काही सभांमध्ये, मी काही वेळेला प्रार्थनेमध्ये १००० पेक्षा अधिक लोकांवर हात ठेवतो. संपूर्ण उपासनेमध्ये, एखाद्या सुपरहिरोप्रमाणे, मला अधिक उत्साही आणि शक्तिशाली असे वाटते. तथापि, ज्यावेळेस सभा संपते, मला अति थकवा आणि मोठा भार वाटतो आणि मी बिछान्यावर लोटतो. जरी पवित्र आत्मा हा आपल्यामध्ये आणि आपल्यावर आहे, जो आपल्याला मोठ्या गोष्टी पूर्ण करण्यास साहाय्य करीत असतो, तरी आपल्या भौतिक शरीराचा उपयोग केला जातो आणि त्यावर परिणाम होत असतो.
एलीयाचा अनुभव याचे प्रमुख उदाहरण म्हणून कार्य करते. कर्मेल डोंगर, ज्या ठिकाणी एलीया आणि बालाच्या संदेष्ट्यांमध्ये स्पर्धा झाली, जे इज्रेलपासून अंदाजे ५० किमी अंतरावर आहे. खोट्या संदेष्ट्यांवर त्याच्या तीव्र आध्यात्मिक विजयानंतर, राजा अहाबाच्या रथापुढे इज्रेलपर्यंत धावण्यात एलीया शारीरिकरित्या अत्याधिक थकला होता.
तीन वर्षांच्या दुष्काळानंतर, एलीया संदेष्ट्याने बालाच्या ४५० संदेष्ट्यांना आव्हाहन दिले की कर्मेल डोंगरावर एक स्पर्धा करावी हे साबित करण्यास की कोणता देव खरा आहे- परमेश्वर किंवा बाल. जेव्हा बालाचे खोटे संदेष्टे बलीदानावर अग्नि उतरविण्यास चुकले, तेव्हा एलीयाने परमेश्वराकडे प्रार्थना केली, आणि देवाने आकाशातून अग्नि पाठविला की बलिदानास भस्म करावे. सामर्थ्याच्या या चमत्कारिक प्रदर्शनानंतर, इस्राएली लोकांनी परमेश्वराला एक खरा देव म्हणून स्वीकारले, आणि एलीयाने बालाच्या संदेष्ट्यांचा वध करण्याची आज्ञा दिली.
आता पाऊस पडत आहे, दुष्काळाची तीन वर्षे संपली आहेत, एलीयाद्वारे भविष्यवाणीने दिलेल्या वचनानुसार घडले आहे. "१ एलीयाने काय काय केले, तसेच त्याने सर्व संदेष्टे तलवारीने कसे वधले हे सगळे अहाबाने ईजबेलीला कळवले. २ तेव्हा ईजबेलीने जासूद पाठवून एलीयाला बजावले की, 'संदेष्ट्यांच्या जिवाच्या गतीसारखी तुझ्या जिवाची गती उद्या ह्याच वेळी केली नाही तर देव माझे तसेच व त्याहूनहि अधिक करोत" (१ राजा १९:१-२).
बालाचे मौन आणि कर्मेल डोंगरावर परमेश्वराकडून अग्निने ईजबेलला पश्चाताप करण्याकडे नेले नाही. तिच्या खोट्या संदेष्ट्यांच्या वधामुळे रागात येऊन, ईजबेल एलीयाला मारण्याची शपथ घेते, आणि एका संदेशवाहकाद्वारे त्यास मारण्यात येईल हा संदेश पाठविते, हे घोषित करते की ती त्यास पुढील चोवीस तासात जिवंत मारण्यात येईल, ज्याप्रमाणे त्याने तिच्या संदेष्ट्यांचा वध केला आहे.
"हे ऐकून एलीया जीव घेऊन पाळला; तो यहूद्यातील बैर-शेबा येथे आला व तेथे त्याने आपल्या चाकराला ठेवले. (१ राजा १९:३)
ऐकण्याद्वारे विश्वास येतो (रोम १०:१३), आणि हेच सत्य आहे. परंतु दुखद विडंबना ही आहे की भय, देखील दुष्टाची वाणी ऐकण्याने येते. ईजबेलकडून प्राणघातक संदेश मिळाल्यावर, एलीया, जो कधी एक धाडसी संदेष्टा होता, तो घाबरून गेला. कर्मेल डोंगरावर, देवाच्या अविश्वसनीय सामर्थ्याच्या प्रदर्शनाचे नुकतेच साक्षीदार झालेले असताना देखील, एलीयाचा विश्वास डळमळला, आणि त्याने त्या दुष्ट राणीच्या क्रोधापासून दूर पळून जाण्याची निवड केली. म्हणून, जेव्हा आपण जीवनातून पुढे मार्ग काढत जात असताना, हे महत्वाचे आहे की त्या संदेशाविषयी विचार करीत राहावे जे आपल्याला उघड झाले आहे, कारण ते आपला विश्वास, भावना आणि कृत्यांवर प्रभाव करू शकते.
एलीया हा इज्रेलमध्ये होता जेव्हा त्याने ईजबेलकडून धमकी देणारा संदेश ऐकला होता. अगोदरच मी तुम्हांला सांगितले आहे, की एलीया कसा ५० किमी पळत गेला. भीतीने त्रस्त होऊन, त्याने इज्रेल ते बैरशेबा एवढा लांब व कठीण प्रवास सुरु केला होता, जे अंदाजे १७२ किमी एवढे अंतर आहे.
प्राचीन जगाच्या संदर्भात, एवढ मोठा प्रवास करणे हे कठीण काम असायचे, ज्यासाठी प्रचंड शारीरिक सहनशक्ती आणि दृढ निश्चय आवश्यक असे. तेव्हा प्रवास अधिक व्यवस्थित करण्यासाठी कार किंवा ट्रेनसारख्या आधुनिक सोयी नव्हत्या. परिणामस्वरूप, एलीयाला कठीण प्रदेशातून प्रवास करताना अनेक दिवस लागले असतील, घटकांच्या संपर्कात आणि त्याच्या जिवाची सतत भीती असेन. या सर्वांमुळे, शेवटी एलीयाला अत्यंत थकून जाण्याच्या स्थितीत नेले होते.
जीवन हे नेहमीच तुम्हांला व्यस्त ठेवेल. तथापि, आपल्याला त्या गोष्टींची पारख करण्याची गरज आहे जे करण्यास देवाने आपल्याला पाचारण केले आहे. शारीरिक अत्यंत थकवा टाळण्यासाठी आणि फलदायक होण्यासाठी ही एक मुख्य किल्ली आहे.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तुझ्या वाणीकडे माझे कान लाव आणि तुझे पाचारण पूर्ण करण्यास मला मार्गदर्शन कर. फळ उत्पन्न करण्यास आणि माझ्या जीवनाच्या प्रत्येक पैलूंमध्ये तुझ्या इच्छेनुसार चालण्यास मला समर्थ कर जेणेकरून मी अत्यंत थकवा टाळावा. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अनिश्चिततेच्या काळात उपासनेचे सामर्थ्य● चुकीचे विचार
● शोधण्याची आणि सापडण्याची कथा
● शेवटच्या समयाचे 7 मुख्य भविष्यात्मक चिन्हे # २
● उदारपणाचा सापळा
● चमत्कारिकतेमध्ये कार्य करणे: किल्ली #१
● किंमत जी तुम्हाला भरण्याची गरज आहे
टिप्पण्या