“मग पेत्र म्हणाला, “माझ्याजवळ सोनेरूपे काही नाही; पण जे आहे ते तुला देतो; नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग” (प्रेषित ३:६).
पेत्राने त्याला पैसे दिले नाही; त्याने त्याला त्याच्यापेक्षा अधिक मौल्यवान ते दिले. स्पर्श आणि आज्ञेने, पांगळ्या माणसाने त्याची पावले व घोट्यात बळ प्राप्त केले. तो उभा राहिला आणि केवळ चालू लागला नाही तर उड्या मारत होता! “तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला; आणि तो चालत, उड्या मारत व देवाची स्तुती करत त्यांच्याबरोबर मंदिरात गेला” (प्रेषित ३:८).
जेव्हा आश्चर्यचकित लोकसमुदाय एकत्र आला, तेव्हा पेत्राने त्वरेने त्यांच्या विस्मयास दिशा दिली. ते आश्चर्यचकित झाले होते की जसे काही त्यांच्या मानवी क्षमतेने किंवा संतपणाने हा चमत्कार घडवून आणला आहे. परंतु पेत्राची इच्छा होती की त्यांनी हे समजावे की बरे होणे हे त्यांच्या शक्तीचे किंवा पवित्रतेचे प्रदर्शन नाही.
“अब्राहाम, इसहाक व याकोब ह्यांचा देव, आपल्या पूर्वजांचा देव, ह्याने आपला ‘सेवक’ येशू ह्याचे गौरव केले आहे ... ” (प्रेषित ३:१३).
देव जो पिता आणि येशू, जो जीवनाचा राजकुमार, ज्याला त्याच लोकसमुदायाने नाकारले होते त्यास गौरव मिळाले. येशू ख्रिस्ताद्वारे येणाऱ्या विश्वासावर पेत्राने जोर दिला, जे सिद्ध दृढता देते. (प्रेषित ३:१६)
हे सर्व काही आज आपल्याला कसे लागू होते?
१. देवाची कृपा पुरेशी आहे:
कधी कधी आपण साधनसंपत्तीवर लक्ष केंद्रित करतो, ज्याप्रमाणे सुरुवातीला त्या पांगळ्या माणसाने भीक मागितली. परंतु देव आपल्याला त्यापेक्षा बरेच अधिक देतो- तो आपल्याला कृपा पुरवतो. कारण असे लिहिले आहे, “माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते” (२ करिंथ १२:९)
२. गौरवाला पुन्हा दिशा द्या:
प्राप्ती, बरे करणे आणि प्रगती हे केवळ आपली योग्यता आणि शक्तीचे प्रदर्शन नाहीत. पेत्र व योहानासारखे, आपण लोकांना चमत्काराच्या खऱ्या स्त्रोत्राकडे निर्देश दिले पाहिजे. “त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे.” (मत्तय ५:१६)
३. विश्वास दैवी सामर्थ्याला मोकळे करते:
येशूच्या नावावरील विश्वासामुळे पांगळा माणूस बरा झाला. तुमच्या जीवनात काही क्षेत्रे आहेत का जेथे बरे होणे किंवा बदलाची आवश्यकता आहे? बायबल आपल्याला सांगते, “म्हणून मी तुम्हांला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा म्हणजे ते तुम्हांला मिळेल” (मार्क ११:२४).
४. साक्षीदार व्हा:
पेत्र व योहानासारखे, आपल्याला ख्रिस्ताचे पुनरुत्थान व परिवर्तन जे ते आणू शकते त्याची साक्ष देण्यासाठी पाचारण झाले आहे. “परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल .. तुम्ही माझे साक्षी व्हाल “ (प्रेषित १:८)
पांगळ्या माणसाच्या विलक्षणपणे बरे होण्याने एका चमत्काराच्या कथेपेक्षा अधिक असे दिले: त्याने विश्वास व नम्रतेचा साचा, आणि आपल्या सर्वांसाठी उपलब्ध असलेली देवाची सर्वशक्तिमान कृपा पुरवली. चला आपण विश्वासात पुढे पाऊल टाकू या, देवाला गौरव देऊ, आणि त्याच्या अविश्वसनीय सामर्थ्याचे जिवंत साक्षीदार होऊ या.
प्रार्थना
पित्या, विश्वासाचे जीवन जगण्यास आम्हांला मदत कर जे आमच्या नाही तर तुझ्या गौरवाकडे निर्देश करते. तुझ्या सामर्थ्याचे आम्ही पात्र व्हावे असे होऊ दे जेणेकरून इतरांनी विश्वास ठेवावा आणि बरे व्हावे, येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● जबाबदारीसह परिपक्वता सुरु होते● व्यसनांना संपवून टाकणे
● आध्यात्मिक प्रवेश द्वारांचे रहस्य
● फसवणुकीच्या जगात सत्याची पारख करणे
● वेदी ला प्राथमिकता दया की तुमचे जीवन बदलावे
● स्वैराचारास पूर्ण उपाय
● कृपेचे प्रगट होणे
टिप्पण्या