्मरण करून देणारे होते.
कोश हा स्वयं ख्रिस्ताचे एक परिपूर्ण चित्र होते. जेव्हा आपण येशूला आपला प्रभु व तारणारा म्हणून स्वीकार करतो, तेव्हा आपण मान्ना नियमशास्त्र आणि काठी देखील स्वीकार करू शकतो. मान्ना ही स्वर्गातून आलेली भाकर होती (निर्गम १६:४), आणि येशू हा स्वर्गातून आलेली भाकर किंवा स्वर्गीय मान्ना होता. (योहान ६:३२-३५)
अहरोनाची काठी, सुरुवातीला झाडाचे एक मृत खोड होते, ज्यास अंकुर येणाऱ्या काठीमध्ये परिवर्तीत केले ज्याने बदाम व पाने निर्माण केली, जसे गणना १७:७-९ मध्ये नोंद केलेली आहे. ह्या चमत्कारिक चिन्हांनी इस्राएली लोकांना प्रदर्शित केले की अहरोन हा वास्तवात देवाने नियुक्त केलेला याजक आहे, ज्याच्या अधिकारास व नेतृत्वाला अनिश्चितता व भांडणाच्या वेळेदरम्यान लोकांमध्ये पक्के केले होते.
अहरोनाची काठी देवाच्या उपस्थितीत जुळलेले राहण्याच्या महत्वाला देखील सूचित करते जर आपल्याला फळे आणि अधिक फळे निर्माण करावयाची आहेत. देवाची उपस्थिती याचीच केवळ तुम्हांला गरज आहे की तुमच्या जीवनाच्या मृत क्षेत्रांना पुन्हा सजीव करावे. देवाची उपस्थिती याचीच केवळ तुम्हांला गरज आहे की नष्ट झालेला व्यवसाय, संपुष्टात आलेला विवाह इत्यादी पुनर्जीवित करावे.
तथापि, ख्रिस्ती जीवनात पवित्र आत्म्याचे सर्वात महत्वाचे प्रमाण हे आहे जेव्हा, अहरोनाच्या काठीप्रमाणे, विश्वासणारा त्याच्या जीवनात आध्यात्मिक फळे निर्माण करतो जे प्रामाणिक बदल आणि ख्रिस्ता-समान चारीत्र्यास प्रदर्शित करते! जसे प्रभु येशूने म्हटले:
"१६त्यांच्या फळांवरून तुम्ही त्यांना ओळखाल, काटेरी झाडांवरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडांवरून अंजीर काढतात काय? १७त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगले फळ येते आणि वाईट झाडाला वाईट फळ येते. १८चांगल्या झाडाला वाईट फळे येणे शक्य नाही, आणि वाईट झाडाला चांगली फळे येणे शक्य नाही. १९ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते. २०ह्यास्तव तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल." (मत्तय ७:१६-२०)
शेवटी, नियमाच्या पाट्या हे देवाच्या आज्ञेचे मूर्त प्रतिनिधित्व होते, कारण ते दगडावर कोरलेले होते आणि मोशेने स्वतः त्यांना सोन्याच्या कराराच्या कोशामध्ये ठेवले होते. अनुवाद १०:५ नुसार, ह्या नियमाच्या पाट्या इस्राएली लोकांसाठी नैतिक आणि नीतिमत्तेबाबत मार्गदर्शक तत्वे म्हणून कार्य करतात, जे देवाबरोबरच्या त्यांच्या कराराच्या संबंधाला आणि त्याच्या इच्छेनुसार जीवन जगण्याच्या त्यांच्या जबाबदारीस ठळकपणे दर्शवितात. त्याचप्रमाणे, देवाचे वचन आपल्याला देहाच्या इच्छेपासून वेगळे करते आणि आपल्याला पवित्र लोक बनविते. हे पावित्रीकरणास प्रतिनिधित करते.
प्रार्थना
पित्या, तुझ्या वचनासाठी मी तुझे आभार मानतो, जे मला सांभाळते आणि मला समर्थ करते. तुझ्या उपस्थितीबरोबर नेहमीच जुळलेले राहण्यासाठी मला साहाय्य कर, म्हणजे मी फळे आणि पुष्कळ फळे निर्माण करावीत. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या समर्थ हाताच्या पकडीत● देव पुरस्कार देणारा आहे
● छाटण्याचा समय
● पाच प्रकारच्या लोकांना येशू दररोज भेटला #2
● आध्यात्मिक वाढीचे शांत गुदमरवणारे
● कामाच्या ठिकाणी एक हिरो-२
● त्याच्या ध्वनिलहरींच्या कंपनासह लयबद्ध होणे
टिप्पण्या